या पदभरती अंतर्गत सिनिअर कन्सल्टंट(Sr. Consultant) आणि ज्युनिअर कन्सल्टंट (Jr. Consultant) ही पदे भरली जाणार आहेत. सिनिअर कन्सल्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून डीएनडी/एमडी/एमएस पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २ लाख रुपये इतका पगार दिला जाणार आहे.
ज्युनिअर कन्सल्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून डीएनडी/एमडी/एमएस पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा दीड लाख रुपये इतका पगार दिला जाणार आहे.
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.
BMC Recruitment: पदभरतीचा तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
उमेदवारांना संबंधित कामाचा किमान अनुभव असावा. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.
अर्ज करताना उमेदवारांना ५८० रुपये अर्ज शुल्क भरावा लागणार आहे. २३ सप्टेंबर २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी आपले अर्ज तळ मजला, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडीकल कॉलेज, बिल्डींग, सायन, मुंबई- ४०००२२ या पत्त्यावर पाठवायचे आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या