“टायगर नेहमीच तयार असतो…”, सलमान खान आणि कतरिनाचा बहुचर्चित Tiger 3 चा टीझर प्रदर्शित


बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि सलमान खान लवकरच ‘टायगर ३’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘टायगर ३’ यांच्या चित्रपटाचा टीझर नुकतंच प्रदर्शित झाला आहे. सलमान खानने स्वत: या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याद्वारे त्यांनी हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची तारीखही सांगितली आहे.

सलमान खानने त्याच्या अधिकृत ट्विटरवरुन ‘टायगर ३’ चा टीझर शेअर केला आहे. ‘टायगर ३’ या टीझरची सुरुवातीला कतरिना कैफचा जबरदस्त अॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे. यावेळी ती स्टंट करताना दिसत आहे. यावेळी ती इतरांना स्टंट कसे करायचे हे शिकवत असल्याचेही दिसत आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओत सलमानची झलक पाहायला मिळत आहे. यावेळी सलमान हा झोपलेला दिसत आहे. त्यावेळी कतरिना ही त्याला उठवते आणि म्हणते ‘तयार आहेस का?’ यावर सलमान म्हणतो, ‘टायगर हा नेहमीच तयार असतो’. ‘टायगर ३’ या चित्रपटाचा टिझर सध्या चांगलाच चर्चेत आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना सलमानने ‘टायगर ३’ कधी प्रदर्शित होणार? याची तारीखही सांगितली आहे. “सर्वांनी आपली काळजी घ्या… ‘टायगर ३’ येत्या २१ एप्रिल २०२३ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. ‘टायगर ३’ हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू या भाषेत प्रदर्शित होणार आहे.”

हेही वाचा :  दोन मुली, १६ वर्षांचा संसार, जाणून घ्या का मोडलं फरहान अख्तरचं पहिलं लग्न

‘टायगर ३’ हा चित्रपट अॅक्शन चित्रपटांच्या मालिकेतील आहे. लवकरच सलमान खान आणि कतरिना कैफ हा ‘टायगर ३’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘टायगर ३’ या चित्रपटाचे शूटींग हे १४ फेब्रुवारीपासून दिल्लीत सुरु झाले आहे. याचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे.

‘टायगर ३’ यात सलमान पुन्हा एकदा रॉ एजंटची भूमिका साकारताना दिसेल. तर कतरिना यात आयएसआय एजंट झोयाची भूमिका साकारणार आहे. यात आभिनेता इमरान हाशमी खलनायकेच्या भूमिकेत दिसेल. याआधी सलमान आणि कतरिनाने अली अब्बास जाफरच्या ‘भारत’या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यामुळे त्यांचे चाहते त्यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.

The post “टायगर नेहमीच तयार असतो…”, सलमान खान आणि कतरिनाचा बहुचर्चित Tiger 3 चा टीझर प्रदर्शित appeared first on Loksatta.

हेही वाचा :  “महानायकाला आणि महामानवाला तू एकाच फ्रेममध्ये आणलंस हे फक्त…”, ‘झुंड’ पाहिल्यानंतर जितेंद्र जोशीची भावूक प्रतिक्रियाSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ATM वापराचं शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव; Per Transaction फी पाहून बसेल धक्का

Big News For Bank Customer: भारतातील एटीएम ऑपरेटर्सची संस्था असलेल्या कॉन्फीडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीने (Confederation …

‘मोदींच्या मनमानीविरुद्ध..’, ‘सत्तेतले नक्षलवादी’ म्हणत ठाकरे गटाची शिंदे-फडणवीस, मोदी-शाहांवर टीका

Urban Naxal Issue: शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कठोर शब्दांमध्ये टीकास्र सोडलं …