Irrigation Department Job: राज्याच्या पाटबंधारे विभागात भरती, जाणून घ्या तपशील

Irrigation Department Job: महाराष्ट्र सरकारच्या पाटबंधारे विभागात (Irrigation Department Job) काम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

उस्मानाबाद पाटबंधारे मंडळ अंतर्गत ब्रांच इंजिनीअर (Branch Engineer)/ ज्युनिअर इंजिनीअर (Junior Engineer), सर्कल ऑफिसर/ नायब तहसीलदार (Circle Officer/ Naib Tehsildar)पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

ब्रांच इंजिनीअर, ज्युनिअर इंजिनीअर आणि सर्कल ऑफिसर/ नायब तहसीलदार पदाच्या एकूण ५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना उस्मानाबाद येथे नोकरी करावी लागणार आहे. यासाठी ६५ वर्षे इतकी वयोमर्यादा आहे.

BMC Recruitment: मुंबई पालिकेत विविध पदांवर भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

कृषी विज्ञान केंद्रात भरती, पदवीधरांना ५६ हजार पगार मिळविण्याची संधी
या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

याची अर्ज प्रक्रिया ८ सप्टेंबर २०२२ पासून सुरु झाली असून २३ सप्टेंबर २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांना आपले अर्ज कार्यकारी अभियंता, उस्मानाबाद मध्यम प्रकल्प विभाग, उस्मानाबाद येथे पाठवायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये विविध पदांची भरती, मराठी तरुणांना नोकरीची संधी

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

FYJC Admission: अकरावीची दुसरी विशेष फेरी सुरु

म. टा. प्रतिनिधी, पुणेराज्य मंडळाच्या दहावी फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची संधी मिळावी, यासाठी …

Out of School Student: जुलै महिन्यात २०९ मुले शाळाबाह्य

म. टा. प्रतिनिधी, पुणेपुणे जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने राबविलेल्या सर्वेक्षणात २०९ …