मंगेश आणि लीना यांनी वयाच्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर यंदा घर आणि कार ही दणदणीत खरेदी केली आहे. सध्या ही जोडी ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत एकत्र दिसत आहे. दोघांनीही अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलं आहेच पण आता त्यांच्या वैयक्तित आयुष्यातील नव्या खरेदीमुळे चाहतेही आनंदित झाले आहेत. १७ लाखाची आलिशान गाडी खरेदी करून या जोडप्याने त्यांचं स्वप्नं पूर्ण केलं आहे.
१९९६ साली अधांतर या नाटकाच्या निमित्ताने मंगेश आणि लीना यांची ओळख झाली. पुढे हाच खेळ उदया पुन्हा या नाटकात त्यांची भेट झाली. एका लग्नाची दुसरी गोष्ट ही मालिका करताना त्यांनाही एकमेकांशी लग्नं करावं असं वाटलं आणि त्यांनी प्रेमविवाह केला. तेव्हापासून दोघांनी अनेक नाटक, मालिका केल्या. सध्या आमने सामने या नाटकात ते एकत्र काम करत आहेत. तर ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत लीना या सुवर्णा तर मंगेश हे विठ्ठल कानिटकर ही भूमिका करत आहेत.
मंगेश यांनी लीना यांना पाच रूपयांचा बिस्कीट पुडा देऊन प्रपोज केलं होतं. नाटकाच्या निमित्ताने या दोघांनी अनेकवेळा एकत्र काम केलं. तर अनेक मालिकांमध्येही ही जोडी प्रेक्षकांना एकत्र दिसली आहे. गेल्या २५ वर्षात दोघांनी संसारात खूप चढउतार पाहिले. स्वत:चं हक्काचं घर घ्यायला त्यांना वयाची पन्नाशी यावी लागली. तर नवी गाडी दारात आली तीही पन्नाशीच्या उंबरठ्यावर. त्यामुळे सध्या ही जोडी खूपच खुश आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या