Success Story: पठ्ठ्यानं ८ सरकारी नोकऱ्यांवर सोडलं पाणी, IAS बनून स्वप्न खरं करुन दाखवलं

Success Story: सरकारी नोकऱ्या मिळविण्यासाठी हजारो उमेदवार स्पर्धा परीक्षेला बसतात. सरकारी नोकऱ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी किमान एक वर्ष तयारी करणे आवश्यक आहे, असे अनेकांना वाटते. आयएएस कुणाल यादवने यूपीएससी परीक्षेची तयारी केली आणि त्यात यश मिळवले. विशेष म्हणजे कुणालला सलग आठ सरकारी नोकऱ्यांची ऑफर मिळाली होती. पण त्याने आपली इच्छा असलेली सरकारी नोकरी निवडली. त्याची कहाणी जाणून घेऊया.

पूर्णवेळ नोकरीसोबतच यूपीएससी परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या सर्व इच्छुकांसाठी कुणालची कहाणी प्रेरणादायी आहे.शिकतीनगर, थेरवाडी येथे राहणारा कुणाल सुरुवातीपासूनच अभ्यासात खूप हुशार होता. तो जैन पब्लिक स्कूलमधून बारावीच्या बोर्ड परीक्षेत नॉन मेडिकल प्रकारात जिल्ह्यामध्ये अव्वल ठरला. यानंतर कुणालने दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून बीएससी पूर्ण केले. त्यांने नॉन-मेडिकल स्ट्रीममध्ये रसायनशास्त्राचे शिक्षण घेतले.

Success Story: कोणी रस्त्यावर अंडी विकली तर कोणी सायकलचे पंक्चर काढले,परिस्थितीवर मात करुन बनले सरकारी अधिकारी

२०१५ पासून तयारीला सुरुवात

आयएएस कुणाल यादवने २०१५ मध्ये पदवीनंतर प्रशासकीय सेवेसाठी तयारी सुरू केली. २०१५ मध्ये त्याने पहिल्यांदा एसएससी सीजीएल परीक्षा उत्तीर्ण केली. पण त्याला ही नोकरी आवडली नाही म्हणून त्याला त्यात जॉईन व्हायचे नव्हते. नंतर त्याने स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पीओ पदासाठी अर्ज केला आणि त्यातही त्यांची निवड झाली.

हेही वाचा :  Bigg Boss 16: कोण आहे शिव ठाकरे? न्यूजपेपर, दूध विकून केली करिअरची सुरुवात

दररोज १० ते १२ तास अभ्यास करणार्‍या आयएएस कुणाल यादवने यूपीएससी परीक्षा २०२० च्या दुसऱ्या प्रयत्नात १८५ वा क्रमांक मिळविला. आयएएस प्रशिक्षणानंतर, २०२१ मध्ये त्याची दिल्लीच्या आयकर विभागात निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. यूपीएससी परीक्षेची तयारी नोकरीसोबतच करता येते याचे तो मुर्तिमंत उदाहरण आहे. आपण दररोज दहा ते बारा तास काम करायचो असे तो सांगतो.

Success Story: गरोदरपणाच्या नवव्या महिन्यात दिली UPSC परीक्षा, IPS पूनम यांची कहाणी लाखो तरुणांना देईल प्रेरणा
Success Story: इंजिनीअरिंग करणारी सृष्टी देशमुख पहिल्याच प्रयत्नात बनली आयएएस अधिकारी

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …