रणवीरने ट्विटर (Ranvir Shorey Twitter) पोस्ट शेअर करताना त्याच्या वडिलांना ‘प्रेरणा आणि सुरक्षेचा सर्वात मोठा स्रोत’ म्हटले आहे. त्याने वडिलांसोबत एक हसऱ्या चेहऱ्याचा फोटो शेअर केला. ही पोस्ट करताना रणवीरने असं लिहिलं आहे की, ‘माझे प्रिय वडील, कृष्ण देव शौरी यांची वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. ते नेहमी नातवंड-पंतवंडांमध्ये असायचे. त्यांनी खूप जबरदस्त आठवणी आणि प्रशंसक मागे ठेवले आहेत. मी माझ्या प्रेरणा आणि सुरक्षिततेचा स्रोत गमावला’
रणवीरच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांना श्रद्धांजली (KD Shorey Death) वाहिली. अनेकांनी पोस्ट करुनही केडी यांच्या आठवणींना उजाळा दिला. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी शौरी कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. अनेक चाहत्यांनीही कमेंट्स केल्या आहेत.
हे वाचा-प्रिया बारावीत असताना पडलेली उमेशच्या प्रेमात; लव्ह स्टोरीमध्ये ९ आणि १८ तारखा खास
कृष्ण देव शौरी यांनी १९८८ साली गुलशन ग्रोव्हर, मुकेश खन्ना, कादर खान आणि परेश रावल याचा सिनेमा ‘महा-युद्ध’चे दिग्दर्शन केले होते. त्यांनी ‘बेरहम’, ‘बद और बदनाम’ इ. यासारख्या सिनेमांची निर्मितीही त्यांनी केली आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या