राजकारण

बिबट्याचा मर्सिडीज प्रवास… १२ तासांचा थरारक अनुभव कॅमेऱ्यात कैद

पुणे : जिल्ह्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीतील मर्सडीज बेंज कंपनीत बिबट्या शिरला. कंपनीत शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं आहे.कंपनीच्या Q2 या शेडमध्ये काल रात्री उशीरा हा बिबट्या शिरला होता. तब्बल १२ तास बिबट्या मर्सडीज कंपनीत होता.  बिबट्याचा १२ तासांचा तो धुमाकूळ थरार सगळ्यांनी अनुभवला. त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. कंपनीच्या सर्व कामगारांना गेट बाहेर काढण्यात आलं होतं. वन विभागानं …

Read More »

‘म्हणायला ठाकरे सरकार पण लाभ घेते पवार सरकार’, शिवसेना खासदाराची नाराजी

मुंबई :  महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) सारं काही आलबेल आहे असं नेते सांगतात. मात्र तसं काही नीट आहे असं तरी वाटत नाही. त्याच कारण आहे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar)  यांनी केलेलं वक्तव्य. कीर्तीकरांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील धुसफूस समोर आली आहे. “आम्ही म्हणायचं ठाकरे सरकार, लाभ घेतं पवार सरकार”, असं म्हणत शिवसेना खासदार गजानन किर्तीकरांनी …

Read More »

MIM च्या प्रस्तावावर शरद पवार यांचं स्पष्ट शब्दात उत्तर, पाहा काय म्हणाले

बारामती : एमआयएमने (AIMIM) महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) युतीचा प्रस्ताव दिला आणि राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली. राज्यात भाजपला रोखण्यासाठी तसंच मतांची विभागणी टाळण्यासाठी एमआयएम पक्षालाही महाविकास आघाडीत सामिल करण्याच्या चर्चांना वेग आला. यावरुन भाजपने शिवसेनेला चांगलंच डिवचलं. तर एमआयएम ही भाजपची बी टीम आहे असा आरोप करत एमआयएमबरोबर युती होणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) …

Read More »

कोकण किनारपट्टीला असनी चक्रीवादळाचा धोका? काय व्हायरल मेसेजमागचं सत्य

मुंबई : आधीच अवकाळी पावसाचं सावट असताना आता चक्रीवादळाचं संकट रत्नागिरीवर असल्याचं एक मेसेज व्हायरल होत आहे. या चक्रीवादळाचा तडाखा बसणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या व्हायरल मेसेजची सत्यता झी 24 तासने पडताळली आहे.  रत्नागिरी जिल्ह्याला पुन्हा एकदा चक्रीवादळाचा तडाखा बसणार अशी चर्चा रंगलीये. मात्र, रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. या व्हायरल मेसेजमध्ये कोणतेही तथ्य नाही असं …

Read More »

नात्यांना कलंक; पुण्यात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वडील, भावाकडून लैंगिक अत्याचार

पुणे : माणुसकी आणि नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेनं पुणे हादरलं आहे. इथं एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच भावाने आणि वडिलांनी बलात्कार केला. तर या मुलीचा तिचे आजोबा आणि मामाकडूनही विनयभंग झाल्याचं म्हटलं गेलं. (Pune news) मागील पाच वर्षांपासून सुरु असणाऱ्या या अत्याचारांना आता वाचा फुटली आणि सर्वांनाच हादरा बसला.  सदर प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंडसंविधानाअन्वये बलात्कार आणि विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल केला. …

Read More »

मोठी बातमी; इशारा मिळाला आणि नको असतानाही अखेर ‘तो’ आलाच

मुंबई : होलिका दहन झाल्यानंतर राज्यात तापमानाचा आकडा वर जात असतानाच हवामान खात्यानं दिलेला इशारा खरा ठरला. वर्तवलेल्या अंदाजानुसार कोल्हापूर आणि सातारा-सांगलीमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडायासह या भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसल्याची माहिती समोर आली. (Maharashtra Rain) दक्षिण कोकणसह दक्षिण मध्य महाराष्ट्रातहा पावसाच्या हलक्या सरी बरसल्याची नोंद करण्यात आली. तिथे कोकणात अवकाळीनं धुमाकूळ घातलेला असतानाच विदर्भात मात्र उष्णतेची लाट …

Read More »

15 टक्के फीमाफीची घोषणा कागदावरच, पालकांना भरावी लागणार शाळेची पूर्ण फी

पुणे : कोरोना काळात पालकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनानं 15 टक्के फीमाफीची (school fee waiver) घोषणा केली होती. मात्र या फी माफीचा फायदा पालकांना मिळालाच नाही. शिक्षण खात्याच्या (Education Department) बेजबाबदारपणामुळं पालकांची फरफट झाली. त्यामुळे पालकांना आता शाळेची पूर्ण फी भरावी लागणार आहे. 15 टक्के फीमाफीची घोषणा कागदावरच राहिली आहे. (parents will have to pay full school fees) शिक्षण विभागाच्या अनास्थेचा …

