शेतकऱ्यांच्या मदतीची ‘गॅरंटी’ कोण घेणार? अवकाळीवरुन ठाकरेंचा सवाल; म्हणाले, ‘सरकार नेत्यांच्या..’

Unseasonal Rain In Maharashtra: राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने जोर धरला आहे. आज सकाळी मुंबई उपनगरांमधील ठाण्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्येही पवासाच्या सरी बरसल्या. अवकाळी पवासामुळे महाराष्ट्रातील वेगवगेळ्या भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. याच नुकसानीसंदर्भात उद्धव ठाकरे गटाने चिंता व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांचं नेमकं काय आणि कसं नुकसान झालं यासंदर्भातील सविस्तर भाष्य करत ठाकरे गटाने सरकार मदतीसाठी फारसं तत्पर दिसत नसल्याची टीका केली आहे.

संकटे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली

“निसर्गाच्या लहरीपणामुळे सतत येणारी संकटे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहेत. शेतकऱ्यांना सुखाने जगूच द्यायचे नाही, असा चंगच जणू निसर्गाने बांधलेला दिसतो. गेल्या पंधरवड्यापासून सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्रातील अनेक जिल्हय़ांना वादळी वारे, अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपून काढले आहे व त्यामुळे शेतातील काढणीला आलेल्या पिकांना याचा जबर फटका बसला आहे. राज्यातील विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ठिकठिकाणी गारपीट व अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. शिवाय गारपीट व अवकाळीचा हा तडाखा आणखी काही दिवस असाच सुरू राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस व गारपिटीच्या या तांडवात शेतमालाचे आणखी किती नुकसान होणार, या भयाने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. वास्तविक जानेवारी महिन्यात थंडीचा कडाका संपून फेब्रुवारीच्या प्रारंभी उन्हाळ्याची चाहूल सुरू होते. त्याप्रमाणे उन्हाचा तडाखा सुरूही झाला होता. शेतात उभ्या असलेल्या गहू, ज्वारी, हरभरा इत्यादी पिकांना वाळण्यासाठी काढणीपूर्वी तापमानाचा पारा चढलेलाच असावा लागतो. मात्र काही दिवस वातावरणातील उष्मा वाढल्यानंतर हवामानात बदल झाला आणि गेल्या 15 दिवसांत दोन वेळा विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपून काढले. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला गहू हरभरा, ज्वारी या पिकांचा घास निसर्गाने हिरावून घेतला आहे,” असं ठाकरे गटाने राज्यातील सध्याची परिस्थिती सांगताना म्हटलं आहे.

हेही वाचा :  बापरे! रोहित शर्माला पुणे पोलिसांना ठोठावला दंड, पुणे-मुंबई एक्सप्रेसवरील 'ती' चूक पडली महागात

मदतीची ‘गॅरंटी’ कोणी घेणार?

अवकाळी पावसाच्या मुद्द्यावरुन सरकारला लक्ष्य करताना ठाकरे गटाने सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून सुरु असलेल्या मोदी की गॅरंटी या मोहिमेचा संदर्भ देत सत्ताधाऱ्यांना सवाल केला आहे. “अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे व फळबागांचे गेले काही दिवस अतोनात नुकसान सुरू असताना सरकार मात्र राजकीय पक्ष व नेत्यांच्या फोडाफोडीत रमले आहे. महसूल प्रशासनही तोंडावर आलेल्या निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहे. अवकाळीच्या तडाख्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे कधी होतील व शेतकऱ्यांना मदत कधी मिळेल, याचे कुणालाच काही पडलेले नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीची ‘गॅरंटी’ कोणी घेणार आहे काय?” असा सवाल ‘सामना’च्या अग्रलेखात विचारण्यात आला आहे.

जबर फटका

“अनेक शेतकऱ्यांनी गहू व ज्वारी कापून वाळण्यासाठी शेतात त्यांचे ढिगारे रचून ठेवले होते, तर काही शेतकऱ्यांची पिके सोंगणीला आली होती. मात्र सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने मळणी यंत्रात जाण्यासाठी सज्ज असलेला गहू पुरता भिजवून टाकला, तर कुठे वादळी वारे व पावसाने उभ्या पिकांना मोठाच फटका दिला. पिवळ्या धमक झालेल्या गव्हाच्या ओंब्या पावसात भिजल्याने गव्हाच्या प्रत्येक दाण्यावर आता पांढरे डाग पडतील आणि गव्हाचा रंगही बदलून जाईल. अशा डागी व पांढऱ्या पडलेल्या गव्हाला बाजारात भाव मिळत नाही. हरभऱ्याचीही तीच कथा. काढणीला आलेल्या हरभऱ्यावरील वाळलेले कवच वारे व पावसाने फुटले व अनेक ठिकाणी हरभऱ्याचे दाणे मातीत मिसळले. या हरभऱ्याला आता जागेवरच कोंब फुटतील. गेली दोनेक वर्षे ज्वारीचे भाव वाढल्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ज्वारीची पेरणी केली होती. मात्र काढणीला आलेल्या ज्वारीलाही गहू व हरभऱ्याप्रमाणेच जबर फटका बसला,” असा उल्लेख लेखात आहे.

हेही वाचा :  रेल्वे गोंधळली आणि जगाला मिळाली योग्य 'वेळ'; गोष्ट अशा गावाची जिथून चालतं संपूर्ण जगाचं घड्याळ

आता 2 रुपयांचा तरी भाव मिळतो की नाही, अशी भीती

“केवळ गहू, ज्वारी आणि हरभरा या तीन पिकांनाच अवकाळी व गारपिटीचा फटका बसला असे नाही. भाजीपाला, शेड-नेटमधील मोठ्या गुंतवणुकीची पिके व हजारो हेक्टरवरील टरबूज अथवा कलिंगडाच्या पिकाचेही या अवकाळीने अतोनात नुकसान केले. शेतकऱ्यांनी जिवापाड मेहनत घेऊन वाढवलेल्या टरबुजांवर अवकाळी पावसाने आता काळे डाग पडतील आणि 10 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या टरबुजाला आता 2 रुपयांचा तरी भाव मिळतो की नाही, अशी भीती टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना सतावत आहे. याशिवाय आंबा, मोसंबी, डाळिंब आणि द्राक्षाच्या बागांचेही अवकाळी व गारपिटीच्या फटक्याने मोठे नुकसान झाले आहे. आंब्याचा मोहर गळून पडला आहे. अनेक ठिकाणी कच्ची मोसंबी तुटून त्यांचा फळबागेत खच पडला आहे. गेले तीन-चार दिवस विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस व गारपिटीचा धुमाकूळ सुरू आहे,” असं लेखात म्हटलंय.

‘यलो अलर्ट’ 

“शेतकऱ्यांनी कित्येक दिवस खपून व काबाडकष्ट करून घेतलेल्या पिकांचे, फळबागांचे या अवकाळीने अपरिमित नुकसान केले. त्यातच हवामान खात्याने आणखी 2 मार्चपर्यंत ‘यलो अलर्ट’ जारी केल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे,” असाही उल्लेख लेखात आहे.

हेही वाचा :  Nipah Virus महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर? कर्नाटकने जारी केला अलर्ट; केरळमधील रुग्णसंख्येनं वाढलं टेन्शन

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘Double Digit पगारवाढीचा एकमेव मार्ग म्हणजे..’; Appraisals बद्दल कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना सल्ला

Double Digit Appraisal Salary Hike: सध्या कॉर्पोरेटमध्ये वार्षिक आढावा म्हणजेच अ‍ॅन्यूअल रिव्ह्यू आणि पगारवाढ निश्चित करण्याचा …

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …