आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं; पंकजा मुंडे यांचे मनोज जरांगे आवाहन

Pankaja Munde manoj jarange patil : मनोज जरांगेंनी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं असं आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले आहे. मराठा आरक्षण मिळाल्यानंतर पंकजा मुंडे अभिनंदन करताना बोलत होत्या. त्याचबरोबर ओबीसीला धक्का लागल्याचंही त्या म्हणाल्या.

पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे एकाच कार्यक्रमात

बीडच्या माजलगाव येथील भाजप कार्यकर्त्याच्या लग्नाला मनोज जरांगे पाटील यांनी आज उपस्थिती लावली. याच लग्नामध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती त्यामुळे मनोज जरांगे पाटील आणि पंकजा मुंडे या सोबतच खासदार प्रीतम मुंडे आणि आमदार राजेश टोपे हे देखील यावेळी या लग्नाला हजेरी लावण्यासाठी आले होते पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटील हे या लग्नसोळ्यामध्ये शेजारी शेजारी बसल्याचं पाहायला मिळालं.पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये काही वेळ संवाद देखील झाला.

हेही वाचा :  बॅकलेस ड्रेस घालून कंबर लचकत-मुरडत रस्त्यावर चालू लागली मलायका अरोरा

मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा विरोध

मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी विरोध केला आहे. राज्य सरकारच्या निर्णयाशी आणि आश्वासनाशी सहमत नसल्याचं राणेंनी म्हटलंय. यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्‍चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्‍याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो असंही राणेंनी म्हंटलंय. 

अध्यादेशासाठी जरांगेंना मुंबईला यावं लागलं. सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या आहेत.  मुस्लिम, धनगर समाजाला जे सरकार न्याय देईल त्यांच्या सोबत ताकदीने उभा राहू. त्यांनी नाही दिल तर आम्ही आमचं सरकार आल्यावर न्याय देऊ.

प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया

मराठा समाजाला ओबीसींच्या सवलती दिल्याचा फायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्पष्टपणे होईल तर ओबीसींना जवळ घेणा-या भाजपचं मात्र नुकसान होईल असा अंदाज वंचित बहुजनचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी वर्तवलाय. मराठा कार्यकर्त्यांमध्ये एकनाथ शिंदेंबद्दल सहानुभूती तर भाजपबद्दल चीड असल्याचंही आंबेडकरांनी म्हंटलंय. 

कोणाला पटो ना पटो ओबीसींसाठी लढतोय आणि लढत राहणार – छगन भुजबळ ठाम 

मराठा आरक्षणासंदर्भात भुजबळांची भूमिका ही वैयक्तिक असून, पक्षाची नाही असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलंय..त्याला उत्तर देताना भुजबळांनी ही भूमिका आपलीच असल्याचं ठणकावून सांगितलंय…ही भूमिका माझीच आहे. कोणाला पटो ना पटो ओबीसींसाठी लढतोय आणि लढत राहणार असं स्पष्ट शब्दात भुजबळांनी ठणकावलंय.

हेही वाचा :  शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा आणि.... पाहा कोण काय बोललं?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लहानपणी शाळेत खाल्लेला रट्टा लागला जिव्हारी, अभिनेत्याने शाळा विकत घेत फिरवला बुलडोझर

Trending news in Marathi : आई वडील असो किंवा शिक्षक मुलांना चांगली सवय आणि शिस्त …

‘जो मला हरवेल मी त्याच्याशीच लग्न करेन’, गिता-बबिता जन्मल्याही नसतील तेव्हाची पहिली महिला रेसलर

आज 4 मे रोजी गुगलने हमीदा बानोच्या स्मरणार्थ ‘डूडल’ तयार केले आहे. हमीदा बानो या …