भारतविरुद्धच्या सामन्याआधीच पाकिस्तानला झटका, शाहीन आफ्रिदीबाबत मोठी बातमी समोर

मुंबई, 12 ऑगस्ट : यूएईमध्ये सुरू होत असलेल्या आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 28 ऑगस्टला सामना होणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी पाकिस्तानी संघाची चिंता वाढली आहे. पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी पूर्णपणे तंदुरुस्त नाही. त्यामुळे शाहिन आफ्रिदी भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यातून बाहेर असू शकतो. पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमने हे मान्य केले आहे.

शाहीन आफ्रिदीला गुडघ्याची दुखापत – 

शाहीन आफ्रिदीला गुडघ्याच्या दुखापत झाली आहे. तसेच अद्याप तो या दुखापतीतून सावरलेला नाही. पाकिस्तान क्रिकेट संघ शाहीन आफ्रिदीला फिट होण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करत आहे. बाबर आझम म्हणाला की, आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेत आहोत. तसेच आमचे डॉक्टर शाहीन आफ्रिदीची पूर्ण काळजी घेत आहेत.

आफ्रिदीला तंदुरुस्त होण्यासाठी आणखी विश्रांतीची गरज आहे. तसेच त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी वेळ हवा आहे. त्याच्या फिटनेस आणि आरोग्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. आशिया चषकापर्यंत तो बरा असावा, अशी आमची इच्छा आहे, असेही पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणाला.

हेही वाचा – Ind vs Zim: लोकेश राहुल फिट, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची नव्यानं घोषणा

चार वेगवान गोलंदाज –

दरम्यान, आशिया चषकासाठी पाकिस्तानने शाहीन आफ्रिदीशिवाय आणखी चार वेगवान गोलंदाजांना संघात स्थान दिले आहे. पाकिस्तान संघात हरिस रौफ व्यतिरिक्त शाहनवाज धाहानी, नसीम शाह आणि मोहम्मद वसीम यांच्या नावाचा समावेश आहे. तर बाबर आझमने कबूल केले की, आशिया चषक स्पर्धेतील आपला प्रवास भारतासारख्या संघाविरोधात सुरू होणार आहे आणि हा सामना त्याच्यासाठी खूप दबावाचा असणार आहे. मात्र, आपल्या संघाच्या वेगवान गोलंदाजीवर पूर्ण विश्वासही त्याने व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पाकविरुद्धच्या सामन्यात थोडक्यात बचावला इंग्लंडचा ब्रूक, Video पाहून बसेल धक्का

कराची, 24 सप्टेंबर: इंग्लंडचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. आगामी टी20 वर्ल्ड कपआधी या दौऱ्यात …

अखेरच्या मॅचमध्ये बॅटिंगसाठी उतरली झुलन, इंग्लंडकडून गार्ड ऑफ ऑनर पण त्यानंतर…

लंडन, 24 सप्टेंबर: इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर भारत आणि इंग्लंड महिला संघातला तिसरा वन डे …