Infosys Employee: अनेक कर्मचारी एकावेळी दोन कंपन्यांमध्ये काम करत असतात. अशावेळी याचा परिणाम कंपनीच्या रिझल्टवर होतो. त्यामुळे अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांच्या अशा वर्तनाविरुद्ध कठोर निर्णय घेत असल्याचे दिसून आले आहे. माहिती तंत्रज्ञान (Information Technology, IT) कंपनी इन्फोसिसने कंपनीने (Infosys Company) कंपनीच्या कामासोबत इतर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे. इतर नोकऱ्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. इन्फोसिस कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन ठिकाणी काम किंवा ‘मूनलाइटिंग’ करण्याची परवानगी नसणार आहे. कर्मचाऱ्यांनी कराराचे कोणतेही उल्लंघन केल्यास त्यांच्यावर अनुशासनात्मक कारवाई केली जाईल तसेच याचा परिणाम त्यांच्या नोकरीवर होऊ शको असेही सांगण्यात आले आहे.
देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आयटी सेवा कंपनीच्या नोटिफिकेशनची जगभरात चर्चा सुरु आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी नोटीस जाहीर केली आहे. ‘दोन ठिकाणी काम करणे किंवा मूनलाइटिंग करण्याची परवानगी नसेल’ असे यामध्ये म्हटले आहे.
कर्मचाऱ्यांनी आपल्या कंपनीने दिलेल्या कामासोबत इतर काम करणे याला ‘मूनलाइटिंग’ म्हणतात.
MPSC देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट, प्राधान्य क्रमवारीचे बदललेले निकष जाणून घ्या
इन्फोसिसने ‘नो डबल लाइव्ह’ नावाने कर्मचाऱ्यांसाठी नोटीस जाहीर केली आहे. यानुसार कर्मचाऱ्यांना हँडबुक आणि आचारसंहितेनुसार दोन ठिकाणी एकाच वेळी काम करण्याची परवानगी नसेल.
आयटी कंपनीने एका ई-मेलमध्ये म्हटले आहे की, “कोणत्याही कराराचा भंग केल्यास शिस्तभंगाची कारवाई होईल आणि त्यामुळे नोकरीही संपुष्टात येऊ शकते. दरम्यान या वृत्तावर इन्फोसिसकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
NITI Aayog Job: नीती आयोगात बंपर भरती, सरकारी नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज
Source link