करोडो फुटबॉल चाहते हळहळले… ‘या’ खेळाडूची मोठी घोषणा, खेळणार शेवटचा वर्ल्ड कप

मुंबई, 7 ऑक्टोबर: भारत जरी क्रिकेटवेडा देश असला तरी जगात सर्वात लोकप्रिय खेळ कोणता असं विचाराल तर उत्तर येईल फुटबॉल. जगभरात फुटबॉलचे असंख्य चाहते आहेत. याच खेळातले त्यांचे देव आहेत पेले, माराडोना, रोनाल्डो, मेसी हे महान खेळाडू. यापैकी सध्या खेळत असलेले मेसी आणि रोनाल्डो हे तर फुटबॉल प्रेमींच्या गळ्यातले ताईत आहेत. भारतात या दोघांचा खेळ पाहण्यासाठी लोक रात्र रात्र जागवतात. अवघ्या काही दिवसात फुटबॉलप्रेमींना फिफा वर्ल्ड कपमध्ये या दोघांचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे. पण त्याआधीच त्यातल्या एकानं फुटबॉल प्रेमींना धक्का दिलाय. कारण कतारमधला आगामी फिफा वर्ल्ड कप हा त्याच्या कारकीर्दीतला शेवटचा वर्ल्ड कप असल्याची त्यानं घोषणा केली आहे.

मेसीचा शेवटचा वर्ल्ड कप

अर्जेन्टिनाचा महान फुटबॉलर लायनल मेसीनं तो शेवटचा वर्ल्ड कप खेळणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण मेसीनं शेवटचा वर्ल्ड कप खेळणार असल्याचं म्हणत थेट निवृत्तीचे संकेत दिले आहेत. मेसी सध्या 35 वर्षांचा आहे.

मेसीनं एका मुलाखतीत म्हटलंय… ‘शारीरिकदृष्ट्या मी सध्या स्वत:ला फिट समजतोय. मला खात्री आहे की वर्ल्ड कपआधी माझा सीझन चांगला जाईल. मी दुखापतीतून सावरलोय आणि हळूहळू चांगलं वाटतंय… पण हे असं पहिल्यांदाच झालेलं नाही. मी आता वर्ल्ड कपचे दिवस मोजतोय. हा माझ्यासाठी शेवटचा वर्ल्ड़ कप आहे.’

फुटबॉलचा बादशाह मेसी

First published:

Tags: FIFA, Sports

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Next चंद्रमुखी झाली सोनाबाई देशपांडे,अमृता खानविलकर पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिकेत,लूक आला समोर

Check Also

टीम इंडियाच्या टी20 वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात, BCCI ने शेअर केला हा खास फोटो

पर्थ, 7 ऑक्टोबर: गेली 15 वर्ष तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींचं एक स्वप्न आहे ते म्हणजे भारतानं …

मुंबई इंडियन्सला मिळाला फ्यूचर कायरन पोलार्ड! वर्ल्ड कपआधी करतोय जोरदार फटकेबाजी

मुंबई, 7 ऑक्टोबर: मुंबई इंडियन्स म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो रोहित शर्मा. रोहित शर्माबरोबरच गेली …