राजकारण

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या 5 जागांसाठी भाजपचा मास्टरप्लॅन! ठाकरे गटाची कोंडी करण्यासाठी चालणार ‘ही’ चाल

Rajya Sabha Election : निवडणूक आयोगाकडून राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 56 जागांसाठी 16 राज्यात 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात 6 जागांचं भवितव्य ठरणार आहे. 6 पैकी 5 जागा काबिज करण्यासाठी भाजपकडून मास्टर प्लॅन तयार करण्यात येतोय. तर महाविकास आघाडीला दोन जागांसाठी मेहनत करावी लागणार आहे. राज्यसभा निवडणुकीत मतदान हे खुल असल्याने यात राज्यात पक्षादेश म्हणजे …

Read More »

रक्त घ्या पण आम्हाला अन्न द्या, म्हणण्याची शेतकऱ्यावर वेळ; कुठं फेडणार हे पाप? ठाकरेंचा सवाल

Farmers Issue Shinde Government: शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे सरकारवर शाब्दिक आसूड ओढले आहेत. मराठवाड्यातील हिंगोलीमधील शेतकऱ्यांनी केलेल्या ‘आमचे रक्त घ्या आणि आम्हाला अन्न द्या,’ या आवहानावरुन ठाकरे गटाने शिंदे सरकावर निशाणा साधला आहे. ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ असेल अशा बाता सरकार नेहमीच करीत असते, पण मग या घोषणांचे बुडबुडे हवेतच का फुटले? असा सवाल ठाकरे गटाने विचारला आहे. …

Read More »

मराठा समाजासाठी सरकारने काढलेल्या सगसोयरे GR विरोधात मुंबई उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

Maratha Reservation : मराठा समाजासाठी महाराष्ट्र सरकारने काढलेल्या सगसोयरे अधिसुचनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर या अधिसुचनेसंदर्भात कोणी न्यायालयात गेले तर आमचं म्हणणं पहिलं ऐकूण घ्यावं यासाठी वकील राजसाहेब पाटील यांचं मुंबई उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने कुणबी समाजासाठी काढलेल्या अधिसुचनेसंदर्भात 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवल्या आहेत.  कुणबी दाखल्यासंदर्भातल्या नव्या जीआरमध्ये गरज भासल्यास …

Read More »

धारशिव लोकसभा आणि विधानसभा मतदार संघांचे नाव उस्मानाबादच राहणार; निवडणुक आयोगाचे आदेश

Osmanabad Dharashiv : राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच  निवडणुक आयोगाने खूप मोठा निर्णय जाहीर केला आहे. धारशिव लोकसभा आणि विधानसभा मतदार संघांचे नाव उस्मानाबाद असेच राहणार असल्याचे आदेश  निवडणुक आयोगाने जारी केले आहेत. राज्यात उस्मानाबादच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच गाजला होता. मात्र, नाव बदलूनही मतदार संघाचे नाव बदलणार नसल्यामुळे नामांतराच्या मुद्द्यावरुन राजकारण करणाऱ्या राजकीय …

Read More »

महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांचे हिल स्टेशन, तरीही Unexplored, सौंदर्य पाहून प्रेमात पडाल

Maharashtra Tourism: जानेवारी महिना जवळपास संपत आला आहे. फेब्रुवारी महिना आणि गोड गुलाबी थंडी अशा अल्हाददायक वातावरणात पर्यटकांना शांत, रम्य वातावरण्यात फिरायला जाण्याची ओढ असते. सुट्टीच्या दिवसांत महाराष्ट्रातील जवळपास सर्वच हिल स्टेशन गर्दीने खचाखच भरलेली असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एका शांत व पर्यटकांना फारसे माहित नसलेल्या हिल स्टेशनविषयी सांगणार आहोत. आम्ही सांगणार आहोत ते महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे …

Read More »

मराठा आरक्षण अधिसूचनेला विरोध, छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी; राष्ट्रवादीने जाहीर केली भूमिका

Chagan Bhujbal Resignation : मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात मंत्री छगन भुजबळ ठाम आहेत. मराठा आरक्षणावरून भुजबळांनी पुन्हा एकदा सरकारवरच निशाणा साधला.एका समाजाचे सरकारकडून सगळे हट्ट पुरवण्याचे काम सुरू आहेत. 54 लाख ओबीसीत आले तर धक्का लागणार नाही का? असा सवाल विचारत ओबीसींना धक्का मारून बाहेर काढण्याचं काम सुरू असल्याचा आरोप भुजबळांनी केलाय…तसंच ओबीसी समाजही मतदान करतो हे विसरू नका असा इशारा …

Read More »

