दलेरने बॉलिवूडला अनेक हिट गाणी दिली. ९० च्या दशकात पंजाबीसह हिंदी सिनेमातच नव्हे तर अनेक म्युझिकल इव्हेंटमध्ये दलेरच्या गाण्यांची क्रेझ होती. दरम्यान २००३ मध्ये दलेरवर मानवी तस्करीचा आरोप करण्यात आला. भारतातून काही लोकांना बेकायदेशीररित्या परदेशात पाठवण्यात हात असल्याचा आरोप दलेर आणि त्याचा भाऊ शमशेर यांच्यावर ठेवण्यात आला होता. १९९८ ते १९९९ या एक वर्षाच्या काळात या दोघांनी १० हजार लोकांना परदेशात नेलं आणि तिथेच त्यांची विक्री केल्याचा आरोप करण्यात आला होता. बख्शीश सिंह नावाच्या व्यक्तीने पहिली केस २००३ साली दाखल केली.
१९ वर्षापूर्वीच्या या मानवी तस्करी प्रकरणी झालेल्या आरोपावरून २००३ साली दहेर मेहंदीला अटक करण्यात आली. दरम्यान २०१७ साली दलेरचा भाऊ समशेर याचा मृत्यू झाला. आरोप सिद्ध झाल्याने दलेरला २०१८ साली दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती तेव्हाही त्याने जामीन मिळवला, दरम्यान पुन्हा दोन महिन्यांपूर्वी जुलैमध्ये दहेरला पुन्हा अटक करण्यात आली.
मिलिंद गवळींची आईसाठी खास पोस्ट, मुलाचं दुःख तिलाच कळतं
अटक केल्यानंतर दोन महिन्यांपासून दलेर पटियाला सेंट्रल जेलमध्ये होता. दरम्यान त्याने जामीनासाठी याचिका दाखल केली. दलेरवर मानवी तस्करी प्रकरणी ३० हून अधिक आरोप होते. या आरोपातून सुटका करून दलेरला जामीन मंजुरीसह, २ हजार दंड आणि दोन वर्षाची शिक्षाही माफ करण्यात आली आहे. लवकरच दहेर त्याच्या पंजाबमधील घरी परतणार आहे. दलेर मेहंदीच्या सुटकेवरून सध्या सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या