डोहाळे पुरवा! बिपाशा बासूचा ओटीभरण कार्यक्रम उत्साहात, बोल्ड नायिकेवर खुलला पारंपरिक लुक

मुंबई- बॉलिवूडच्या अभिनेत्रीच्या बाबतीत काही ना काही चर्चा सुरूच असते. त्यांचं कुणाशी अफेअर आहे, कुणाशी ब्रेकअप झालं यामध्ये चाहत्यांना फार रस असतो. मग त्यांनी लग्न केलं की गुडन्यूज कधी देणार याकडे लक्ष लागतं. बॉलिवूडमध्ये बोल्ड भूमिकांनी चर्चेत असलेल्या बिपाशा बासू हीदेखील नेहमीच अशा चर्चांमध्ये असायची. पण सध्या मात्र तिची चर्चा आहे ती तिच्याकडे असलेल्या गुडन्यूजमुळे. लवकरच बिपाशा आई होणार आहे. अभिनेता करणसिंग ग्रोव्हरशी लग्नानंतर ६ वर्षांनी त्यांना बाळ होणार आहे. नुकताच बिपाशाचा ओटीभरण्याचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमातील बिपाशाचा पारंपरिक लुक तुफान व्हायरल होत आहे.

विवेक अग्निहोत्रींसोबत रंगायच्या सुशांतच्या गप्पा! शेअर केला अभिनेत्याचा हसरा सेल्फी

गेल्या काही दिवसांत अभिनेत्रींच्या प्रेग्नन्सीची चर्चा धुरळा उडवत आहे. आलिया भट्ट पाठोपाठ बिपाशा आणि करण यांनीही त्यांच्याकडे गुडन्यूज असल्याचं सांगितलं. बिपाशाच्या चाहत्यांना तर या बातमीने खूपच आनंद झाला. सध्या बिपाशा तिच्या प्रेग्नन्सीचा अनुभव घेत आहे. काही दिवसांपूर्वी बिपाशा आणि करण यांनी बेबी बम्पसोबत खास फोटोशूटही केलं. या फोटोंना नेटकऱ्यांनी खूप कमेंट केल्या. आता बिपाशाच्या सोशलमीडियावरची वॉल गाजतेय ती तिच्या डोहाळेजेवणाच्या फोटोंनी.


बिपाशाच्या ओटी भरणाचा खास कार्यक्रम रंगला. अतिशय साध्या पध्दतीने आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत बिपाशाचे डोहाळे पुरवण्यात आले. यावेळी बिपाशाने गुलाबी रंगाची बनारसी साडी नेसली आहे. कपाळावर लावलेली मोठी टिकली बिपाशाच्या सौंदर्यात भर घालत आहे. प्रेग्नंन्सीचा ग्लो बिपाशाच्या चेहऱ्यावर आला आहे. तर करणने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. ओटीभरण्याचे फोटो बिपाशाने तिच्या सोशलमीडियावर शेअर केले आहेत. बिपाशा आणि करण तर त्यांच्या बाळाची वाट पाहत आहेतच पण त्यांच्या चाहत्यांनाही आता बिपाशा कधी एकदा आई होतेय याची आतुरता लागली आहे.

बिग बॉसमध्ये जाणार? हार्दिक जोशीच्या उत्तरानं प्रेक्षक पडले बुचकळ्यात


२०१५ साली अलोन सिनेमात बिपाशा आणि करण यांनी एकत्र काम केले होते. त्यापूर्वी करण हा मालिकांमध्ये काम करत होता, तर बिपाशाने मोठ्या पडदयावर अनेक बोल्ड भूमिका केल्या होत्या. अलोन या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दोघांची जवळीक वाढली. २०१६ मध्ये बिपाशा आणि करण यांनी लग्नं केलं. बिपाशाचं हे पहिलं लग्नं असलं तरी करणची आधी दोन लग्न झाली होती. त्यांच्यापासून करणने घटस्फोट घेतला असून बिपाशा ही करणची तिसरी बायको आहे.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

महेश मांजरेकरांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा ; लेकीसह झळकणार ‘हे’ मराठी कलाकार

मुंबई, 09 सप्टेंबर :मराठी चित्रपटसृष्टीतील प्रयोगशील अभिनेता, दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर ओळखले जातत्. सतत काहीतरी …

ऋतुजा बागवेनं वाढदिवशी स्वतःलाच दिलं खास गिफ्ट; चाहत्यांकडून होतयं कौतुक

मुंबई, 09 सप्टेंबर : मराठी मनोरंजन विश्वात लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये ऋतुजा बागवे हिचा देखील समावेश होतो. …