ठाण्याला न उतरता थेट नवी मुंबई गाठा, मुंबई लोकलसंदर्भात समोर आली Good News

Airoli Kalwa Elevated Railway Project: मध्य रेल्वेवरील ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. ठाणे स्थानकातील गर्दीचा भार हलका होण्यासाठी रेल्वे प्रशासन सातत्याने प्रयत्न करत असते. ठाणे स्थानकातील गर्दी विभागण्यासाठी व कळवा-मुंब्रा स्थानकातील गर्दीचा भार कमी करण्यासाठी कळवा-ऐरोली उन्नत मार्गाच्या कामाची सुरुवात झाली आहे. मंगळवारी रात्री या मार्गावरील पुलाची पायाभरणी करण्यात आले असून अन्य कामेदेखील सुरु करण्यात आली आहे.  …

Read More »

तव्यावर बसून समस्या सोडवणारा बाबा निघाला बलात्कारी; विवाहितेवर 90 दिवस करत होता अत्याचार

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मार्डी येथील स्वयंघोषित गुरुदासबाबा उर्फ सुनील कावलकर याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुदासबाबानो मध्य प्रदेशातील एका महिलेवर तब्बल तीन महिने अत्याचार करून मोबाइलमध्ये अश्लील चित्रफीत बनवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून कुऱ्हा पोलिसांत गुरुदासबाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी हा बाबा गरम तव्यावर बसून भक्तांच्या समस्या सोडवत …

Read More »

नवाजुद्दीन सिद्दीकीनं मुलाखत सुरु असतानाच केली तोडफोड; काठी उचलली आणि…

Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा त्याच्या अप्रतिम अभिनयासाठी ओळखला जातो. त्याच्या अभिनयाच्या जोरावर नवाजुद्दीननं बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान मिळवलं. आज त्याच्या अभिनयाचे चाहते फक्त सर्वसामन्य लोक नाही तर सेलिब्रिटी देखील आहेत. त्याच्या सॅक्रेड गेम या सीरिजचे तर आजही लाखो चाहते आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नवाजुद्दीन सिद्दीकीनं मटेरिअलिस्टी गोष्टींचं  त्यांच्या आयुष्यात महत्त्व आहे का? यावर वक्तव्य केलं आहे. …

Read More »

दर महिन्याला 20 टक्के परताव्याचे आमिष, लोकांनी विश्वासाने पैसे गुंतवले, अन्…

Pune News Today: पुणे शहरात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जादा परताव्याचे आमिष दाखवून 3.25 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. पुण्यातील एका तरुणासह मित्र आणि नातेवाइकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दिगंबर गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.  गेल्या काही दिवसांपासून सायबर क्राइमचे प्रकार घडत आहेत. सायबर क्राइमच्या गुन्ह्यांना आळा बसवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्नही होत …

Read More »

Sankashti Chaturthi: अतिशय युनिक आणि मॉर्डन अशी बाप्पाची नावे, संकष्टी चतुर्थीनिमित्त या नावांचा विचार करा

Sankashti Chaturthi 2024 : दरवर्षी 12 संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. 2024 या वर्षातील ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे. पंचांगानुसार आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. आज या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी म्हणजे ‘लंबोदर संकष्ट चतुर्थी’ आहे. यावर्षी सकट चौथ 29 जानेवारी 2024 रोजी आहे. सकट चौथच्या दिवशी लहान मुलांच्या सुख, प्रगती आणि सुरक्षिततेच्या शुभेच्छा देऊन श्रीगणेशाची पूजा …

Read More »

‘डोकं आहे का? मराठे जिंकून आलेत’; मनोज जरांगेंचे छगन भुजबळांना प्रत्युत्तर

Maratha Reservation : गेल्या पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाला शनिवारी यश आलं. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करुन घेतल्या आहेत. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मध्यरात्री मान्य करत मध्यरात्री अध्यादेश काढला. या अध्यादेशात मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र यावरुन आता मंत्री छगन भुजबळ …

Read More »

आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं; पंकजा मुंडे यांचे मनोज जरांगे आवाहन

Pankaja Munde manoj jarange patil : मनोज जरांगेंनी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं असं आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले आहे. मराठा आरक्षण मिळाल्यानंतर पंकजा मुंडे अभिनंदन करताना बोलत होत्या. त्याचबरोबर ओबीसीला धक्का लागल्याचंही त्या म्हणाल्या. पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे एकाच कार्यक्रमात बीडच्या माजलगाव येथील भाजप कार्यकर्त्याच्या लग्नाला मनोज जरांगे पाटील यांनी आज उपस्थिती लावली. …

Read More »

Sharad Pawar : ‘मागील 15 दिवसांत अचानक…’, बिहारच्या सत्तांतरावर शरद पवार यांचं सूचक वक्तव्य, म्हणतात…

Sharad Pawar On Nitish Kumar : बिहारमध्ये राजकीय (Bihar Politics) भूकंप झाला आहे. आरजेडीची साथ सोडून नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी विद्यमान सरकार विसर्जित केलं अन् सायंकाळी पाच वाजता त्यांनी 9 व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार कूस बदलणार या चर्चांना त्यांनी स्वत:च पूर्णविराम दिलाय. नव्या सरकारमध्ये भूमिहार नेता विजय सिन्हा आणि मागास समाजाचे सम्राट चौधरी यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलंय. …

Read More »

Sri Lanka Cricket : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी श्रीलंकेला मिळाली ‘गुड न्यूज’, ICC ने घेतला तडकाफडकी निर्णय!

