‘म्हणायला ठाकरे सरकार पण लाभ घेते पवार सरकार’, शिवसेना खासदाराची नाराजी

मुंबई :  महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) सारं काही आलबेल आहे असं नेते सांगतात. मात्र तसं काही नीट आहे असं तरी वाटत नाही. त्याच कारण आहे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar)  यांनी केलेलं वक्तव्य. कीर्तीकरांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील धुसफूस समोर आली आहे. “आम्ही म्हणायचं ठाकरे सरकार, लाभ घेतं पवार सरकार”, असं म्हणत शिवसेना खासदार गजानन किर्तीकरांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे. (mumbai north west loksabha constituency mp gajanan kirtikar critisize on ncp over to allocation of funds at ratanagiri) 

निधी वाटपावरून गजानन किर्तीकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रत्नागिरीत एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेला पुरेशा प्रमाणात निधी मिळत नाही. शिवसेनेवर अन्याय होतोय अशी नाराजी त्यांनी बोलून दाखवली. 

कीर्तीकर काय म्हणाले? 

“आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेते, पवार सरकार” असे म्हणत शिवसेनेचे मुंबईतील खासदार व शिवसेनेचे नेते गजानन किर्तीकर यांनी निधी वाटपाबाबत नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीला सरकारला घरचा आहेर दिल्याने खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा :  राज्यातील विविध विभागांमध्ये दीड लाख पदे भरणार, अजित पवारांची मोठी घोषणा

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शिर्दे येथे ब्राह्मणवाडी ते कोळबांद्रे रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन करण्यात आलं. या समारंभात किर्तीकर बोलत होते. 

“एका आमदाराला त्याच्या मतदार संघात विकास कामासाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे पाहावे लागते, विकास कामांच्या निधीमध्ये पळवापळव केली जात असून ग्रामविकास मंत्रालयाच्या २५ /१५ योजनेमधून निधी मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळते.  आम्हाला मुंबईमध्ये हा प्रश्न उद्भवत नाही, मुंबईमध्ये नागरोत्थान, नगरविकासचा निधी मिळतो, मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आम्ही निधी मिळवतो, मात्र निधीची पळवापळवी केली जात असून “ आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेतो, पवार सरकार” असे म्हणत त्यांनी निधी वाटपात शिवसेनेवर अन्याय होत असल्याने नाराजी व्यक्त केली.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘हिंदू- मुस्लिम मील’ हे काय असतं? एअर इंडियाच्या मेन्यूवरुन नवा वाद

Air India Meal : एअर इंडिया विमानात देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थावरुन आात नवा वाद निर्माण झाला …

कुटुंबावर काळाचा घाला, विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Pune News Today: महाराष्ट्रात काही जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मराठवाडा, पुणे, विदर्भात मुसळधार …