David Miller : डेव्हिड मिलरवर दु: खाचा डोंगर, मिलरच्या आयुष्यातील खास व्यक्तीचं निधन

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. आफ्रिकेचा स्टार खेळाडू डेव्हिड मिलरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिलरच्या खास चाहतीनं ८ ऑक्टोबरला जगाचा निरोप घेतला. त्या चिमुकलीचं नाव एनी असं होतं. एनी आणि मिलरचं खूप जवळचं नातं निर्माण झालं होतं. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत भावना डेव्हिड मिलरनं व्यक्त केल्या आहेत. डेव्हिड मिलरनं RIP माझी राजकुमारी, प्रेम काय राहिल, असं म्हटलं.

मिलरचा हा व्हिडिओ पाहून अनेकांना ती त्याची मुलगी असल्याचं वाटलं, मात्र ती मिलरची मुलगी नाही. मिलर आणि एनीचं खास नातं होतं. एनीला कॅन्सर झाला होता. डेव्हिड मिलरनं काही व्हिडिओसोबत इतर काही शेअर केलं नाही.

निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवताच मातोश्रीवर भूकंप, ठाकरे गटाची तातडीची बैठक

डेव्हिड मिलर सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या मधल्या फळीची जबाबदारी डेव्हिड मिलरवर जबाबदारी आहे. मिलर देखील सध्या शानदार खेळी करत आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात मिलरनं नाबाद १०६ धावा केल्या होत्या. पहिल्या एकदिवसीय सामन्यात ७५ धावा केल्या होत्या. मिलरच्या खेळीमुळं दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवत १-० अशी आघाडी मिळवली.

बाळासाहेबांसह उद्धव ठाकरेंचा फोटो, लढणार आणि जिंकणारच! आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मिलरनं दक्षिण आफ्रिकेचं १४७ एकदिवसीय सामने आणि १०७ टी-२० सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्त्व केलं आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये ४१.५४ सरासरीनं ३६१४ धावा केल्या आहेत. ५ शतकं आणि १८ अर्धशतकं केली आहेत. टी-२० मध्ये २०६९ धावा केल्या आहेत. दोन शतकं आणि ५ अर्धशतकं केली आहेत. डेव्हिड मिलर आयपीएलमध्ये देखील प्रतिनिधीत्त्व करतो. तो सध्या गुजरात टाइटंसकडून खेळतो.

ठाकरे आणि शिंदे हे पक्षासाठी कोणतं नाव वापरू शकतात? उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

पवार गटाच्या संदीप पाटलांकडून MCA अध्यक्षपदासाठी अर्ज, या दिवशी होणार निवडणूक

मुंबई, 9 ऑक्टोबर: मुंबई क्रिकेट असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक यंदा 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या …

दुसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघात होणार तीन मोठे बदल, पाहा कोणाला मिळणार संधी…

रांची : भारतासाठी दुसरा वनडे सामना हा करो या मरो, असा असणार आहे. त्यामुळे या …