Dry Scalp Remedies: कोरड्या स्काल्पमुळे केस होत असतील खराब तर ट्राय करा हे ५ उपाय

आपल्या सौंदर्यात केसांची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. केसांची सुंदरता वाढविण्यासाठी केवळ महिलाच नाही तर पुरुषही अनेक उपाय करताना दिसून येतात. पण प्रत्येकाला घनदाट केस मिळतातच असं नाही. धूळ, माती, प्रदूषण या कारणांमुळे केस अत्यंत कोरडे आणि निस्तेज होतात.

त्याहीपेक्षा स्काल्पच्या समस्येमुळे केसांवर अधिक परिणाम होताना दिसून येतो. कोरड्या स्काल्पमुळे अनेकदा केस कोरडे होतात आणि निस्तेजता डोळ्यात दिसून येते. तसंच केसगळतीही होते. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी आणि कोरड्या स्काल्पच्या समस्येतून बाहेर येण्यासाठी वापरा खाली दिलेले घरगुती उपाय.

कोरफड जेल

कोरफड जेल ही त्वचेसह केसांसाठीही फायदेशीर ठरते. तसंच यामध्ये अधिक औषधीय गुणांचा समावेश आहे. अँटीफंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणांनी युक्त अशा कोरफड जेलचा त्वचेला हायड्रेट करण्यासाठी उपयोग केला जातो. दरम्यान कोरड्या स्काल्पसाठीही याचा उपयोग करता येतो. कोरफड जेल स्काल्पला लावल्यास, स्काल्पमध्ये दमटपणा राहतो.

  • कोरफडच्या पानातील ताजी जेल काढून त्यात थोडेसे पाणी मिसळा आणि मग ते तुमच्या स्काल्पला लावा
  • त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा
  • साधारण १५-२० मिनिट्सने केस धुऊन घ्या
  • आठवड्यातून तुम्ही हा प्रयोग दोन वेळा केल्यास याचा फायदा मिळेल
हेही वाचा :  आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ; दिशा सालियन मृत्यूप्रकरणी SIT चौकशी होणार

लिंबू

लिंबामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळते. तसंच विटामिन ई आणि ए देखील यामध्ये असते. याशिवाय लिंबातील फोलिक एसिड आणि फॅटी एसिडदेखील फायदेशीर ठरते. ड्राय स्कॅल्पची समस्या दूर करण्यासाठी हे सर्व पोषक तत्व फायदेशीर ठरतात. लिंबाचा रस केसांना लावल्यामुळे केवळ ड्राय स्काल्पच्या समस्यांपासून सुटका मिळथ नाही, तर केसांचा विकास होण्यासाठीही याचा उपयोग होतो.

  • लिंबाचा रस काढून घ्या
  • हाताच्या बोटाच्या मदतीने तुम्ही केसांना हा लिंबाचा रस लावा
  • त्यानंतर साधारण १०-१५ मिनिट्स तसंच राहू द्या आणि मग केस धुवा
  • आठवड्यातून दोन वेळा तुम्ही ड्राय केसांच्या समस्येसाठी हा उपाय करू शकता

ऑईलिंग

ऑईल मसाज हा केसांसाठी उत्तम ठरतो. ऑईल मसाज ड्राय स्काल्पपासून सुटका मिळविण्यासाठी उपयुक्त असून सर्वात सोपा आणि परिणामकारक उपाय आहे. कोणत्याही नैसर्गिक तेलाने अर्थात नारळाचे तेल, जोजोबा ऑईल, ऑलिव्ह ऑईल अथवा कॅस्टर ऑईलचा वापर तुम्ही हा मसाज करण्यासाठी करावा. हे तेल स्काल्प हायड्रेट करण्यासह डोक्यातील मळ, घाण काढण्यासही उपयुक्त ठरतात. यापैकी कोणतेही तेल कोमट करा आणि केसांना हलक्या हाताने मालिश करा. तुम्हाला फायदा मिळतो.

हेही वाचा :  मुलीने क्रिमऐवजी चेहऱ्याला लावली मेहंदी, पुढे जे झालं ते बघून गडबडून जाल

(वाचा – त्वचा आणि केसांसाठी वरदान आहे कापराचे तेल, जाणून घ्या फायदे)

बेकिंग सोडा आणि गुलाबपाणी

अंटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल असणारा बेकिंग सोडा वापरून तुम्ही या समस्येपासून दूर राहू शकता. हे स्काल्पवरील पीएच कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. ज्यामुळे केसांना अधिक मुलायमपणा मिळतो.

  • बेकिंग सोडा आणि गुलाबपाणी मिक्स करून पेस्ट तयार करा
  • साधारण ३-४ मिनिट्स हलक्या हाताने मसाज करा
  • मग पाण्याने धुऊन घ्या

(वाचा – हिवाळ्यात केसांची निगा कशी राखाल? केसांच्या आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम टाळा)

विटामिन ई-कॅप्सुल

विटामिन ई-कॅप्सुल ही त्वचेसह केसांसाठीही उपयोगी आहे. यातील गुणधर्मामुळे कोरड्या स्काल्पला मुलायमपणा मिळतो आणि त्याशिवाय केसांची वाढही उत्तम होते. विटामिन ई कॅप्सुलमधील आढळणारे तेल हे बाहेर काढून त्याने स्काल्पवर मसाज करा आणि मग साधारण एक तासाने केस धुवा. केसांवरील परिणाम दिसून येईल.

वर दिलेले उपाय हे अत्यंत सोपे आहेत. याने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. मात्र तुम्हाला यापैकी कोणत्याही गोष्टीची अलर्जी असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचा वापर करावा.

(वाचा – Hair Care: आई कुठे काय करते मधील अरूंधतीसारखे घनदाट केस हवेत? मग या गोष्टी करतील मदत)

हेही वाचा :  स्कूटरला धडक देणारी कारच घेऊन पळाला तरुण, पुण्यातल्या बाणेर येथील अजब घटना

(फोटो क्रेडिटः Freepik.com)

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …