राजकारण

…तर देशात भडका उडेल; कपिल पाटील यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल

Uddhav Thackeray :  शिक्षक आमदार कपिल पाटील आज जेडीयूला सोडचिठ्ठी दिली. नितिश कुमार पुन्हा NDAमध्ये गेल्यानं कपिल पाटील नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे. समाजवादी विचारसरणीच्या लोकांना, विचारवंतांना सोबत घेऊन त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी समाजवादी गणराज्य पार्टी या नव्या पक्षाची घोषणा केली आहे.    हुकूमशाहीचा पहिला पराभव महाराष्ट्र करेल – उद्धव …

Read More »

’30 पैकी 15 हजार ट्रेनी नोकऱ्या’; नमो रोजगार मेळाव्यावरुन सुप्रिया सुळेंची टीका

निलेश खरमारे, झी मीडिया, पुणे : बारामती येथे झालेल्या नमो महारोजगार मेळाव्यावरुन आता राजकारण सुरु झालं आहे. या मेळाव्याची मोठ्या प्रमाणात जाहीरातबाजी करण्यात आली होती. या मेळाव्यातून 43 हजार तरुणांना रोजगार मिळेल, असे सरकारकडून सांगण्यात आलं होतं. मात्र सांगितलेल्या पदांपेक्षा कमी पदे भरली जाणार असल्याने आता विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांची बारामतीमध्ये झालेल्या नमो महारोजगार मेळाव्यावर …

Read More »

Mumbai Metro : कल्याण-डोंबिवली ते नवी मुंबईचा प्रवास आता फक्त 45 मिनिटांत, मेट्रो 12 मिळणार गती

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण या भागांना थेट नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईशी जोडणाऱ्या कल्याण तळोजा मेट्रो 12 च्या कामालाही गती मिळणार आहे. मेट्रो 12 चे काम जलद गतीने सुरू असून या मार्गाचे आज (3 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.  ठाणे ते कल्याण वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून नागरिकांना वाहतूक कोंडीमुक्त आणि जलद …

Read More »

‘देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये आहेत तोपर्यंत मतदान करणार नाही; सोलापुरात मराठा समाजाने घेतली शपथ

अभिषेक आदेप्पा, झी मीडिया, सोलापूर : सोलापुरात मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. सोलापुरातल्या एका गावात मराठा समाजाने भाजपा आणि मित्र पक्षाला मतदान न करण्याची सामूहिक शपथ घेतली आहे. ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांना साक्ष ठेवत ही शपथ घेतली. सरकारने दिलेले आरक्षण हे कोर्टात टिकणारे नसून , मराठा समाजाची फसवणूक झाल्याचा आरोप मराठा समाजाने केला. त्यामुळे यापुढे भाजपच्या उमेदवाराला मतदान …

Read More »

रिक्षाच्या भाड्यावरुन चालकाला पट्ट्याने अमानुषपणे मारहाण; पोलीस कर्मचाऱ्याचा क्रूर चेहरा समोर

मयूर निकम, झी मीडिया, बुलढाणा : बुलढाण्यात एका पोलिसाने ऑटो चालकाला पट्ट्याने अमानुषपणे मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. प्रतिबंधक कारवाईच्या नावाखाली एका व्यक्तीस पोलिसाने मारहाण केली. पोलिसाचा हा क्रूर चेहरा पाहून नेटकऱ्यांनीही रोष व्यक्त केला आहे. अखेर या पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी याची माहिती दिली. बुलडाण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची …

Read More »

Weather Update Today : थंडी परतली; रात्रभर मुसळधार पावसामुळे तापमानात घट, गारांचा वर्षाव

हिवाळा ऋतू आता संपत आला असताना पुन्हा एकदा हवामानाने बदल केला आहे. दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पारा घसरला आहे. लोकांना पुन्हा थंडी जाणवू लागली आहे. अजूनही अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे. आज दिवसभरातही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आकाश ढगाळ राहू शकते. मात्र, पावसामुळे दिल्लीचा AQI नक्कीच सुधारला आहे. आज दिल्लीपासून पंजाब …

Read More »

महाराष्ट्रातील ‘त्या’ 18 जातींचा सर्वंकष अहवाल सादर करा; मागासवर्गीय आयोगाचा अल्टीमेटम

Mumbai News : महाराष्ट्र राज्यातील 18 जातींना अन्य मागासवर्गीयांच्या केंद्रीय सुचीमध्ये समाविष्ठ करण्यासाठी राज्यशासनाने पाठविलेल्या प्रस्तावावर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे 1 मार्च रोजी आढावा बैठक घेवून या प्रस्तावावर समिक्षा केली. त्यावेळी त्यांनी 18 जातींच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीविषयी येत्या 7 दिवसात आयोगास नव्याने अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले …

Read More »

Maharastra Politics : महाविकास आघाडीच्या युवा नेत्यांची खलबत; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांची लगबग सुरू झाली आहे. नुकतंच भाजपने लोकसभेसाठी (Loksabha Election) रनशिंग फुंकलं असून 195 उमेदवारांची यादी भाजपने जाहीर केली आहे. अशातच आता युती असेल किंवा आघाडी गेल्या काही दिवसापासून सातत्याने बैठकांचे सत्र सुरू आहे. जागा वाटपात बाबती युती आणि आघाडी जवळपास अंतिम टप्प्यांमध्ये आलेले आहेत. कधीही आचारसंहिता घोषित …

Read More »

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या 299 परीक्षेच्या तारखा जाहीर

Mumbai University Exam : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. शैक्षणिक वर्ष 2023-24च्या उन्हाळी सत्राच्या 299 परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. उन्हाळी सत्राच्या या परीक्षा मार्चपासून सुरुवात होत आहेत. या उन्हाळी सत्र  परीक्षेला 2 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी बसणार आहेत. या परीक्षेच्या तारखेसोबतच सत्र 6 च्या परीक्षेचे वेळापत्रकही संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत. यातील 2023-24 या शैक्षणिक वर्षाच्या तृतीय वर्ष बीकॉम सत्र …

Read More »

घरात बसलेल्या महिला, तिच्या अल्पवयीन मुलीवर तरुणाचा प्राणघातक हल्ला

Bhandara Crime: घरातील मंडळ बसलेली असतात आणि अचानक कोणीतरी घरात घुसतो आणि धारदार शस्त्राने हल्ला करु लागतो. हल्ला करणाऱ्याला ना स्वत:च्या जीवाची पर्वा, ना दुसऱ्याच्या, अन् ना कायद्याचा धाक… भंडारामध्ये दिवसाढवळ्या असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. काय घडलाय हा प्रकार? जाणून घेऊया.   तुमसर शहरातील दुर्गा नगरात घटना घडली. घरात एक महिला तिच्या अल्पवयीन मुलीसोबत …

Read More »

Maharastra Politics : एकही मंत्री बोलत का नाही? जितेंद्र आव्हाडांनी काढला सरकारचा पाणउतारा, स्पष्ट म्हणाले…

Jitendra Awhad On Namo Rozgar Melava : बारामतीत आज नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन (Namo Rozgar Melava) करण्यात आलं आहे. या मेळाव्याला शरद पवार यांच्यासह, सुप्रिया सुळेही उपस्थित आहेत. तर मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री देखील कार्यक्रमाला हजेरी लावतील. अशातच आता आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) भाजपचा हा मास्टरस्ट्रोक समजला जातोय. अशातच आता याच  नमो रोजगार मेळाव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. …

Read More »

निवडणूक प्रचारात पेनड्राइव्ह दाखवणार, ‘त्या’ भाजप नेत्याचं नावही सांगणार- अनिल देशमुख

Anil Deshmukh: माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. दरम्यान देशमुख यांनी यावर महत्वाचे विधान केले आहे. परमबीर यांनी माझ्यावर 100 कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर मी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून चौकशी करायला सांगितले होते.आरोप झाल्यानंतर निवृत्त न्यायाधीश कैलास चांदीवाल यांच्या समितीने चौकशी केली. दीड वर्षापूर्वी हा अहवाल सरकारकडे …

Read More »

तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडेच, शरद पवार मंचावर असताना काय म्हणाले मुख्यमंत्री?