Read More »

फुगा मारल्याचा जाब विचारला, मारहाणीत डोळा थोडक्यात बचावला

उल्हासनगर : देशासह राज्यात तब्बल दोन वर्षांनी होळी साजरी होत आहे. संपूर्ण राज्यात उत्साहाच वातावरण आहे. पण उत्साहाच्या भरात काही ठिकाणी रंगाचा बेरंग झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पाण्याने भरलेला फुगा मारण्यावर बंदी असतानाही अनेक जण रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्यांवर फुगे मारतात. यातून मुली, विद्यार्थी आणि वृद्ध नागरिकांचीही सुटका नसते. अनेकवेळा दुर्घटना घडते, अशीच काहीशी घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. पाण्याचा फुगा मारल्याचा …

Read More »

Holi | पाण्याच्या फुग्यामुळे एकाचा मृत्यू, होळीचा उत्साह एकाच्या जीवावर बेतला

प्रथमेश तावडे,झी मीडिया,विरार : विरार (Virar) मध्ये होळीचा उत्साह (holi celebration) एकाच्या जीवावर बेतला आहे. विरार पश्चिमेच्या पुरापाडा चाळपेठ नाक्यावर पाण्याचा फुगा फेकल्याने झालेल्या अपघातात एका सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. रामचंद्र हरिनाथ पटेल (५०) असं त्याचे नाव आहे. (cyclist dies in virar due to water bubble during holi celebration) विरार पश्चिमेच्या पुरा पाडा रस्त्यावर पाच वाजताच्या सुमारास हा …

Read More »

आधी भरजरी सत्कार, मग गाढवावरून वरात.. का होतोय या गावातील जावयांवर अत्याचार?

बीड : होळी आणि रंगपंचमी हा अनेकांचा आवडता सण… या सणाच्या आठवणी अनेकांनी आपल्या मनात जपून ठेवल्यात. मात्र, बीडच्या त्या गावातील जावयांना मात्र ती आठवण नकोशी असते. त्याचं कारणंही तसंच आहे. बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील विडा हे गाव. या गावात साडेसात हजार लोकसंख्या आहे. तर गावात 150 घरजावई कायम स्वरुपी वास्तव्यास आहेत. पण, होळीचा सण जसा जवळ येतो तसे बीडच्या …

Read More »

पुण्यात चक्क बनावट एनए ऑर्डर, भोगवटापत्र तयार करून फ्लॅट्सचे रजिस्ट्रेशन

सागर आव्हाड / पुणे : Fake NA order in Pune : बातमी आहे ‘झी 24 तास’ इन्व्हेस्टीगेशनची. फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करताना मूळ दस्त तपासूनच रजिस्ट्रेशन केले जाते. मात्र पुण्यात चक्क बनावट एनए ऑर्डर आणि भोगवटापत्र तयार करून अनेक फ्लॅट्सचे रजिस्ट्रेशन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दलाल आणि सरकारी बाबूंनी केलेल्या या बोगस दस्त नोंदणीचा भांडाफोड  ‘झी 24 तास’ने केला आहे. …

Read More »

होळी खेळणाऱ्यांनो सावधान, अन्यथा थेट जेलची कोठडी !

मुंबई / नागपूर : Holi celebration  : होळी आणि धुळवडीच्या दिवशी दारू पिऊन हुल्लडबाजी करणाऱ्यांची होळी थेट कोठडीत जाईल, असा इशारा नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. याशिवाय फुगे फेकून मारणाऱ्यांवरही पोलिसांचा वॉच राहणार आहे. तसेच सरकारकडून होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमीबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. (Guidelines for Holi, Dhulivandan and Rang Panchami released in Maharashtra) होळी, धुलिवंदन …

Read More »

UGC Syllabus : उच्च शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

मुंबई : UGC Syllabus : यूजीसी चार वर्षांचा नवा पदवी अभ्यासक्रम सुरु करणार आहे. पीएचडी अभ्यासक्रमात सुद्धा सुधारणा करणार आहे. 10 मार्च रोजी यूजीसीच्या झालेल्या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या सुधारणांबाबत चर्चा झाली आहे. (UGC will launch a new four-year degree Syllabus) यामध्ये चार वर्षांच्या पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी पीएचडी प्रवेशासाठी पात्र ठरु शकेल, अशा प्रकारच्या सुधारणा करण्याचा विचार यूजीसीने केला …

Read More »

Heat wave in Maharashtra | राज्यभर उन्हाच्या झळा तीव्र; आरोग्य सांभाळण्याचं आवाहन