ICC Suspension On Sri Lanka Cricket : जूनमध्ये टी-20 वर्ल्डकप 2024 (T20 World Cup 2024) मध्ये खेळवला जाणार आहे. अशातच आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कप तोंडावर असताना आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे आयसीसीने श्रीलंका क्रिकेटवर बंदी (Sri Lanka Cricket suspension) घातली होती. मात्र, आता आयसीसीने (ICC) श्रीलंकन क्रिकेटवरील बंदी तात्काळ प्रभावाने उठवली आहे. वनडे वर्ल्ड कपनंतर घातलेली बंदी तब्बल …

Read More »

मराठा आरक्षण अधिसूचनेविरोधात ओबीसी बैठकीत मोठा निर्णय; छगन भुजबळ आक्रमक

Chagan Bhujbal On Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात ओबीसी नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. यासंदर्भात पुढील रणनिती ठरवण्यासाठी छगन भुजबळांच्या मुंबईतल्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. त्यात मागासवर्ग आयोग, न्या. शिंदे समिती रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तसच अधिसूचनेविरोधात लाखोंच्या संख्येनं हरकती नोंदवण्याचा निर्धार करण्यात आला.  ओबीसी हक्कासाठी न्यायालयीन लढाई लढली जाईल असंही छगन भुजबळांनी सांगितलं. या बैठकीला …

Read More »

दीड टनाचा हिंदकेसरी रेडा! इंदापूर कृषी प्रदर्शात गजेंद्रला पहायण्यासाठी तुफान गर्दी

जावेद मुलाणी, झी मिडीया, इंदापूर : दररोज १५  लिटर दूध ,तीन किलो सफरचंद ,चार किलो पेंड, तीन किलो गव्हाचे पीठ, मकवान कडबा ऊसाचे वाडे असा खुराक खाणाऱ्या तब्बल दीड टन वजनाचा हिंदकेसरी गजेंद्र रेडा इंदापूर कृषी प्रदर्शनामध्ये आकर्षण ठरला असून त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. २४  जानेवारी ते २८ जानेवारी पर्यंत इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने कृषी महोत्सवात  कृषी, …

Read More »

‘भाजपच्या दबावाला जेव्हा…’, तेजस्वी यादव यांचं कौतूक करत रोहित पवार यांची मोठी भविष्यवाणी!

Bihar Politics : बिहारच्या राजकारणाचे भीष्म पितामह म्हटले जाणारे नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी रविवारी संध्याकाळी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तब्बल नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवलाय. नितीश कुमार यांनी पुन्हा कूस बदलली अन् बिहारमध्ये सत्तांतर झाल्याचं पहायला मिळालंय. नितीश कुमार यांच्या निर्णयामुळे तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांना मोठा धक्का बसलाय. बिहारमधील राजकीय गोंधळाचा परिणाम संपूर्ण देशभर होताना …

Read More »

पत्नीचे नाटकातील काम पाहून भारावला अभिनेता, म्हणाला “तुझी तळमळ बघून…”

Abhijeet Khandkekar Special Post Sukhada Khandkekar : मराठी मनोरंजनसृष्टीतील चॉकलेट हिरो म्हणून अभिजीत खांडकेकरकडे पाहिले जाते. सध्या तो मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपटातून प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. अभिजीत खांडकेकर हा सध्या तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत झळकत आहे. आता नुकतंच अभिजीतने त्याची पत्नी सुखदा खांडकेकरसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.  अभिजीत खांडकेकर हा …

Read More »

IND vs ENG : ‘…म्हणून आम्ही मॅच हारलो’, कॅप्टन रोहितने ‘या’ खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर!

India vs England 1st Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्या संघाने यजमान संघाचा म्हणजेच टीम इंडियाचा 28 धावांनी पराभव केला आहे. टीम इंडियाला दुसऱ्या डावात विजयासाठी 231 धावा करण्याची गरज होती. मात्र, भारताची फलंदाजी 202 धावांवर ठेपाळली. त्यामुळे आता रोहित अँड कंपनीविरुद्ध इंग्लंडने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. अशातच आता सामन्यात पराभव झाल्यानंतर …

Read More »