Pune : पुण्यात भेसळयुक्त तुपाचा गोरखधंदा, तुम्ही खाताय भेसळयुक्त तूप?

पुणे :  श्रावण महिना म्हणजे देवांची पुजाअर्चा आणि सणोत्सव. विविध सणांमध्ये घरी नक्कीच काहीतरी गोडधोड बनवलं जातं. मात्र सावधान. कारण तुम्ही बनवत असलेल्या चमचमित आणि खमंग पदार्थांमधलं तूप ( Ghee Adulteration) भेसळयुक्त तर नाही ना याची खात्री करून घ्या. कारण पुण्यात भेसळयुक्त तुपाचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. नेमका कसा सुरू होता हा गोरखधंदा याचा हा रिपोर्ट. (large stock of adulterated ghee seized in pune)

उत्सव आणि सणांचे दिवस आता सुरू झाले आहेत. त्यामुळे घरोघरी गोडधोड आणि चमचमीत पदार्थ आता बनवण्याचा धडाका सुरू होणार. त्यामुळे बाजारात आता तूप, दुधाचे पदार्थ, तेल, खवा अशा खाद्यपदार्थांची मागणी वाढणार. याचाचा गैरफायदा भेसळमाफिया घेत आहेत. 

या भेसळमाफियांनी सर्रास खाद्यपदार्थांमध्ये भेसळ सुरू केलीय. असाच तुपात भेसळीचा पुण्यात पर्दाफाश झालाय. भारती विद्यापीठ पोलिसांनी बनावट तूप बनवणा-या टोळीला गजाआड केलंय. पुण्यातल्या कात्रज रोडवरील नवले ब्रिजजवळ असलेल्या इमारतीत हा गोरखधंदा सुरू होता. 

पोलिसांनी घातलेल्या छाप्यात तब्बल 150 किलो भेसळयुक्त तूप आढळून आलंय. या ठिकाणी तेलाची तुपात भेसळ केली जात होती. आंबेगावच्या मोहिंदर सिंद देवरानं हा धंदा थाटला होता. पोलिसांनी हे प्रकरण आता अन्न व औषध प्रशासनाकडे सोपवले आहे.

सणासुदीला जवळपास सर्वच चमचमीत पदार्थांमध्ये तुपाचा वापर केला जातो. आपण बाजारातून तूप आणतो आणि खंमग पदार्थ बनवून बिनधास्त खातो. त्यामुळे तुमचं तूप भेसळयुक्त आहे का हे ओळखण्यासाठी 

तुपातील भेसळ कशी ओळखाल?

आधी पातळ केलेलं तूप परीक्षा नळीत घ्या. त्यात तेवढेच हायड्रोक्लोरिक अॅसिड टाका आणि चिमूटभर साखर टाकून परीक्षा नळी हलवा. परीक्षा नळी स्थिर ठेवल्यावर दोन थर तयार होतील. खालच्या थराला लालसर रंग आल्यास वनस्पती तुपाची खात्री पटेल.

भेसळयुक्त पदार्थ आरोग्याला हानिकारक असतात. यामुळे कॅन्सर, मूत्रपिंडांसारख्या आजार बळावण्याचा धोका असतो. त्यामुळे या भेसळमाफियांना चाप लावण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे.Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Viral Video: अजगराने त्याला घट्ट मिठीत पकडलं होतं, हरिणाचा जीव जाणार तोच तिथे आला देवदूत आणि…

Python Attacked Deer: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल याला …

सकाळी उठल्यावर चहा-कॉफी पिणं टाळा, प्या हे पेयं आठवड्याभरात मिळेल चमकदार त्वचा

जेव्हा आपण सकाळी उठतो. पोटाचा पीएच किंचित आम्लयुक्त असतो. चयापचनाची क्रिया देखील थोडा मंद होते. …