Baramati CM Eknath Shinde: तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडेच, बारामतीला नंबर एक करु असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे बारामती येथे बारामतीमध्ये नमो रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचे कौतुक केले तर बारामतीकरांना आश्वासन दिले.  मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी बारामतीकरांकडून जय्यत तयारी करण्यात …

Read More »

Weather Forecast : आजही ‘या’ भागात पावसाची शक्यता; विदर्भ,मराठवाड्यात हवामान खात्याचा अंदाज काय?

Maharashtra Weather News In Marathi : गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रासह देशातील हवामानातील बदल पाहायला मिळत आहे.  हवामान विभागाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार आज (2 मार्च) देशाच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. यामध्ये पंजाब, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंडमध् या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही भागात ही …

Read More »

7 मार्च ठरणार महत्त्वाची! नार्वेकरांविरोधातील याचिका प्रकरणात सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाची ‘ती’ मागणी स्वीकारली

shivsena mla disqualification case: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये 7 मार्चची तारीख अत्यंत महत्त्वाची ठरण्याची शक्यात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणात दिलेल्या निकालाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या याचिकेवर 7 मार्च रोजी देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. नार्वेकरांनी काय निकाल दिला महाराष्ट्रातील …

Read More »

मध्य रेल्वे मार्गावर दोन दिवसांचा मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

mumbai local mega block : मध्य रेल्वे मार्गावर दोन दिवसांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. विविध पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करण्यासाठी २ मार्च रोजी कल्याण – कसारा विभागातील अप आणि डाउन ईशान्य मार्गांचा समावेश करून एकात्मिक विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. कल्याण-कसारा विभागात अप आणि डाउन ईशान्य मार्गांवर विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक  रोड क्रेन वापरून खडवली आणि …

Read More »

Loksabha Election 2024: आदित्य ठाकरे लोकसभेच्या रिंगणात? ‘मविआ’च्या 48 संभाव्य उमेदवारांची यादी

Loksabha Election 2024 Maha Vikas Aghadi Expected Candidates List: लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या बैठकींचं सत्र मागील काही दिवसांपासून सुरु आहे. असं असतानाच महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांसहीत वंचित बहुजन आघाडीच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. शरद पवार गटाकडून भाजपामधून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या एकनाथ खडसेंबरोबरच शिरुरचे विद्यमान आमदार अमोल कोल्हेंना …

Read More »

महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठी बातमी,जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price on 1 March 2024 : सोने व चांदीच्या दरात रोजच्या रोज काही प्रमाणात चढउतार सुरू असतो. दरम्यान जागतिक बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मात्र त्याचा देशांतर्गत बाजारावर कोणताही परिणाम झालेला नाही. देशांतर्गत बाजारात सोन्याचे भाव स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे, तर चांदीच्या दरात जोरदार वाढ झाली आहे. जागतिक बाजारात सोने 10.75 डॉलरच्या वाढीसह 2,045.47 …

Read More »

Petrol Diesel Price Today: सरकारकडून पुन्हा कच्चा तेलावर करवाढ; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार की महाग?

Petrol Diesel Price Today In Marathi : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा किंचित वाढ झाली आहे. शुक्रवारी, सकाळी 6 वाजता ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 82.30 डॉलरवर विकले जाणार आहे. दरम्यान, देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारले जातात. जून 2017 पूर्वी दर 15 दिवसांनी किमतीत सुधारणा …

Read More »

शेतकऱ्यांच्या मदतीची ‘गॅरंटी’ कोण घेणार? अवकाळीवरुन ठाकरेंचा सवाल; म्हणाले, ‘सरकार नेत्यांच्या..’

Unseasonal Rain In Maharashtra: राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने जोर धरला आहे. आज सकाळी मुंबई उपनगरांमधील ठाण्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्येही पवासाच्या सरी बरसल्या. अवकाळी पवासामुळे महाराष्ट्रातील वेगवगेळ्या भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. याच नुकसानीसंदर्भात उद्धव ठाकरे गटाने चिंता व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांचं नेमकं काय आणि कसं नुकसान झालं यासंदर्भातील सविस्तर भाष्य करत ठाकरे गटाने सरकार मदतीसाठी फारसं तत्पर दिसत …

Read More »