‘लावणी क्वीन’ गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ

Gautami Patil : ‘लावणी क्वीन’ गौतमी पाटील (Gautami Patil) गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त मुद्द्यामुळे चर्चेत आहे. पण आता गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ झाली आहे. सातारा (Satara) न्यायालयाने गौतमीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

नेमकं प्रकरण काय? 

गौतमी पाटील अश्लील डान्स करत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रतिमा शेलार यांनी गौतमी तिच्या नृत्यात अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. आता त्यांच्या तक्रारीची दखल घेत सातारा न्यायालयाने गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

गौतमीने आपल्या सौंदर्याने आणि अदांनी महाराष्ट्रालील गावागावांतील सर्वच तरुणांना भूरळ घातली आहे. पण दुसरीकडे गौतमीच्या नृत्याने काही महिलांच्या भावना दुखावल्या आहेत. लावणी ही लोककला आहे. लोककलेत अश्लिलता येत नाही. लावणीकडे बघण्याचा समाजातील महिलांचा दृष्टीकोन बदलत असताना गौतमीने लावणीची संस्कृती जपावी, लावणी सादर करताना त्यात अश्लीलपणा करू नये असं म्हणत तिच्यावर अनेकदा टीका करण्यात आली आहे. 

गौतमीच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर तिच्यावर टीका करण्यात आली. समाजातील वेगवेगळ्या स्तरातील मंडळींसह लावणी क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी देखील गौतमीवर टीका केली होती. त्यानंतर गौतमीने जाहीर माफी मागितली होती. 

हेही वाचा :  राम चरण आणि ज्युनियर एनटीआरने आमिर खानला शिकवला डान्स, 'नाटू नाटू' गाण्याचा व्हिडीओ व्हायरल

news reels New Reels

गौतमी पाटील झळकणार रुपेरी पडद्यावर! (Gautami Patil Movie)

गौतमीने आपल्या नृत्याने सर्वांनाच वेड लावलं आहे. पण लवकरच ती रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ‘घुंगरु’ असे तिच्या आगामी सिनेमाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या सिनेमाची घोषणा झाली असून या सिनेमाचं शूटिंग महाराष्ट्रातील विविध गावांसह परदेशातदेखील झालं आहे. या सिनेमात गौतमी नक्की कोणतं पात्र साकारणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.


गौतमी पाटील कोण आहे? (Who Is Gautami Patil)

गौतमी पाटील सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. 26 वर्षीय गौतमीने आपल्या नृत्याने सर्वांनाच वेड लावले आहे. अनेक कार्यक्रमासाठी गौतमीला लावणी सादर करण्यासाठी बोलवतात. एका कार्यक्रमासाठी गौतमी चांगलच मानधन घेते. गौतमीचा मोठा चाहतावर्ग आहे. 

संबंधित बातम्या

Pune gautami patil : गौतमी पाटीलचा निमगाव केतकीतील लावणीचा कार्यक्रम रद्द; गावकऱ्यांनी कार्यक्रमासाठी जागाच दिली नाही



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …