आलिया भट्टला करायचे होते रणबीरचे केस नीट, झालं काही भलतंच; होतेय मजेशीर व्हिडिओची चर्चा

मुंबई- ब्रह्मास्त्र सिनेमाला मिळालेल्या दणदणीत यशामुळे सध्या सगळीकडे चर्चा आहे ती आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या जोडीची. लवकरच ही जोडी प्रत्यक्ष आयुष्यात आईबाबा होणार असल्याने यंदाचं वर्ष त्यांच्यासाठी धमाकेदार आहे. आलिया आणि रणबीर यांच्यातील केमिस्ट्रीचे किस्से काही कमी नाहीत. गेल्या काही दिवसात तर दोघांच्या रोमँटिक अंदाजावर चाहते फिदा होत आहेत. नुकताच या जोडीचा एक असा व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये आलिया रणबीरचे विस्कटलेले केस नीट करण्यासाठी पुढे आली आहे, पण भर रस्त्यात आलियाच्या या रोमँटिक मूडमुळे रणबीर मात्र चांगलाच संकोचला आहे.

Video :आजही पूजाला विसरू शकले नाहीत डाॅ.अमोल कोल्हे,दोघांच्या नात्याबद्दल भावुक झाला अभिनेता

सध्या ब्रह्मास्त्र सिनेमामुळे आलिया आणि रणबीर चांगलेच चर्चेत आहेत. या सिनेमाचा थिएटरमधला प्रतिसाद पाहण्यासाठी दोघांनी जवळपास अर्धा देश पालथा घातला आहे. नुकतीच या दोघांनी दिग्दर्शक अयान मुखर्जीसह करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या ऑफिसला भेट दिली. करणच्या ऑफिसच्या इमारती बाहेरच हा मजेशीर प्रसंग अगदी सहज घडला. आलिया आणि रणबीर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच कमेंटलाही बहार आली आहे.


आलियाने बॅगी जीन्स पँट आणि सैलसर शर्ट घातला आहे. तर रणबीर त्याच्या ब्लू जीन्स आणि व्हाइट टीशर्ट या आवडत्या ड्रेसमध्ये आहे. गाडीतून उतरल्यानंतर फोटोग्राफरना पोझ देण्यासाठी ही जोडी थांबली असता आलियाला दिसलं की रणबीरचे केस विस्कटले आहेत. सुरुवातीला आलियाने रणबीरच्या चेहऱ्यावर काहीतरी लागलं होतं ते काढण्यासाठी हात लावला आणि त्यानंतर त्याचे केस नीट करण्यासाठी हात डोक्याकडे पुढे केले.

मिलिंद गवळींची आईसाठी खास पोस्ट, मुलाचं दुःख तिलाच कळतं


हा सगळा प्रकार आलिया अगदी सहज करत होती. नवऱ्याचा फोटो छान यावा यासाठी तिच्यातील बायकोचा हा प्रयत्न होता. पण हे सगळं सर्वांसमोर सुरू असल्याने रणबीरला अवघडल्यासारखं झालं. आलिया केस नीट करत असताना त्याने डोकं मागे घेतलं. असूदे, मी नीट करतो असं काहीस त्याला म्हणायचं असावं. पण या व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलच धुमशान केलं आहे.


आता रणबीर आलियाचा हा व्हिडिओ पाहून गप्प राहतील ते नेटकरी कसले. काही नेटकऱ्यांनी असं म्हटलं आहे की हा सगळा ड्रामा आहे. लोकांसमोर काळजी असल्याचं दाखवू नये. तर आलियाचे चाहते मात्र रणबीरवर नाराज झालेत, ते म्ह्णत आहेत की आलिया इतकं प्रेमानं करत आहे आणि तू तिच्याकडे दुर्लक्ष करत आहेस का. रणबीरने विग घातल्यासारखी प्रतिक्रिया दिली आहे. कमेंट काहीही असो, आलिया आणि रणबीरच्या या भर रस्त्यातील रोमँटिक अदांवर चाहत्यांनी मात्र प्रेमाची बरसात केली आहे.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

सलमानच्या १५० एकरात पसरलेल्या अलिशान फार्महाऊसची किंमत आहे तरी किती?

Salman Khan Panvel Farm House: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता सलमान खानला त्याच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर …

Amitabh Bacchan ने पुन्हा खरेदी केलं आलिशान घर; किंमत ऐकूण डोळे होतील मोठे

मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोमुळे खूप चर्चेत …