श्रेयस तळपदेचा आलियाला सल्ला, ‘प्रेक्षक प्रेयसीप्रमाणे असतात’
सारा शुभमन नात्याबद्दल महत्त्वाची अपडेट
शुभमन गिल याचा काल म्हणजे ८ सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. परंतु शुभमनचा मित्र खुशप्रीत सिंह औलख यानं त्याला शुभेच्छा देताना ज्या पद्धतीनं ती लिहिली त्यावरून शुभमन आणि सारा अली खान यांच्या नात्याला त्यानं एकप्रकारे दुजोरा दिला आहे. सुशप्रीत सिंहनं इन्स्टावर शुभमन गिलबरोबरचा फोटो शेअर केला आहे. त्याबरोबर त्यानं मेसेज लिहिला आहे. त्यात त्यानं म्हटलं की, ‘माझ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा. खरं तर तू खूप त्रास देतोस आणि गुगलचा तू पदवीधर आहेस. पण खरं सांगू का तू नसता तर माझं आयुष्य वाया गेलं असतं. देव तुला भरभरून यश मिळू दे. कारण, गुगल ज्ञान आणि खूप ‘सारा’ प्रेम प्रत्येकाकडून मिळावं.’
खुशप्रीत सिंहच्या या पोस्टवर नेटकऱ्याचं लगेचच लक्ष गेलं. युझर्सना खुशप्रीतचा त्याच्या मित्राला अशा पद्धतीनं मजेशीर अंदाजात शुभेच्छा देणं आवडलं आहे. त्या पोस्टमध्ये सारा या नावाचा समावेश केल्यानं त्याला वेगळाच अर्थ मिळाला आहे. ही पोस्ट पाहिल्यावर शुभमन आणि सारा रिलेशनमध्ये असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. खुशप्रितनं ज्या पद्धतीनं सारा हा शब्द हायलाईट केला आहे त्यामुळेही जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
तू चकणी आहेस! जेव्हा सिनेमात न घेण्यासाठी सई ताम्हणकरला दिलं होतं विचित्र कारण
असं असलं तरी काही युझर्सच्या मते सारा म्हणजे सारा तेंडुलकर असावी. काही दिवसांपूर्वी शुभमन आणि सारा तेंडुलकर यांचं ब्रेकअप झाल्याची बातमी समोर आली होती. इतकंच नाही तर या दोघांनी एकमेकांना इन्स्टावरून अनफॉलोही केलं आहे. सारा अली खान आणि शुभमन गिल यांच्या अफेअरची बातमी किती खरी किती खोटी हे येणारा काळच ठरवेल. परंतु यानिमित्तानं सोशल मीडियावरील युझर्सना चर्चेसाठी नवीन विषय मिळाला आहे.
सैफ आणि करीना त्यांच्या मुलांसह एयरपोर्टवर कॅमेऱ्यात कैद
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या