Breaking News

कर्णधार बदलला पण पराभव मात्र कायम, सलग दुसऱ्या सामन्यात भारतावर नामुष्कीची वेळ

लखनौ : भारताचा कर्णधार बदलला खरा, पण त्यांचे नशिब मात्र बदलले नाही. कारण कर्णधार बदलल्यावरही भारतीय संघावर सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाची नामुष्की ओढावली. दक्षिण आफ्रिकेने भारतापुढे विजयासाठी २५० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची २ बाद ८ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांनी अर्धशतकी खेळी साकारली. संजूने नाबाद ८६ धावा साकारत अखेरपर्यंत किल्ला लढवला. पण भारताला यावेळी ९ धावांनी पराभव पत्करावा लागला.

दक्षिण आफ्रिकेच्या २५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात वाईट झाली. कारण भारताचा सलामीवीर शुभमन गिल हा फक्त तीन धावांवर बाद झाला आणि भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर शिखर धवनही झटपट तंबूत परतला. कर्णधार धवनला यावेळी फक्त ४ धावा करता आल्या, त्यामुळे भारताची २ बाद ८ अशी दयनीय अवस्था झाली होती. पण त्यानंतर काही काळ ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन यांची चांगली भागीदारी झाली. पण सहा चेंडूच्या फरकाने हे दोघेही बाद झाले आणि भारताला दुहेरी धक्के बसले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यरने धडाकेबाज फटकेबाजी केली आणि अर्धशतक झळकावले. श्रेयस आता मोठी खेळी साकारणार असे वाटत होते. पण त्यामध्ये तो अपयशी ठरला. श्रेयसने यावेळी ३७ चेंडूंत आठ चौकारांच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली. श्रेयस बाद झाल्यावर संजू सॅमसन आणि शार्दुल ठाकूर हे काही काळ खेळपट्टीवर होते. पण चेंडू बॅटवर येत नसल्यामुळे भारताचा पराभव होणार, अशी चिन्हं दिसायला लागली होती.

प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कारण शार्दुल ठाकूरने भन्नाट मारा केला आणि भारताला चांगली सुरुवात करून दिली. शार्दुलने यावेळी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमा आणि जेमन मलान यांना बाद केले. त्यानंतर एडन मार्करमला शून्यावर बाद केले आणि त्यांना मोठा धक्का दिला. दक्षिण आफ्रिकेचा संघ आता बॅकफूटवर जाईल, असे वाटत होते. पण तसे घडले मात्र नाही. कारण त्यावेळी डेव्हिड मिलर आणि हेन्रिक क्लासिन यांनी दमदार फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. या दोघांनी यावेळी अर्धशतके झळकावली आणि शतकी भागादारी रचत संघाला दमदार धावसंख्या उभारून दिली. मिलरने यावेळी ६३ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ७५ धावांची खेळी साकारली, तर क्लासिनने ६५ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद ७४ धावा केल्या. मिलर आणि क्लासिन यांच्या अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला भारतााल २५० धावांचे आव्हान देता आले.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous ATMमधून 4 पेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास इतके रुपये कट होणार?

Check Also

लखनौत टीम इंडिया जिंकली असती, पण विजयाच्या आड आले ‘हे’ प्रमुख अडथळे

लखनौ, 6 ऑक्टोबर:  भारतीय संघानं कडवी लढत दिल्यानंतरही दक्षिण आफ्रिका लखनौच्या पहिल्या वन डेत सरस …

लखनौत टीम इंडिया निसटता पराभव, गब्बरचा हा ‘शेर’ ठरला दक्षिण आफ्रिकेवर भारी

लखनौ, 6 ऑक्टोबर:  लखनौतल्या पहिल्या वन डेत शिखर धवनच्या टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून अवघ्या 9 धावांनी …