Nipah Virus महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर? कर्नाटकने जारी केला अलर्ट; केरळमधील रुग्णसंख्येनं वाढलं टेन्शन

Nipah Virus Updates: केरळमध्ये निपाहच्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. राज्य सरकारनेही यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. असं असतानाच आता निपाहची दहशत महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर म्हणजेच कर्नाटकपर्यंत पोहोचली आहे. कर्नाटकमध्येही निपाहचं संकटाची चाहूल लागली असल्याने राज्य सरकारने अलर्ट जारी केला आहे.

पत्रक केलं जारी

केरळमधील निपाह रुग्णांची संख्या पाहून कर्नाटक सरकारने एक पत्रक जारी केलं आहे. जनतेनं केरळमधील निपाह प्रभावित भागांमध्ये गरज नसताना प्रवास करु नये असा सल्ला दिला आहे. कर्नाटकच्या आरोग्य विभागाने केरळच्या सीमा भागातील जिल्ह्यांना म्हणजेच कोडागु, दक्षिण कन्नड, चामराजनगर आणि मैसूरमध्ये अलर्ट जारी केला आहे. कर्नाटकमधून केरळमध्ये प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवरील तपासणी वाढवण्यात आली आहे.

पाठवले विशेष डोस

केरळमधील कोझिकोड जिल्ह्यामधील निपाह विषाणूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने शिक्षण संस्था आणि क्लासेसला 16 सप्टेंबरपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. मात्र विद्यापीठांच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. निपाह संसर्ग झालेल्यांवर उपचार करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर वापरलं जाणारं ‘मनोक्लोनक अॅण्टीबॉडी’ हे डोस इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या माध्यमातून केरळमध्ये पाठवण्यात आलं आहे. कोझिकोडमध्ये निपाहचा संसर्ग झाल्याने 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य 3 रुग्णांच्या चाचण्यांचे नमुने सकारात्मक आढळून आले आहेत. संसर्ग झालेल्या एका 9 वर्षाच्या मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. 

हेही वाचा :  Parliament Winter Session : संसदेचं हिवाळी अधिवेशन गुंडाळलं

 77 जणांवर विशेष लक्ष

‘मनोक्लोनक अॅण्टीबॉडी’ चे डोस केरळमध्ये पोहोचल्यानंतर राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी या संसर्गाबद्दल केंद्राच्या विशेष समितीबरोबर चर्चा झाल्याची माहिती दिली. तज्ज्ञांच्या समितीच्या सल्ल्यानुसार पुढील कारवाई केली जाईल असं जॉर्ज म्हणाल्या. घाबरण्याची गरज नसल्याचं जॉर्ज यांनी सांगितलं आहे. आपण सर्व एकत्रितपणे या संकटाचा सामना करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार केरळात शासनातर्फे ‘कंटेन्मेंट झोन’ही तयार करण्यात आले असून, जवळपास 700 नागरिकांची एक यादी तयार करण्यात आली आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या या नागरिकांपैकी 77 जणांवर विशेष लक्ष दिलं जात आहे. या 77 जणांना अतीधोकादायक वर्गात गणलं जात आहे. निपाह विषाणूच्या संसर्गामध्ये 70 टक्के रुग्णांचा मृत्यू होत असल्याची सरासरी आकडेवारी असल्यामुळं सध्या ही चिंता आणखी वाढताना दिसत आहे.

विशेष टीमबरोबर बैठक

राज्य सरकारने आरोग्य विभागाचे मुख्य सचिव आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. 2018 साली निपाहच्या संसर्गाच्या वेळी ‘एम 102.4 मनोक्लोनक अॅण्टीबॉडी’ आयात करण्यात आलं होतं. मात्र हा डोस देण्यात आला नव्हता कारण हे डोस भारतात येईपर्यंत संसर्ग कमी झाला होता.

हेही वाचा :  Weather Update: राज्यात पुढील 3-4 दिवसांत तापमानात होणार वाढ; हवामान विभागाचा इशारा

2018 आणि 2021 मध्येही सापडलेले निपाहचे रुग्ण

राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी मरण पावलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरु आहे असं सांगितलं. कोझिकोड जिल्ह्यामध्ये 2018 आणि 2021 मध्येही निपाह व्हायरसमुळे लोकांचा मृत्यू झाल्याची प्रकरण समोर आली होती. दक्षिण भारतामध्ये निपाह विषाणूच्या संसर्गाचं पहिलं प्रकरण 19 मे 2018 रोजी समोर आलं होतं.

निपाह व्हायरसची लक्षणं काय?

जर एखाद्या व्यक्तीला निपाह व्हायरसची लागण झाली असेल तर त्याला खूप ताप, डोकेदुखी, श्वसनाचा त्रास, घसा खवखवणे, अॅटिपिकल न्यूमोनिया यांसारखी लक्षणं दिसतात. परिस्थिती अधिक गंभीर असल्यास, व्यक्ती 24 ते 48 तासांच्या आत एन्सेफलायटीसची शिकार होऊ शकते आणि कोमात जाऊ शकते. निपाह व्हायरसची लक्षणं 5 ते 14 दिवसात दिसू शकतात. परंतु काही प्रकरणांमध्ये हा काळ 45 दिवसांपर्यंत वाढू शकतो. इतक्या काळात आपण इतक्या लोकांना भेटती की, किती जणांना संक्रमित केलं आहे हे समजणारही नाही. काही प्रकरणांमध्ये एखाद्या व्यक्तीला अजिबात लक्षणं दिसत नाही असंही होऊ शकतं. 

नेमकी काय काळजी घ्यावी?

जर तुम्हालाही आपल्याला निपाह व्हायरसची लागण झाल्याची शंका असेल तर आरटी-पीसीआर चाचणी करुन घ्या. याशिवाय पीसीआर, सीरम न्यूट्रिलाइजेशन आणि एलाइजा टेस्टच्या माध्यमातून व्हायरसची माहिती घेऊ शकता.

हेही वाचा :  मोदी सरकारला टक्कर देण्यासाठी इंडियाचा जबरदस्त प्लान; काय आहे रनर अप फॉर्म्युला?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …

पतीसोबत झालेल्या भांडणाचा राग पोटच्या लेकावर काढला; 6 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Woman Tossed Her Son: कर्नाटकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने पतीसोबत झालेल्या …