पायावर स्लिट कट स्कर्ट व जाळीदार टॉप घालून जान्हवी कपूरने केलं वातावरण हॉट

कपूर घराण्यातील एक सौंदर्यवती सध्या अख्ख्या तरुणाईवर राज्य करत आहे आणि तिचे नाव जान्हवी कपूर (janhvi kapoor) होय. तिने जेव्हा बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता तेव्हा प्रत्येकजण हे पाहण्यास उत्सुक होता की जान्हवी कपूर आपली आई श्रीदेवी सारखे ग्लॅमर मिळवण्यात यशस्वी होईल का? अनेकांनी तर ती टोटल फ्लॉप ठरेल असे भाकीत केले होते. पण बघा आज जान्हवी कपूर कुठल्या कुठे पोहोचली आहे.

श्रीदेवी त्यांच्या जमान्यातील एक स्टायलिश स्टार होत्या आणि जान्हवी सुद्धा अत्यंत मेहनतीने आजच्या तरुणाईसाठी स्टायलिश सुपरस्टार झाली आहे. तिने आपल्या लुक्सने असे काही ट्रेंड्स सेट केले आहेत की ते आज सुद्धा लाईम लाईटमध्ये आहेत. आज तिचा प्रत्येक लुक व्हायरल होतो आणि तिच्या व्हायरल लुकची न्यूज बनते हेच तिचे यश आहे. (सर्व फोटोज – इंस्टाग्राम)

हे यश सोप्पे नव्हते

आज जान्हवीकडे पाहून आपल्यापैकी अनेकांना वाटू शकते की जान्हवी किती फेमस झाली आहे. किती पैसा तिने कमावला आहे, नाव कमावले आहे. पण मंडळी, हे सगळं काही सहज मिळालेलं नाही आहे. ती स्वत: श्री देवीची मुलगी असल्याने तिच्यावर आधीपासूनच यशस्वी होऊन दाखवण्यासाठी खूप प्रेशर होतं. ती काय स्टाईल आणि फॅशन करते त्यावरून तिचं खरंतर भविष्य ठरणारं होतं आणि अखेर तिने सगळा प्रेशर हँडल करून दाखवलाच. आज सर्वात टॉप अभिनेत्रींना सुद्धा ती आपल्या लुक्समधून सहज टक्कर देते. तिचा असाच एक लुक सध्या व्हायरल होत आहे ज्यात तिने बोल्डनेसच्या सर्व सीमा पार केल्या आहेत. कधी कधी ती अशी रिस्की फॅशन स्टाइल मोठ्या आत्मविश्वासाने कॅरी करते की तिच्यासमोर चक्क मलायका अरोराचा सेक्सी अवतार देखील लोकांना बोरिंग वाटतो.

(वाचा :- छोटा डीपनेक ब्लाउज व चमचमत्या चंदेरी लेहंग्यात श्रद्धा आर्याने केली बोल्डनेसची हद्द पार,फ्लॉंट केली सडपातळ कंबर)

कधीच नसेल पाहिला असा लुक

नुकतेच जान्हवी कपूरहे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्यामध्ये तिने अत्यंत बोल्ड आणि रिस्की अटायर परिधान केले होते. या फोटोजकडे पाहताच उफ्फ फॅक्टर उफाळून येत होता. तिने पिक केलेले हे कपडे जरी अत्यंत बोल्ड असले तरी तिच्या बॉडीला मात्र जबरदस्त कॉम्पलिमेंट देत होते. नंतर असे कळले की तिची स्वत:चीच इच्छा होती की तिला एक सुपर मॉडेल वाला टच हवा होता आणि या लुक मधून तो साध्य झाला. या लुकमध्ये बोल्ड ब्लिंग आणि टोन्ड बॉडी शो ऑफ करणारे इफेक्ट्स अॅड केले गेले होते.

