गरोदरपणात होणाऱ्या मळमळ आणि उलट्यांसाठी घरगुती उपाय

गरोदर राहण्यासारखा आनंद महिलांना नसतो. पण या गरोदरपणाच्या काळात मळमळ, मॉर्निंग सिकनेस, उलट्या होणे यासारखे अनेक त्रासही सहन करावे लागतात. सकाळी उठल्या उठल्या पहिले तीन ते सहा महिने मळमळ होण्याचा त्रास होतो ज्याला मॉर्निंग सिकनेस असं म्हटलं जातं. तर काही महिलांना केवळ मळमळच होत नाही तर कोरड्या उलट्या अथवा अगदी सतत उलट्या होण्याचा त्रासही होतो. काही महिालांना कोणत्याही पदार्थांचा वास सहन होत नाही आणि उलट्या होतात. विशेषतः पहिल्या तीन महिन्यात हा त्रास अनेक गर्भवती महिलांना सहन करावा लागतो. सतत उलटी होत असेल तर शरीरातील ऊर्जा कमी होते आणि डिहायड्रेशनचा धोकाही संभवतो. त्यामुळे वेळीच यावर उपाय करावेत.

डॉक्टरांकडे कधी जावे?

गरोदरपणात मळमळ होणे अथवा उलट्या होणे हे सामाईक आहे हे सर्वांनाच माहीत आहे. त्वरीत डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासत नाही. मात्र याचा अधिक त्रास होत असेल तर मात्र तुम्ही डॉक्टरांकडे जावे. तसंच यावर कोणतंही औषध स्वतः ठरवून घेऊ नये. तुमच्या पोटात अजून एक जीव वाढत आहे, याचे भान ठेवावे आणि तज्ज्ञांकडून सल्ला घेऊनच औषध घ्यावे.

हेही वाचा :  प्लास्टिकच्या डब्ब्यांवरील तेल काही मिनिटांत होईल साफ, करुन पाहा हा सोपा उपाय

(फोटो क्रेडिट :Pexels)

थोड्या थोड्या वेळाने खात राहावे

हलका आहार घ्यावा आणि थोड्या थोड्या वेळाने खात राहावे. असे केल्यामुळे मळमळ कमी होते आणि उलट्याही होत नाही. गरोदरपणात मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाणे टाळावे. यामुळे उलट्या वाढू शकतात. त्यामुळे सकाळच्या वेळी उलटी होऊ नये यासाठी हे पदार्थ खाणे टाळावे आणि त्यानुसार आपल्या आहारात बदल करावा. गरोदरपणात आहार नक्की कोणता असायला हवा यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

सकाळी नाश्ता करणे आहे गरजेचे

खरंतर गरोदर असल्यानंतर सकाळी उठल्यानंतरच मळमळ व्हायला सुरूवात होते आणि त्यामुळे अनेकदा महिला नाश्ता करत नाहीत. पण असं करणं अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही उठल्यानंतर हलका नाश्ता करायला हवा. ज्यामध्ये टोस्ट, बिस्किट्स, इडली, सँडविच अथवा ब्रेड बटर अशा स्वरूपाचा हलका नाश्ता करावा. तेलकट पदार्थांचा नाश्ता करणे सहसा टाळावे. यामुळे मळमळ आणि उलट्यांचा अधिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे हे तुम्ही अजिबात नाश्त्यामध्ये खाऊ नका. पण नाश्ता न करणे हा यावरील उपाय नाही. तर मळमळ कमी करण्यासाठी हा सोपा घरगुती उपाय आहे.

हेही वाचा :  अर्जुन खोतकरांनी सर्वपक्षीय ठरावाची प्रत सोपवली, मनोज जरांगे म्हणाले 'आता अंतिम निर्णय...'

(वाचा – गरोदरपणात मधुमेहाने ग्रस्त आहात? गर्भावस्थेतील मधुमेहाची कशी घ्याल काळजी)

लिंबाचा वास घ्यावा

हा सर्वात सोपा घरगुती उपाय आहे. तुम्हाला कोणत्याही वासाने मळमळत असेल अथवा उलटी होत असेल तर तुम्ही गरोदर असताना लिंबाचा सुगंध घ्यावा. यामुळे तुम्हाला मळमळत असेल तर थांबेल. याशिवाय तुम्ही आल्याचा रस आणि लिंबाचा रस एकत्र मिश्रण करून थोड्या थोड्या वेळाने एक एक घोट पिऊ शकता. मात्र याचे सेवन अति प्रमाणात करू नका आणि सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांना विचारा.

(वाचा – नॉर्मल वा सीझर डिलिव्हरीनंतर ओल्या बाळंतिणीने काय काळजी घ्यावी)

शरीराला आवश्यक पातळ पदार्थांचे सेवन करावे

उलटीच्या त्रासामुळे शरीरातील पाणी कमी होते हे आपण आधीच जाणून घेतले आहे. यामुळे गरोदर महिलांना डिहायड्रेशनचा धोका संभवतो, जे बाळाच्या आणि तुमच्या आरोग्यासाठी योग्य नाही. त्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यासाठी दिवसातून आहाराच्या वेळेला अथवा नाश्त्याच्या वेळेला पातळ पदार्थांचे सेवन करावे. नारळाचे पाणी, सूप्स, रसाळ फळे, लिंबाचे सरबत अशा पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. तसंच तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ORS चा वापरही तुम्ही करू शकता. जेणेकरून तुमचे शरीर हायड्रेट राहण्यास मदत करते.

हेही वाचा :  हे 6 पदार्थ किडनीचे फिल्टर करतात कायमचे खराब, झपाट्याने वाढतात हे 7 भयंकर आजार, किडनी फेलमुळे होऊ शकतो मृत्यू

(वाचा – ‘या’ पद्धतीने प्रेग्नेंट न राहता अनुभवू शकता मातृत्व, अपत्य नसलेल्या दाम्पत्यासाठी हे मोठं वरदान)

विश्रांतीची सक्त गरज

सर्वात महत्त्वाचं म्हणजे गरोदर आहोत हे कळल्यानंतर अति काळजी घ्यायला नको मात्र तरीही विश्रांतीची गरज आहे. गरोदरपणामध्ये हार्मोन्समध्ये खूप बदल होतात. हार्मोनल बदलांमुळेच मळमळ होते आणि उलट्या होत असतात. हे कारण सहसा कोणाला माहीत नसतं. पण पहिल्या तीन महिन्यामध्ये गरोदर महिलांनी आवश्यक ती विश्रांती घ्यायलाच हवी. किमान ८ तास झोप मिळायला हवी. ही झोप पूर्ण होईल याची तुम्ही खात्री करून घ्या. त्याप्रमाणे आपली कामं संपवा आणि विश्रांती घ्या. यामुळे मळमळ आणि उलट्यांचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …