JEE Main 2022: जेईई मुख्य सत्र २ साठी पुन्हा नोंदणी विंडो खुली, असा करा अर्ज

JEE Main 2022: जेईई मेन २०२२ सत्र २ परीक्षेसाठी नोंदणी विंडो पुन्हा एकदा उघडण्यात आली आहे. जेईई मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन नोंदणी करता येईल. अर्जाची प्रक्रिया ९ जुलै रोजी रात्री ११ वाजेपर्यंत पूर्ण करता येईल. जेईई मुख्य २०२२ जुलै सत्रासाठी यापूर्वी अर्ज प्रक्रिया ३० जून रोजी बंद करण्यात आली होता. जेईई मुख्य सत्र २ हे २१ जुलै ते ३० जुलै दरम्यान आयोजित केले जाणार आहे.

एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, ‘जेईई मेन २०२२ सत्र १ साठी परीक्षा शुल्क भरलेल्या आणि जेईई मेन २०२२ सत्र २ साठी उपस्थित राहू इच्छिणाऱ्या उमेदवारांना मागील अर्ज क्रमांक आणि पासवर्डसह लॉग इन करावे लागेल. सत्र २ साठी पेपर, परीक्षेचे माध्यम आणि शहर निवडू शकतात आणि परीक्षा शुल्क भरु शकतात. इच्छुक विद्यार्थी पुढे दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करुन अर्ज करु शकतात

JEE Main 2022 Registration: असा करा अर्ज

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा.
वेबसाइटवर दिलेल्या नोंदणी लिंकवर क्लिक करा.
आता नाव, पालकांचे नाव, मोबाइल नंबर, ईमेल पत्ता आणि इतर तपशील सबमिट करून लॉगिन तयार करा.
आता पेजवर परत जाऊन लॉग इन करा.
लॉग इन केल्यानंतर, अर्ज भरा.
फोटो आणि सही अपलोड करा.
अर्ज शुल्क भरा
सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या.

NEET UG 2022 उमेदवारांसाठी परीक्षा शहर जाहीर, NTA कडून प्रवेशपत्रासंदर्भात अपडेट
BRO Job Recruitment 2022: बहु-कुशल कामगार भरतीसाठी ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज, ५५ हजारपर्यंत मिळेल पगार
अर्ज शुल्क
सर्वसाधारण उमेदवारांना ६०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. महिला उमेदवार, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि तृतीयपंथी उमेदवारांकडून ३२५ रुपये शुल्क आकारले जाईल. परदेशी विद्यार्थ्यांना ३ हजार रुपये तर परदेशी महिला, थर्ड जेंडर, एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून १,५०० रुपये शुल्क घेतले जाईल.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

JEE Main जुलै सत्रासाठी पुन्हा अर्ज सुरु, NTA कडून महत्वाची अपडेट

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

Teachers Salary: पालिका शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, वेतनकोंडीतून होणार सुटका

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोडविभागातील महापालिका शिक्षक आणि महापालिका, नगर परिषद, नगरपालिका शाळांतील सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी …

दप्तराचे ओझे विद्यार्थ्यांच्या वजनापेक्षा अधिक, शाळेने आणली टर्म बुक संकल्पना

म. टा. वृत्तसेवा, कल्याणविद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे त्यांच्या वजनापेक्षा अधिक वाढले असून हे ओझे कमी करण्याची …