मुंबई : मुंबईकर उष्णतेच्या लाटेनं हैराण झाले आहेत. बदलत्या ऋतूमानानुसार होळीनंतर उन्हाळा आणखी तापदायक ठरण्याची दाट शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानातील तापमान 40 ते 42 अंशाच्या आसपास असून, गुजरात आणि महाराष्ट्रात बहुतांश शहरांचे विशेषत: कोकणातील अनेक शहरांचे कमाल तापमान 38 ते 39 अंशादरम्यान नोंदवण्यात आले आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे दाखल झालेल्या उष्णतेच्या लाटेनं मुंबईच्या कमाल तापमानात सातत्याने भर …

Read More »

‘झी 24 तास’चा दणका : म्हाडा 1200 कोटींचा घोटाळा, गृहनिर्माण मंत्र्यांचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

मुंबई : MHADA Scam  : म्हाडाच्या रिडेव्हलपमेंट इमारतीत सुमारे 1200 कोटींचा घोटाळा झाल्याचे वृत्त ‘झी 24 तास’ने दाखविल्यानंतर याची दखल राज्य सरकारने घेतली आहे. म्हाडाच्या 1200 कोटींचा घोटाळाप्रकरणाचा  ‘झी 24 तास’ इन्व्हेस्टीगेशनमध्ये पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. MHADA Biggest Scam : गृहनिर्माण खात्याला हादरवणारी बातमी ‘झी 24 तास’ने दाखविल्याने याचे मोठे …

Read More »

नव्या अंगणवाडीसाठी राज्यसरकारने दाखविले केंद्राकडे बोट

मुंबई : राज्यातल्या प्रत्येक बालकांपर्यत पोहोचणाऱ्या अंगणवाडीला नवी ऊर्जा देण्याची जबाबदारी शासनाची आहे. अंगणवाडी सुस्थितीत असणे, सर्व सोयी सुविधा असणे आणि त्या माध्यमातून मुलांचे योग्य पोषण होणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अँड यशोमती ठाकूर यांनी सांगितले.    राज्यात काही अंगणवाड्यांची कामे अपुर्ण असल्याची प्रकऱणे निदर्शनास आली आहेत. ज्या ठिकाणी निधी उपलब्ध होऊनही काम …

Read More »

MHADA Scam : राज्याच्या गृहनिर्माण खात्याला हादरवणारी बातमी, म्हाडाचा सर्वात मोठा घोटाळा

गोविंद तुपे / सुशांत पाटील / मुंबई : MHADA Biggest Scam : गृहनिर्माण खात्याला हादरवणारी बातमी. म्हाडात रिडेव्हलपमेंट्च्या इमारतीतल्या घरांचा मोठा घोटाळा ‘झी 24 तास’ इन्व्हेस्टीगेशनमध्ये उघड झाला आहे. (Scam of Houses in MHADA Redevelopment Building) सुमारे 1200 कोटींचा हा घोटाळा असून यात म्हाडातल्या बाबूंना हाताशी धरून दलालांनी हजारो घरांवर डल्ला मारल्याचे समोर आले आहे. (MHADA  Home)  खाबुगिरी करणाऱ्या बाबूंनी …

Read More »

गुगलवर नंबर सर्च करताय, सावधान तुमचीही होऊ शकते फसवणूक

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : छोट्यातली छोटी गोष्ट शोधायची असल्यास आपण गुगल (Google) चा आधार घेतो. मात्र याच गुगलमुळे आपली फसवणूक सुद्धा होऊ शकते. बँकेसंदर्भात कोणता नंबर शोधत असाल तर सावधान. या नंबरवर कॉल केला तर आपला बँक बॅलन्स सुद्धा कमी होऊ शकतो. (Online Frauds and Scams) नेमकी काय आहे घटना?गुगल वरून नंबर सर्च करून बँकेचं काम करणं एका …

Read More »

राज्य सरकारची विधानसभेत मोठी घोषणा, 7 हजार 231 पदांची पोलीस भरती

मुंबई : Police Recruitment News : पोलीस भरती 2019 मधील रिक्त असलेल्या 5  हजार 297 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या काही दिवसात निवडलेल्या उमेदवारांना नेमणुका देण्यात येणार आहेत. त्याशिवाय येत्या काही दिवसात  7 हजार 231 पदांची पोलीस भरती करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत केली. (Maharashtra Government’s big announcement in the Legislative Assembly, recruitment of …

Read More »

HSC Exam | बारावीचा आणखी एक पेपर फुटला; शिक्षणाधिकाऱ्यांकडून तपास सुरू

अहमदनगर : राज्यात १२वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. आज गणित या विषयाचा पेपर होता. परंतू हा पेपर फुटला आणि 10 वाजताच उत्तर पत्रकेसह सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती समोर आली आहे.  पेपर अहमदनगर जिल्ह्यात नक्की कोणत्या केंद्रातून फुटला याबाबत तपास करण्यासाठी शिक्षणाधिकारी श्रीगोंदयात दाखल झाले आहेत.  बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला; खासगी क्लासच्या शिक्षकाला अटक बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती …

Read More »