चेहऱ्यावरील केसांमुळे त्रस्त आहात ? मग हे काम करा वेदनाशिवाय मिळेल आराम, करीना कपूर देखील वापरते हा जालिम उपाय

अनेक महिलांना चेहऱ्यावरील लव अर्थात बारिक केसांमुळे हैराण असतात. प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असं वाटतं. पण चेहऱ्यावरील बारीक केस सौदर्यमध्ये बाधा बनतात. परंतु घरातील काही उपायांमुळे तुम्ही चेहऱ्यावरील केस काढू शकता. तुम्ही देखील या समस्येचा सामना करत असाल तर हे काही भन्नाट उपाय फक्त तुमच्यासाठी. या उपायांमुळे तुम्हाला त्रास होणार नाही. चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी आपण एक खास पेस्ट घरी तयार करू शकतो. ज्यामुळे चेहऱ्यावरील केस जाण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: टाईम्स ऑफ इंडिया)

​साखर आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण लावा

साखर एक नैसर्गिक एक्सफोलिएटिंग एजंट आहे जे गरम केल्यावर केसांना चिकटते आणि चेहऱ्यावरील केस काढून टाकते. लिंबाचा रस गळणाऱ्या केसांसाठी नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करतो. तसेच त्वचेचा टोन हलका होण्यास मदत होते. याचा वापर केल्याने वेदनादायक चेहऱ्यावरील वॅक्सिंगपासून सुटका मिळू शकते. चेहऱ्यावर नको असलेले केस काढण्यासाठी दोन चमचे साखरेत लिंबाचा रस मिसळा आणि त्यात ८-९ टेबलस्पून पाणी घाला. आता हे मिश्रण गरम करा आणि नंतर थंड होऊ द्या. हे मिश्रण थंड झाल्यानंतर ही पेस्ट तुम्ही चेहर्‍यावर लावा. त्यानंतर ही पेस्ट चेहर्‍यावर २०-२५ मिनिटे अशीच राहू द्या. या मिश्रणाचा वापर तुम्ही तुमच्या हाताच्या एका भागावर करुन पाहा.

हेही वाचा :  Vegetable Price Hike : कोथिंबीरीची जुडी शंभरीपार; वाढलेल्या दरांनी गृहिणींचं बजेट कडाडलं

​तांदळाचा लेप

घरात असणाऱ्या तांदळाच्या पिठाचा वापर केल्याने तुम्ही चेहऱ्यावरील नको असणारे केस काढू शकता. यासाठी तुम्ही तांदळ्याच्या पिठात गुलाब पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करु शकता. ही पेस्ट चेहऱ्याला लावून ठेवा. त्यानंतर २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील केस काढून टाकण्यास मदत होईल. (वाचा :- 17 वर्षांच्या मुलाच्या चेहऱ्यापासून संपूर्ण शरीरावर केसच केस, वेअरवॉल्फ सिंड्रोमने ग्रस्त; चावेल की काय, मित्रांना भीती)

​बेसन आणि हळद मिक्स करून चेहर्‍यावर लावा

जर तुम्हाला चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांचा त्रास होत असेल तर बेसन आणि हळद यांचा पॅक लावा. बेसनामध्ये गुलाबपाणी आणि हळद मिसळून त्याची पेस्ट बनवा. ही तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून ठेवा आणि चेहरा पाण्याने धुवा. याने तुम्हाला चेहर्‍यावरील नको असलेल्या केसांपासून मुक्तता मिळते. तसेच तुम्ही हा पॅक आठवड्यातून दोनदा लावू शकता. (वाचा :- वयाच्या ५० व्या वर्षीही विशीतील वाटाल, एक्सपर्टने सांगितले 7 Anti Ageing Foods, आहारात आजच समावेश करा)

करीना कपूर करते हा उपाय

युट्यूबरील एका व्हिडीओप्रमाणे शरीराप्रमाणेच चेहऱ्यावर देखील छोटे छोटे केस असतात. मात्र हे केस कसे कमी करता येईल हा प्रश्न देखील काही मुलींना सतावत असतो. अशावेळी शेव करत तुम्ही चेहऱ्यावरील हे केस काढू शकत नाही. मग तुम्ही याला पर्याय म्हणून चेहऱ्यावर ब्लीच करू शकता. ब्लीच हा यावरील एक उत्तम पर्याय आहे. अभिनेत्री करीना कपूर खान देखील एखादं फोटोशूट करण्यापूर्वी ब्लीच करण्यासाठीच पसंती देते. फोटोशूट दरम्यान चेहऱ्यावरील केस देखील अधिक दिसतात. म्हणूनच करीना ब्लीच करते. तुम्ही सुद्धा हा उपाय करू शकता. किंवा नॅचरल ब्लीच देखील चेहऱ्यासाठी उत्तम ठरू शकतं.

हेही वाचा :  'आमची विचारधारा BJP, शिवसेनेसारखीच'; रात्रीच्या गुप्त बैठकीवर मनसे म्हणाली, 'युती करायची याचा..'

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …