NITI Aayog Recruitment: कोण करू शकतो अर्ज?
NITI आयोगाच्या जाहिरातीनुसार, यंग प्रोफेशनल पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांकडे विज्ञान / अर्थशास्त्र / सांख्यिकी / ऑपरेशन रिसर्च / सार्वजनिक धोरण / विकास अभ्यास / व्यवसाय प्रशासन / व्यवस्थापन मधील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
बीई/बीटेक/एमबीबीएस/एलएलबी/सीए/आयसीडबल्यूए किंवा बारावी नंतर इतर कोणतीही चार वर्षांची व्यावसायिक पात्रता असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात. उमेदवारांचे वय जाहिरात जारी केल्याच्या तारखेनुसार ३२ वर्षांपेक्षा जास्त नसावे. वरील शैक्षणिक पात्रतेसह ३ ते ८ वर्षांचा कामाचा अनुभव असलेले तसेच ४५ वर्षांपेक्षा जास्त वय नसलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात.
NITI Aayog Job 2022: कुठे आणि कसा कराल अर्ज ?
नीती आयोगाने जाहिरात केलेल्या यंग प्रोफेशनल आणि कन्सल्टंटच्या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक पात्र उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइट niti.gov.in वरील करिअर विभागात दिलेल्या लिंकवरून किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरून भरतीची जाहिरात डाउनलोड करू शकतात. आणि आपण ऑनलाइन अर्ज पृष्ठावर जाऊ शकता.
अर्ज भरण्याची प्रक्रिया १३ सप्टेंबरपासून सुरू झाली असून उमेदवारांना १२ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर, उमेदवारांनी त्याची सॉफ्ट कॉपी डाउनलोड करून जतन करावी.
पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या