New Year 2023 Resolutions: नव्या वर्षात चुकूनही करु नका ‘हे’ 5 संकल्प

New Year 2023 Resolutions: सरत्या वर्षाची चाहूल लागली की सर्वांचं डोकं चाळवतं ते म्हणजे येणाऱ्या वर्षाचा संकल्प शोधण्यासाठी. नवं वर्ष म्हटलं की नवा संकल्प आलाच आणि तो नवा संकल्प आला की त्याला पूर्णत्वास नेण्यासाठीचा आटापिटाही आलाच. यंदाच्या वर्षीसुद्धा हेच चित्र पाहायला मिळालं. तुम्हीही असा कोणता संकल्प केला आहे का? चांगली गोष्ट आहे. पण, तो पूर्णही करा. कारण, संकल्प पूर्ण न झाल्यास होणारी निराशा सर्वांनाच सहन होते अशातला भाग नाही. (New Year 2023 these 5 New Year resolutions you should never make mind it )

ही निराशा टाळण्यासाठी तुम्ही काही संकल्प न केलेलेच बरे. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीसाठी असमर्थ आहोत याची खंत किमान तुम्हाला भासणार नाही. 

अमुक एक किलो वजन कमी करु (weight control) –

आपण स्थूल आहोत या जाणीवेनं अमुक किलो वजन कमी करु असा संकल्प तुम्ही केला असेल किंवा करणार असाल तर ही चूक करु नका. त्याऐवजी (Gym) जीम लावून, चांगल्या जीवनशैलीला अंगी बाणवून आणि संतुलित आहार घेऊन वजन नियंत्रणात कसं राहील यावर भर द्या. शारीरिक सुदृढतेवर जोर द्या. मानसिक आरोग्यही जपा. 

हेही वाचा :  27 December History: हाहाकार, हजारो मृत्यू... आजचा दिवस सारं जग विसरु शकत नाही, का ते पाहा...

डाएटिंग सुरु करू (diet)-

वजन वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी मी हेच पदार्थ खाणार, (Rice carbs content) मी भात बंद करणार, मी भाज्या नाही खाणार किंवा मग मी केटो डाएट (keto diet) करणार असा कोणताही संकल्प तुम्ही करु नका. याऐवजी नियमित व्यायाम करुन शरीराला गरजेची सर्व पोषक तत्वं देण्याचा निर्धार करा. डाएटिंगच्या नावावर स्वत:चा भूकबळी जाणार नाही याची काळजी घ्या. तज्ज्ञांचा सल्ला घ्या. 

या वर्षी मनाजोगा जोडीदार शोधू (relationship, wedding)-

आयुष्यात आपल्यावर प्रेम करणारं कुणीतरी सोबत असावं ही फार सुरेख अनुभूती आहे. पण, काही गोष्टी ठरवून होत नाही. इथंसुद्धा हाच नियम लागू आहे. त्यामुळे अट्टहासानं प्रेमाचं माणूस शोधण्यापेक्षा आधी स्वत:वर प्रेम करायला शिका. स्वत:चं महत्त्वं ओळखा आणि बघा पुढे काय घडतं… 

भरपूर फिरू (travelling)-

भटकंती कुणाला आवडत नाही? पण, आयुष्याप्रतीसुद्धा आपल्या काही जबाबदाऱ्या असतात. त्यामुळं वर्षाचे 365 दिवस तुम्हाला भटकंती करणं शक्य होणारच नाही. हो, पण व्यग्र वेळापत्रकातून सवड काढत एखाद्या सुरेख ठिकाणी तुम्ही छान फिरुन येऊ शकता. त्यामुळं भरपूर फिरू, मज्जा करु असा संकल्प करण्यापेक्षा आपण नक्की कुठेतरी फिरण्यासाठी जाऊ आणि त्या आठवणी जपू अशी खुणगाठ मनाशी बांधा. 

हेही वाचा :  महाराष्ट्रात मान्सून कधी धडकणार? हवामान विभागाने दिली आनंदाची बातमी; अंदमानात दाखल

सोशल मीडियाचा वापर टाळू (Social Media use) –

सध्याचा काळ, सध्याची पिढी ही टेकसॅव्ही आहे. त्यामुळं या शर्यतीमध्ये तुम्हीही सहभागी होणं अपेक्षित आहेत. कंटाळा येईल, तुम्ही थकालही पण हार मानू नका. ज्या सोशल मीडियामुळे आमच्या स्वभावावर नकारात्मक परिणाम झाले असे आरोप तुम्ही करताय त्याचा वापर करणं बंद करु असा संकल्प करु नका. कारण याच सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या ज्ञानातही भर पडू शकते. तुम्हाला सकारात्मकतेचा स्त्रोतही मिळू शकतो. त्यामुळं सोशल मीडियाचा वापर पूर्णपणे टाळू याऐवजी या सुविधेचा वापर बेतानं करु असा निर्धार करा. स्वत:ला चांगल्या सवयी लावा. 

संकल्प करायचा म्हणून काहीही ठरवण्यापेक्षा आपल्याला खरंच काहीतरी छान करावंसं वाटतंय, आयुष्यात काहीतरी नवं हवंय या हेतूनं लहानमोठे बदल नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून करा. अपयश आलं खचून जाऊ नका. कारण, या नव्या वर्षात तब्बल 365 नव्या संधी तुम्हाला मिळणार आहेत. तयार आहात ना नशिब आजमावायला? 

Happy New Year!!!Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

धावत्या स्कूल व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि… काळजचा थरकाप उडवणारा Video

School Van Incident CCTV : शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅनसाठी (School …

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका …