शाळेच्या दप्तराऐवजी बापाच्या गरीबीची ओझ खांद्यावर घेतलं; पोराच्या मेहनीतीनं डोळ्यात पाणी आणलं

Viral Video: परिस्थिती माणसाचं आयुष्य बदलून टाकते. विशेषत: आर्थिक परिस्थिती प्रत्येकाच्याच आयुष्यात लक्षणीय बदल घडवते. काहीजण परिस्थितीशी दोन हात करुन लढण्याऐवजी हार मानतात. मात्र, हलाकीच्या परिस्थीतही न डगमगता पुढे जायचं कसं? हे एका लहान मुलाने शिकवले आहे. एका लहान मुलाचा व्हिडोओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शाळेच्या दप्तराऐवजी या पोरानं बापाच्या गरीबीची ओझ खांद्यावर घेतलं आहे. या  पोराच्या मेहनीतीनं डोळ्यात पाणी आणलं आहे. 

आजही देशात गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी कायम आहे. इतर सोई-सुविधा दूरच राहिल्या. पण अनेकांना दोन वेळच्या जेवणासाठी देखील जीवतोड मेहनत करावी लागते. अशा कुटुंबात वाढणारी मुलं लहान वयातचं मोठी होतात. अशाच एकाच मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

घराच्या परिस्थितीला हातभार लावण्यासाठी हा मुलगा घेत असलेले कष्ट पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.  @Gulzar_sahab नावाच्या  ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. “बाप गरीब हो तो बेटे जल्दी बड़े हो जाते हैं” अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ आणि कॅपश्नमध्येच सारंकाही आलं आहे. 

हेही वाचा :  मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बाप गरीब असला की मुलं लवकर मोठी होतात. व्हिडिओत दिसणारा मुलगा अत्यंत एका जबाबदार व्यक्ती प्रमाणे पावसाची पर्वा न करत मेहनत करत आहे. पाठीवर खेळण्यांची टोपली घेऊन तो पावसातही मेहनत घेत आहे. टोपलीतील खेळणी भिजूनयेत म्हणून त्याने त्यावर एक प्लास्टिकचा कागद गुंडाळला आहे. मात्र, तो स्वत: पावसात भिजत आहे. खेळणी विकून चार पैसे कमवण्याची या पोराची धडपड पाहून डोळ्यात पाणी येत आहे. 

हा मुलगा पावसात भिजत खेळणी विकत आहे. एका बाईकस्वाराने थांबून या मुलाकडून खेळणी विकत घेतली. एकाची किंमत किती? असा प्रश्न हा व्यक्ती विचारतो. मुलगा सांगतो दहा रुपये. हा व्यक्ती सर्व खेळणी विकत घेतो. यानंतर तो मुलाला 200 रुपयांची नोट देतो. मुलगा सांगतो परत देण्यासाठी सुटे पैसे नाहीत.  ‘ठेव, बेटा कष्ट करत आहे’ असे म्हणत तो व्यक्ती या मुलाच्या मेहनतीचे कौतुक करतो.

सर्व खेळणी विकून 200 रुपये मिळाल्याचा आनंद या मुलाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. या मुलाचे निरागस हास्य न बोलता खूप काही सांगून गेलं. परिस्थितीवर मात कशी करायची. हतबल न होता अगदी कोणत्याही स्थितीतीचा धीराने आणि संयमाने सामना कसा करायचा हे या एका व्हिडीओतून दिसले. 

हेही वाचा :  'अरे बापरे! सिंचन घोटाळा फेम अजित पवारांना..'; फडणवीसांचं पत्र वाचून संजय राऊतांचा टोला

30 सेकंदांचा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत 1,64,000 हून अधिक वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. तर, 12,000 पेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. या व्हिडिओवर कमेंट्सचा देखील वर्षावर होत आहे. अनेकांनी या मुलाच्या मेहनीचे कौतुक करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हा व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकलेले नाही. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

जशास तसा न्याय! बलात्काराच्या खोट्या आरोपात त्याने जे भोगलं तिच शिक्षा कोर्टाने तरुणीला सुनावली

Woman Jail For false Testimony In Rape Case: उत्तर प्रदेशमधील बरेली येथील कोर्टाने शनिवारी एका प्रकरणात …

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …