अंकुश अबोलीचा तिरस्कार करण्याचं मुख्य कारण होत ते म्हणजे सोनिया. अंकुशची पहिली गर्लफ्रेंड आणि अबोलीची बेस्ट फ्रेंड सोनियाची मालिकेत एंट्री होणार आहे. सोनियाच्या मृत्यूनंतर अंकुशला नाइजास्तव अबोलीशी लग्न करावं लागलं होतं. अबोलीनं देखील अंकुश मन जिंकली. सोनियाला विसरून अंकुश अबोलीबरोबर नवी सुरूवात करत असताना सोनिया दोघांच्या आयुष्यात परत येणार आहे.
हेही वाचा – Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’मालिकेच्या यशाचं कारण माहितेय का? मिलिंद गवळींनी केला खुलासा
मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शित झाला असून त्यात दाखवण्यात आल्यानुसार, अंकुश आणि अबोली यांची हळद दणक्यात सुरू असते. दोघे एकमेकांच्या प्रेमात बुडालेले असतात. तितक्यात एक बाई डोक्यावर पदर घेऊन मंडपात येते. ती बाई सोनिया सारखी दिसत आहे. ती खरंच सोनिया आहे की सोनियासारखी दिसणारी दुसरी कुणी हे मालिकेच्या येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
अबोली आणि अंकुश यांची सुरू असलेली हळद पाहून मंडपात आलेली सोनियासारखी दिसणाऱ्या बाईला मोठा धक्का बसल्याचं दिसत आहे. इतकंच नाही तर सोनियाचा लुक देखील पूर्णपणे बदल्याचं दिसत आहे. आधीची सोनिया फार मॉर्डन होती नवी सोनिया साडीत, डोळ्यात मोठं काजळं भरलेली दिसत आहे. आता सोनियासारख्या दिसणाऱ्या मुलीच्या येण्याचा अंकुश आणि अबोली यांच्या नात्यावर काय परिणा होणार? दोघांचं लग्न होणार का? हे पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या