अर्जुनबद्दल भलतंच बोलून गेला वरुण, अनिल म्हणाले, ‘त्याचं ब्रेकअप होईल’
पंकज त्रिपाठी यांचा जूनमध्ये शेरदिल सिनेमात दिसले होते. आता ते ओ माई मध्ये सयानी गुप्ता आणि नीरज काबी यांच्याबरोबर दिसणार आहेत. अलिकडेच त्यांची ‘क्रिमिनल जस्टिस’ (Criminal Justice) वेब सीरिज रिलीज झाली. या सीरिजमध्ये श्वेता प्रसाद बासू, स्वास्तिका मुखर्जी, पूरब कोहली, आदित्य गुप्ता, गौरव गेरा आणि Deshna Dugad आहेत.
शहनाजचा विषय निघल्यावर सिद्धार्थची आठवण आली
पंकज त्रिपाठी यांनी Connect FM Canada ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शहनाज गिल हिचा उल्लेख आला. ती जेव्हा कार्यक्रमात सहभागी झाली होती तेव्हा तिनं मिर्जापूरमधील या अभिनेत्याचं भरभरून कौतुक केल्याचं पंकज यांना सांगण्यात आलं. तेव्हा ते म्हणाले की, हो मला माहीत आहे की एक अभिनेता म्हणून मी तिला आवडतो. यासाठी तिचे मी आभार मानतो. ते पुढं म्हणाले की, ‘आता शहनाजचा विषय निघाला आहे तर सिद्धार्थची प्रकर्षानं आठवण आली. अनेकांना माहिती नसेल आणि मी देखील कधीही बोललो नाही परंतु सिद्धार्थ आणि माझ्यात छान बाँडिंग होतं. आम्ही एकमेकांच्या खूप जवळ होतो.’
सिद्धार्थ-शहनाजची जोडी प्रेक्षकांची आवडती
बिग बॉस १३ मध्ये सहभागी झाल्यामुळे शहनाज गिल हिला लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमामध्येच शहनाज आणि सिद्धार्थची मैत्री झाली. त्यांच्यातील लुटुपूटुचे वाद, भांडणं प्रेक्षकांना आवडायचे. त्यानंतर दोघेजण एकमेकांच्या अधिक जवळ आले. त्यांची जोडी प्रेक्षकांनाही आवडली आणि प्रेमानं या जोडीला ते Sidnaaz म्हणू लागले.
Video : आनंदाच्या पालखीचा मी भोई, भाऊजींनी साजरी केली ‘होम मिनिस्टर’ची १८ वर्ष!
परंतु नियतीला त्यांचं एकत्र राहणं मंजूर नव्हतं. २ सप्टेंबर २०२१ ला सिद्धार्थचं हार्ट अॅटॅकनं निधन झालं. आजही चाहत्यांच्या मनात सिद्धार्थच्या आठवणी आहेत. अनेकजा ट्विटरवरही #SidharthShukla ट्रेंडमध्ये येतं.
शहनाज लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण
शहनाज गिल (Shehnaaz Gill ) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमात दिसणार आहे. सध्या या सिनेमाचं चित्रीकरण सुरू आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहे. या सिनेमात व्यंकटेश डग्गुबाती, पूजा हेगडे, सिद्धार्थ निगम, राघव जुयालदेखील दिसणार आहेत.
महाराष्ट्राची लाडकी जोडी रितेश जेनेलिया वांद्रयात जिम बाहेर स्पॉट
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या