Loksabha Election 2024: आदित्य ठाकरे लोकसभेच्या रिंगणात? ‘मविआ’च्या 48 संभाव्य उमेदवारांची यादी

Loksabha Election 2024 Maha Vikas Aghadi Expected Candidates List: लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या बैठकींचं सत्र मागील काही दिवसांपासून सुरु आहे. असं असतानाच महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांसहीत वंचित बहुजन आघाडीच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. शरद पवार गटाकडून भाजपामधून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या एकनाथ खडसेंबरोबरच शिरुरचे विद्यमान आमदार अमोल कोल्हेंना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.  याचबरोबर काँग्रेसकडून नाना पटोलेंबरोबरच पुण्यामध्ये रविंद्र धनगेकरांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरेंबरोबरच अमोल कीर्तीकरांना संधी मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदेंचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या कल्याणमधून थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता आहे.

बैठकींचं सत्र

महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भातली बैठक बुधवारी मुंबईतील ट्रायडेंट हाॅटेलमध्ये पार पडली. या बैठकीत लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी जागावाटपावर चर्चा केली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 4 प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणखीन काही बैठका जागावाटपासंदर्भात होतील असे संकेत दिले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जागा वाटपाची घोषणा आम्ही थेट पत्रकार परिषदेमध्येच करु असं म्हटलं होतं. मात्र आता संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली असून यामध्ये कोणत्या मतदारसंघातून कोणाकोणाची नावं आहेत पाहूयात…

हेही वाचा :  जप्त केलेला मुद्देमाल नष्ट करताना झाला स्फोट ; तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

कल्याण – सुष्मा अंधारे किंवा आदित्य ठाकरे (ठाकरे गट)

ठाणे – राजन विचारे (ठाकरे गट)

मुंबई उत्तर पश्चिम – अमोल कीर्तीकर (ठाकरे गट)

मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई  (ठाकरे गट)

अकोला – प्रकाश आंबडेकर (वंचित बहुजन आघाडी)

शिरूर – अमोल कोल्हे (शरद पवार गट)

बारामती – सुप्रिया सुळे (शरद पवार गट)

जळगाव – हर्षल माने  (ठाकरे गट)

 

रायगड – अनंत गीते  (ठाकरे गट)

रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत (ठाकरे गट)

मावळ – संजोग वाघेरे (ठाकरे गट)

शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे (ठाकरे गट)

मुंबई दक्षिण – अरविंद सावंत (ठाकरे गट)

मुंबई ईशान्य – संजय दिना पाटील  (ठाकरे गट)

रामटेक – रश्मी बर्वे, कुणाल राऊत, किशोर गजभिये, तक्षशिला वागधरे (काँग्रेस)

बुलढाणा – नरेंद्र खेडेकर (ठाकरे गट)

नक्की वाचा >> ‘माझ्यासमोर सध्या..’; लोकसभा लढवण्याच्या ऑफरवर जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; फडणवीसांचाही उल्लेख

संभाजीनगर – चंद्रकांत खैरे (ठाकरे गट)

नाशिक – विजय करंजकर  (ठाकरे गट)

अहमदनगर – निलेश लंके (शरद पवार गट)

अमरावती – बळवंत वानखेडे आणि राहुल गडपाले (काँग्रेस)

भंडारा – नाना पटोले (काँग्रेस)

पालघर – भारती कामडी  (ठाकरे गट)

हेही वाचा :  '....इतकं समजत नसेल तर पंतप्रधान कसे होणार?,' राहुल गांधी भेटीनंतर मुलीला म्हणाले होते प्रणव मुखर्जी, 'यांना साधं AM, PM...'

धाराशिव – ओमराजे निंबाळकर  (ठाकरे गट)

यवतमाळ वाशीम – संजय देशमुख (ठाकरे गट)

हिंगोली – सचिन नाईक (काँग्रेस)

परभणी – संजय जाधव (ठाकरे गट)

नक्की वाचा > ‘कोणत्याही सर्व्हेची गरज नाही, मोदींनी..’; ‘अब की बार 400 पार’वर अमित शाह स्पष्टच बोलले

जालना – शिवाजीराव चोथे (ठाकरे गट)

पुणे – रविंद्र धनगेकर (काँग्रेस)

सोलापूर – प्रणिती शिंदे (काँग्रेस)

सांगली – विशाल पाटील (काँग्रेस)

भिवंडी – दयानंद चोरघे (काँग्रेस)

वर्धा – हर्षवर्धन देशमुख किंवा समीर देशमुख (काँग्रेस)

नागपूर – अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, प्रफुल गुडधे (काँग्रेस)

रावेर – एकनाथ खडसे (शरद पवार गट)

दिंडोरी – चिंतामण गावित (शरद पवार गट)

बीड – नरेंद्र काळे (शरद पवार गट)

चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (काँग्रेस)

गडचिरोली – डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. नामदेव किरसान आणि डॉ. नितीन कोडवते (काँग्रेस)

नांदेड – आशा शिंदे (काँग्रेस)

काँग्रेस धुळे – तुषार शेवाळे आणि शामकांत सनेर (काँग्रेस)

नंदुरबार – के सी पाडवी (काँग्रेस)

या जागांबद्दल चर्चा

कोल्हापूरची जागा ठाकरे गटाकडे असेल असं सांगितलं जात आहे. मात्र या जागेवर छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी देऊन ती शरद पवार गटासाठी सोडली जाऊ शकते असा अंदाज आहे. हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली जाणार असल्याचं समजतं. मात्र अद्याप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीमध्ये येण्याची तयारी न दर्शवल्याने ही जागा ठाकरे गटाकडे आहे. साताऱ्यामधून शरद पवार गटाच्या श्रीनावस पाटील यांना उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता आहे. मात्र श्रीनिवास पाटील यांनी त्यांच्या मुलाला म्हणजेच सारंग पाटीलला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. माढा मतदारसंघामधून लक्ष्मण हाके ठाकरे गटाचे प्रवक्ते असले तरी ते तुतारी या शरद पवारांच्या गटाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :  शिंदे गट की भाजपा; काँग्रेसच्या मिलिंद देवरांसमोर मोठं कोडं; 'त्या' एका ऑफरवर होणार भवितव्याचा फैसला

नक्की वाचा >> Lok Sabha Election 2024 BJP First List: भाजपाकडून गंभीरची विकेट? सेहवागवर नवी जबाबदारी?

उमेदवार न ठरलेले मतदारसंघ

मुंबई उत्तर मध्य मुंबईची जागा काँग्रेससाठी सोडली असली तरी तिथला उमेदवार अजून ठरलेला नाही. अशीच स्थिती काँग्रेसच्या मुंबई उत्तर मतदारसंघाची आहे. याचप्रमाणे लातूर मतदारसंघातील उमेदवार अद्याप ठरलेला नाही. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …

लोकांना हसवून करा ‘इतकी’ कमाई! स्टॅंडअप कॉमेडीमध्ये करिअरची सर्व माहिती

Career in Standup Comedy: तुम्हाला लोकांना हसवायला आवडतं? तुम्ही लोकांना हसवू शकता? तुम्हाला लाफ्टर शो …