(वाचा :- अहाहा, डोहाळे जेवणादिवशी बिपाशा बासूचा मराठमोळा थाट, बनारसी शालू, डार्क पिंक लिपस्टिक व नव-यासोबत रोमॅंटिक फोटो)

फुलपाखरासारखी जाळीदार टॉप

यावेळी आपली स्टाईल दाखवण्यासाठी जान्हवी कपूरने फुलपाखराच्या आकाराचा जाळीदार टॉप परिधान केला होता जो तिच्या अप्पर बॉडीला जबरदस्त हायलाईट करत होता. हे आउटफिट तिने न्यूयॉर्क ब्रँड Area मधून पिक केले होते. ज्याला शिमर डिटेलिंगसोबत हॉट टच सुद्धा दिला गेला होता. या पीसच्या फ्रंट लुक बाबत बोलायचे झाले तर यात डीपकटसोबत प्लंजिंग नेकलाइन दिली होती. जी हॉल्टर नेक स्टाइलमध्ये होती. शिवाय यात बॅलेन्स करण्यासाठी न्युडल्स स्ट्रेप्स सुद्धा जोडले गेले होते. ज्यासह आर्म पोर्शन कट-आउट लुकमध्ये होता. टॉपचा पॅटर्न स्किनी फिट होता. म्हणूनच हा लुक रिस्की लुक ठरला होता.

(वाचा :- अबब, 350 कारागीर, सोनं-चांदीच्या तारा, 10,000 समुद्री मोत्यांनी सजला राणी एलिझाबेथचा वेडिंग ड्रेस, डोळे दिपतील)

स्कर्टमधून फ्लॉन्ट केले टोन्ड लेग्स

आता हे तुम्ही सुद्धा मान्य कराल की जान्हवीचा अप्पर लुकच एवढा बोल्ड होता की त्या आउटफिटला आकर्षक बनवण्यासाठी दुसऱ्या कोणत्या एलीमेंटची गरजच नव्हती. पण तरीही तिने आपल्या सिल्व्हर स्कर्टमधून एक मस्त टच क्रियेट केला होता. आपल्या या सेक्सी अप्पर लुकसोबत जान्हवीने थाय-हाय स्लीट पॅटर्न असणारा स्कर्ट परिधान केला होता. ज्यात बेंबीच्या बरोबर खाली नॉट बांधण्यात आली होती. हा सेट बनवण्यासाठी सी-थ्रू कपड्याचा वापर केला होता. ज्यामुळे तिचे टोन्ड लेग्स मस्त हायलाईट होत होते.

(वाचा :- Queen Elizabeth ब्रिटेनची महाराणी एलिझाबेथकडे असलेला तो एक हार, जो त्यांच्या मृत्यूनंतरही बनलाय एक गुढ कहाणी..!)

असा केला लुक कम्प्लीट

आपला हा लुक कम्प्लिट करण्यासाठी जान्हवी कपूरने चेह-यावर डुई न्यूड-टोन मेकअप केला होता, जो तिला ग्लोइंग आणि फ्रेश लुक देत होता. तिने एक्सेसरीज म्हणून गळ्यात केवळ पातळ चैन परिधान केली होती. ज्यासह तिने आपल्या केसांना मिडल पार्ट करून वेव्ह स्टाईलमध्ये ओपन सोडले होते. एवढेच नाही तर या ड्रेससोबत तिने सिल्व्हर कलरची हिल्स परिधान केली होती. जी लेग्स पोर्शनला जास्त हायलाईट करत होती. शिवाय न्यूड लिप्स आणि मस्काराने आपल्या लॅशेसला गॉर्जियस लुक दिला होता.

(वाचा :- इंटरनेटवर आग लावतायत ईशा गुप्ताचे बोल्ड फोटोज, डीप गळ्याचा ब्लाउज, पेस्टल कलर लेहंगा व मादक अदा बस्स खेळ खल्लास)

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

शशांक केतकरने वेदातील ‘हे’ नाव दिलं मुलाला, अर्थ वाचून तुम्हालाही वाटेल खास

मराठमोळा अभिनेता शशांक केतकर याचा आज 36 वा वाढदिवस. अभिनेता शशांक केतकरने ‘होणार सून मी …

4 शतकांपासून समुद्रात भटकतंय शापित जहाज; ज्याने कधी हे पाहिलं तो….!

अमेरिका : समुद्राच्या खोलामध्ये अनेक रहस्ये दडलेली आहेत. ज्यांच्याबद्दल आजपर्यंत कोणालाच माहिती मिळालेली नाही. असं …