-
नवीन बॉलवर विकेट नाही
टॉस जिंकल्यानंतर भारतानं दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगचं आमंत्रण दिलं. धवन या वन डेत 5 बॉलर्स घेऊन खेळला. पण आघाडीच्या मोहम्मद सिराज आणि आवेश खान या वेगवॉन बॉलर्सना सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये विकेट काढता आली नाही. 13 व्या ओव्हर्समध्ये शार्दूल ठाकूरनं पहिली विकेट घेतली.
-
अखेरच्या ओव्हर्समध्ये बॉलर्स फेल
23 व्या ओव्हरमध्ये भारताला चौथी विकेट मिळाली. पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांऐवजी डेव्हिड मिलर आणि एनरिच क्लासेननं वर्चस्व गाजवलं. या जोडीनं अखेरपर्यंत नाबाद राहताना पाचव्या विकेटसाठी 139 धावा जोडल्या. पुढच्या 17 ओव्हर्समध्ये भारताला एकही विकेट मिळाली नाही.
-
फिल्डिंगमध्ये चुका
लखनौ वन डेत भारतीय संघानं तब्बल 4 कॅच सोडले. शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, सिराज आणि रवी बिश्नोईनं दक्षिण आफ्रिकन बॅट्समनना संधी दिली. त्याचा त्यांनी फायदा उठवला.
-
आघाडीचे फलंदाज गारद
250 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. धवन आणि शुभमन गिल ही सलामीची जोडी 8 धावातच माघारी परतली. त्यानंतर आलेल्या ईशान किशन आणि पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडला मोठी खेळी करता आली नाही.
धवनच्या संघाची कडवी झुंज
तरीही धवनच्या या यंग ब्रिगेडचं कौतुक झालं. खुद्द धवननही सहकाऱ्यांच्या खेळीची प्रशंसा केली. कारण या भारतीय संघात धवन सोडल्यास सगळे युवा खेळाडू आहे. टी20 वर्ल्ड कपसाठी महत्वाचे शिलेदार ऑस्ट्रेलियाला गेल्यानं धवनच्या संघात युवा खेळाडूंचा भरणा जास्त आहे. आणि याच संघानं आज तगड्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगली लढत दिली. खासकरुन श्रेयस अय्यर (50) आणि संजू सॅमसन (86) यांच्या झुंजार खेळीनं सामन्यात रंग भरला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या