Digital University: विद्यार्थ्यांच्या कौशल्य वाढीसाठी २६० नवीन टीव्ही चॅनेल सुरू करणार

Digital University: विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी (NEP) अंतर्गत तंत्रज्ञानावर आधारित दृष्टिकोन आणि डिजिटल विद्यापीठ यांसारखे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतील असे विधान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने एक मजबूत आणि लवचिक व्यवस्था निर्माण करणे याला सरकारचे प्राधान्य असल्याचे ते यावेळी म्हणाले.

दर्जेदार आणि परवडणारे शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि देशातील मोठ्या लोकसंख्येला औपचारिक शिक्षण आणि सिद्ध कौशल्य पायाभूत सुविधा दिल्या जाणार आहेत. यासाठी नवनवीन आणि नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करण्यावर भर दिला जात आहे. एनईपी २०२२ ईसीसीई स्तरापासून प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि एक जीवंत आणि न्याय्यसंगत ज्ञान समाज निर्माण करण्याचा दृष्टीकोन दिला जाणार आहे. रोजगारक्षमतेला चालना देण्यासाठी आम्ही शालेय आणि उच्च शिक्षणासह कौशल्य शिक्षण एकत्रित करण्याच्या दिशेने काम करत असल्याचे यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणाले.

नोकरीचे स्वरूप बदलतेय
नोकऱ्यांचे स्वरूप बदलत असल्याचे यावेळी धर्मेंद्र प्रधान म्हणाले. औद्योगिक क्रांती ४.० आमच्यासाठी एक आव्हान आणि कौशल्य वाढवण्याची, आमच्या विशाल लोकसंख्येला अपग्रेड करण्याची संधी देते. कौशल्ये वाढविण्याच्या प्रक्रियेत सर्वसमावेशक बदल घडवून आणण्याची गरज असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

‘आयटीआय’कडे वाढता कल; तीनच दिवसांत ८५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी
हिंदी भाषा येत असेल तर ‘या’ क्षेत्रात करा करीअर, मिळेल चांगली नोकरी आणि भरघोस पगार
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपल्या विद्यार्थी आणि तरुणांना नवीन युगातील कल्पना आणि कौशल्याधारित वैश्विक नागरिक बनण्यास मदत करते. तसेच भारताला २१ व्या शतकातील ज्ञान अर्थव्यवस्था बनण्यासाठी भारतीय भाषा शिकण्याला प्राधान्य देते असेही ते म्हणाले.

डिजीटल शिक्षण प्रत्येक मुलापर्यंत पोहोचविण्याचा उद्देश
याअंतर्गत उच्च शिक्षणासाठी २०० टीव्ही चॅनेल्स आणि ६० टीव्ही चॅनेल्स सुरू करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले. त्याचा कंटेट राज्यांच्या सहकार्याने तयार केली जाईल. शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविणे हे या वाहिन्यांचे उद्दिष्ट असेल. डिजिटल शिक्षण सध्या भारतातील केवळ ६० टक्के विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. त्यामुळे ही टीव्ही चॅनेल्स शिक्षणासाठी जगातील प्रथम क्रमांकाची संपर्क यंत्रणा ठरतील असा विश्वास केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला.

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना आता ‘स्टडी फ्रॉम होम’! वर्ग होणार हायब्रीड
विद्यार्थ्यांना स्किल डिप्लोमासह यूजी पदवी घेता येणार

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous Aishwarya Rai Green Swimsuit : ऐश्वर्या रायचे स्विमसूटमधील बोल्ड फोटो झाले तुफान व्हायरल, आताच्या अभिनेत्रीही तोडू शकणार नाहीत हॉटनेसचा रेकॉर्ड..!
Next मौनी रॉयने बॅकलेस ड्रेस घालून वाढवले अनेकांच्या हृदयाचे ठोके, सोशल मीडियावर एकच धुमाकूळ

Check Also

Teachers Salary: पालिका शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, वेतनकोंडीतून होणार सुटका

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोडविभागातील महापालिका शिक्षक आणि महापालिका, नगर परिषद, नगरपालिका शाळांतील सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी …

दप्तराचे ओझे विद्यार्थ्यांच्या वजनापेक्षा अधिक, शाळेने आणली टर्म बुक संकल्पना

म. टा. वृत्तसेवा, कल्याणविद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे त्यांच्या वजनापेक्षा अधिक वाढले असून हे ओझे कमी करण्याची …