दिशा पाटनीकडे युजरनं मागितला बिकिनी फोटो, तिने अशी केली त्याची बोलती बंद! | user ask for best bikini photo to disha patani she share picture goes viral

बिकीनी फोटोची मागणी करणाऱ्या युजरला दिशानं पाठवलेला फोटो व्हायरल होतोय.

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळेच अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. फिटनेसच्या बाबतीत प्रचंड जागरुक असलेली दिशा अनेकदा बिकीनी फोटो देखील तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते. पण जेव्हा नुकतंच एका चाहत्यानं इन्स्टाग्राम सेशनमध्ये तिच्याकडे बिकिनी फोटो मागितला तेव्हा मात्र तिनं मजेदार अंदाजात त्याची बोलती बंद केली.

दिशा पाटनीनं तिच्या इन्स्टाग्राम चाहत्यांसाठी नुकतंच ‘Ask Me Anything’ हे सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये तिनं चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर दिलं. पण एका युजरनं मात्र या सेशनमध्ये खोडसळपणे तिच्याकडे बेस्ट बिकिनी फोटो मागितला. त्यावर दिशानंही त्याला जशाच तसं उत्तर देत एक मजेदार फोटो शेअर करून त्या युजरची बोलती बंद केली.

आणखी वाचा- घटस्फोटाच्या ८ महिन्यांनंतर आमिर खाननं सोडलं मौन, सांगितलं १५ वर्षांचा संसार मोडण्याचं कारण

युजरच्या खोडसळ प्रश्नाला सडेतोड उत्तर देताना दिशाने एका पाणमांजराचा बिकिनी घातलेला मजेदार फोटो शेअर केला. दिशानं शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान दिशा पाटनी नेहमीच तिच्या फॅशन आणि ड्रेसिंग स्टाइलमुळे चर्चेत असते. याशिवाय अभिनेता टायगर श्रॉफ आणि तिच्या नात्याची देखील अनेकदा चर्चा होताना दिसते. मात्र या दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याची कबुली दिलेली नाही.

हेही वाचा :  भारतातील 'या' गावात नाही चालत सरकारचे नियम; इथं मिळतो वेगळ्याच दुनियेचा अनुभव

आणखी वाचा- प्रभासच्या ‘राधे श्याम’वर The Kashmir Files पडला भारी, तिसऱ्या दिवशी चित्रपटानं केली एवढी कमाई

दिशा पाटनीच्या कामाबद्दल बोलायचं तर ती येत्या काळात मोहित सूरीच्या ‘एक विलेन रिटर्न्स’ आणि ‘योद्धा’मध्ये दिसणार आहे. याशिवाय सध्या ती एकता कपूरच्या ‘केटीना’ या चित्रपटावरही काम करत आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …