VIDEO : जय हिंद ऐवजी अल्ला हु अकबरच्या घोषणा; प्रजासत्ताक दिनी विद्यापीठात धक्कादायक प्रकार

Republic Day 2023 : देशभरात गुरुवारी 74वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) उत्साहात साजरा करण्यात आलाय. राजधानी दिल्लीत (Delhi) पथसंचलनातून भारताने आपली ताकद दाखवली आहे. विविध सरकारी कार्यालये, महाविद्यालयांमध्ये देखील प्रजासत्ताक दिन साजरा करण्याता आलाय. मात्र अलिगढ मुस्लिम विद्यापीठात (Aligah Muslim University) झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. तिरंगा फडकावल्यानंतर विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांनी धार्मिक घोषणा दिल्याच्या व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पोलीस प्रशासनाने (Police) देखील या प्रकरणाची दखल घेतली असून कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

त्यामुळे अलीगड मुस्लिम विद्यापीठ पुन्हा एकदा वादात सापडले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यापीठ परिसरात धार्मिक घोषणाबाजी (Religious sloganeering) करण्यात आली. हे प्रकरण आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणखीनच पेटले आहे. पोलीस प्रशासनाने याची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधून घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची चौकशी करून ३ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश विद्यापीठ प्रशासनाने दिले आहेत. 

कुलगुरुंच्या समोरच घोषणाबाजी

प्रजासत्ताक दिनानिमित्त अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू तारिक मन्सूर यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला. तिरंगा फडकवताच  काही विद्यार्थ्यांनी कुलगुरूंच्या उपस्थितीतच अल्ला हु अकबरच्या घोषणा दिल्या. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये डझनभराहून अधिक विद्यार्थी धार्मिक घोषणा देताना दिसत आहेत. कुलगुरू तारिक मन्सूरही तिथेच उपस्थित असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

हेही वाचा :  ...तसं सर मला पायदळी तुडवतात; प्रजासत्ताक दिनावर चिमुकल्याचे भाषण ऐकून पोट धरुन हसाल

नेमकं काय झालं?

“या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नारे तकदीर अल्ला हु अकबरच्या घोषणा दिल्या. ही एक लढाईची आणि धार्मिक घोषणा आहे. ही घोषणा त्यांची विचारसरणी दर्शवते. अशा घोषणा देऊन तुम्ही कोणता संदेश द्यायचा प्रयत्न करत आहात? आज संपूर्ण देश भारतीय राज्यघटनेसमोर नतमस्तक झाला आहे. अशा परिस्थितीत या पद्धतीच्या घोषणा देत ते भारतात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत,” अशी प्रतिक्रिया विद्यापिठाचे माजी विद्यार्थी डॉक्टर नितेश शर्मा यांनी दिली आहे.

दरम्यान, विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी सुरू केली आहे. प्राध्यापक वसीम अली यांनी सांगितले, “या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. कार्यक्रम संपल्यानंतर ही घोषणाबाजी झाली. यामध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्याचा सहभाग आहे, याचा शोध सुरू आहे. विद्यार्थ्याची ओळख पटल्यानंतर सत्याच्या आधारे कठोर कारवाई केली जाईल.”



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …