राजकारण

विद्येचं माहेरघर बनतंय ड्रग्स कॅपिटल, पुण्यात भर वस्तीत अंमलीपदार्थांचा कारखाना… असा झाला खुलासा

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी दिवसभरात केलेल्या कारवायांमध्ये तब्बल 600 किलो पेक्षा अधिक मेफॅड्रोनचा साठा (Mephedrone Drugs) जप्त करण्यात आला आहे. 1100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे मेफेड्रोन पोलिसांनी (Pune Police) जप्त केलंआहे. विश्रांतवाडी इथल्या भैरवनगरमध्ये असलेल्या एका गोदामामधून 55 किलो, कुरकुंभ एमआयडीसीमधील ( MIDC) एका फॅक्टरीमधून 500 किलोच्या आसपास साठा करून ठेवण्यात आलेला …

Read More »

‘सगेसोयऱ्यांची 2 दिवसांत अंमलबजावणी करा, अन्यथा…’, मनोज जरांगे पाटलांचा इशारा

Maratha Reservation: आम्हाला नको असलेलं आऱक्षण सरकार देत आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात नेमकी अडचण काय आहे? अशी विचारणा मनोज जरांगे यांनी केली आहे. मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे लोकांशी संवाद साधाताना कुणबी प्रमाणपत्र ने घेणाऱ्यांना पश्चाताप होईल असंही सांगितलं. आता ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांचा उल्लेख …

Read More »

‘एकनाथ शिंदेंनी महाराजांची खोटी शपथ घेतली…’ मराठा आरक्षणावरुन राऊतांनी डागली तोफ!

Sanjay Raut On Maratha Reservation: राज्य सरकारने मंगळवारी विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले आहे. ‘सरकारने 10 टक्के आरक्षणाचा फसवणुकीचा प्रयत्न केला तो समाजाला अजिबात मान्य नाही. त्यांची फसवणूक झाली. सरकार त्यांचे समाधान करण्यास अयशस्वी झाले आहे,’ अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.  ‘भारतीय जनता पक्ष हा फसवा फसवीच्या पायावर उभा आहे. आणि …

Read More »

Pune Crime : 3 दिवसात 4 हजार कोटींचे एमडी ड्रग्स जप्त, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Pune Police also raided Delhi News In Marathi : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. आधी दहशतवाद्यांच्या रडारवर, कोयता गॅंग अधूनमधून सक्रीय, मोकोकासारखी पोलिसांची कारावाई केली. अशा गुन्हेगारी मोडण्यासाठी पोलिसांचे जोरदार प्रयत्न सुरु असताना पुणे शहरात मिळणारे अंमलीपदार्थ हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. पुण्यात पुन्हा एकदा मोठा साठा मिळाला आहे. आता पुण्यातील ड्रग्स विक्रीचे दिल्ली कनेक्शन समोर …

Read More »

मोठी बातमी! धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्याने 500 जणांना विषबाधा

मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : माघ एकादशीच्या निमित्ताने सुरू असणाऱ्या एका धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्याने तब्बल पाचशे ते सहाशे भाविकांना विषबाधा झाली. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात ही घटना घडली. लोणार तालुक्यातील सोमठाणा, खापरखेड या गावांमध्ये धार्मिक कार्यक्रम चालू होता यामध्ये उपवास असल्या कारणानं प्रसाद म्हणून भगर आणि शेंगदाण्याची आमटी करण्यात आली होती.  कार्यक्रमानंतर तयार करण्यात आलेल्या या प्रसादाचं अर्थात …

Read More »

तिस-यांदा दिलेलं मराठा आरक्षण तरी टिकणार का? यापूर्वी दोन मुख्यमंत्र्यांनी दिलेले आरक्षण का बाद झाले?

Maratha Reservation : मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर झालाय. त्यामुळे मराठा समाजाला 10% आरक्षण मिळणारंय. मराठा समाजाला कायद्यात टिकणारं आरक्षण मिळेल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी दिलीय. या आरक्षणामुळे ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्यात आता तिस-यांदा मराठा आरक्षण देण्यात आलं आहे.  मराठा समाजाला आता नोकरीत आणि शिक्षणात 10% आरक्षण मिळणार मराठा आरक्षणाच्या गेल्या …

Read More »

महाराष्ट्रातील शिक्षकांची ‘या’ सक्तीच्या कामातून होणार सुटका? राज ठाकरे फक्त बोलले अमित ठाकरे थेट मंत्रालयात गेले

Maharashtra Election Commission : निवडणूक आयोगाच्या कामावरून राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोग शिक्षकांना कामाला लावतं मग निवडणूक आयोग काय काम करतं ? 5 वर्षे निवडणूक आयोगाला काय काम असतं असा सवाल राज ठाकरेंनी केला. शिक्षकांनी निवडणूक आयोगाच्या कामाला रुजू होऊ नये. कोण कारवाई करतो ते बघतोच असा इशारा त्यांनी दिला होता. यानंतर आता अमित ठाकरे यांनी मुख्य …

Read More »

महाराष्ट्रातील अनोखे आश्रयस्थळ; प्रेमासाठी घरातून पळून आलेल्या जोडप्यांना येथे मिळतो आश्रय

तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : प्रेमाला जाती पातीचं बंधन नसतं. मनाशी मनाचे सुर जुळले की जातीपातीच्या मर्यादा देखील ओलांडल्या जातात. समाजाचा विरोध जुरगारुन अनेक जोडपी जातीय, आंतरजातीय विवाह करतात. सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या या जोडप्यांना समाजाविरोधात लढावं लागतं. घरातून पळून जाणाऱ्या बऱ्याच जोडप्यांना कुठेच आश्रय मिळत नाही. सुखासाठी संघर्ष करणाऱ्या जोडप्यांचा समाजाविरोधीत लढाईत पराजय होतो. यामुळेच सैराट सारख्या घटना …

Read More »

Maratha Reservation : कुठल्या आधारावर आरक्षण दिलं? रोहित पवारांना का वाटते भीती? म्हणाले…

Rohit Pawar On Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी बोलवण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात (Maharashtra Assembly Session) ‘महाराष्ट् राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण विधेयक 2024’ मांडण्यात आलं होतं. अशातच मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचा कायदा आता राज्याच्या विधानसभेत पारीत झाला आहे. मात्र, आम्हाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिलं गेलं पाहिजे. त्यामुळे केंद्रीय आणि राज्य पातळीवर मराठा समाजाला आरक्षण …

Read More »

बारावीच्या विद्यार्थ्यांनो, परीक्षा देण्यापुर्वी ‘या’ गोष्टी अजिबात विसरु नका!

HSC Exam: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा उद्यापासून म्हणजेच 21 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची सर्व विषयाचा अभ्यास एव्हाना झाला असेल. वर्षभर केलेला अभ्यास योग्यपण उत्तरपत्रिकेवर उतरवण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे.  यंदा या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण 15 लाख13 हजार 909 विद्यार्थ्यांनी (Students) नोंदणी केलेली आहे. यामध्ये 8 लाख 21 हजार 450 …

Read More »

मर्यादा ओलांडली तरीही सुप्रीम कोर्टात कसं टिकेल मराठा आरक्षण? मुख्यमंत्र्यांनीच दिलं उत्तर!

Maratha Reservation Survive in the Supreme Court: मराठा आरक्षण विधेयक सभागृहात एकमताने मंजूर झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भातील घोषणा केली. यानंतर राज्यभरातील मराठा बांधवांमध्ये आनंद, उत्साहाचे वातावरण आहे. ओबीसीमधून मराठा आरक्षण दिले जावे अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीर कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. काहीही झाले तरी आरक्षण मिळणार नाही, मिळाले तरी टिकणार नाही, …

Read More »

Maratha Reservation Bill : मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिल्यानंतर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाले…

Maharashtra Assembly Session : राज्य सरकारच्या वतीने मांडण्यात आलेलं ‘महाराष्ट् राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण विधेयक २०२४’ विधानसभेत (Maratha Reservation Bill) एकमतानं संमत करण्यात आलं आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतल्यानंतर तीन महिन्यात आरक्षणाचा निर्णय आम्ही घेतला, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटलं …

Read More »

मराठा आरक्षण निर्णयानंतर विधानसभेत गोंधळ…भुजबळांचा आक्रोश, ‘जे जरांगे मला धमक्या देतात…’

Chhagan Bhujbal On Manoj Jarange: विधानभवन मराठा आरक्षण विधायक मंजूर करण्यात आले. विधानभवनाबाहेर जल्लोष करण्यात येत आहे. फटाके आणि ढोल ताशे वाजविण्यात येत आहे. दरम्यान ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी विधेयक मांडले. त्यानंतर सभागृहात ते एकमताने संमत झाले. यावेळी छगन भुजबळ बोलण्याची मागणी करत होते. पण विधेयक आवाजी मतदाने मंजूर करण्यात आले. यावेळी विधानभवनात नेमके काय झाले? भुजबळ काय …

Read More »

‘दहा हजारच्या 2 माळा लावा, असा जल्लोष करा की उद्धव साहेबांच्या कानठळ्या बसल्या पाहिजेत’

Bharat Gogavale: आज मराठा समाजासाठी सर्वात मोठा दिवस आहे. ज्या मागण्यांसाठी समाज लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला. शांततापूर्वक आंदोलने केली. त्या आंदोलनाचे फलित आज मिळाले आहे. राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी मान्य केली आहे. मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन घेऊन यासंदर्भातील घोषणा केली आहे. यानंतर मराठा समाजामध्ये आनंद, जल्लोषाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे …

Read More »

बारावीची परीक्षा उद्यापासून! भरारी पथक, मोबाईलवर चित्रीकरण आणि … शिक्षण विभाग सज्ज

HSC Exam Schedule 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला (12th Board Exam) उद्यापासून म्हणजे 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळात परीक्षा पार पडणार आहे. यंदा या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण 15,13,909 …

Read More »

वादा तोच पण, दादा नवा…! राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झळकले बॅनर, पुण्याचा नवा दादा कोण?

हेमंत चापुडे, झी मीडिया Rohit Pawar: अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पुण्याचा दादा कोण अशी चर्चा आता बॅनरवर रंगली आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात वादा तोच..! पण .. दादा नवा अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. त्यामुळं राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या बॅनरमुळं उत्तर पुणे जिल्ह्यात अजितदादाची जागा रोहित पवार घेत …

Read More »

Maharastra Politics : ‘अजित पवारांचा कट उधळून लावलाय, त्यांना…’, जितेंद्र आव्हाडांची सडकून टीका!

Jitendra Awhad On Ajit Pawar : निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Ajit Pawar) गटाला दिलं होतं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. अजित पवार गटाकडून राज्यसभा निवडणुकीसाठी व्हीप बजावला जाऊ शकतो, ही बाब पवार गटाकडून सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निदर्शनास आणून दिली गेली. त्याच पार्श्वभूमीवर शरद …

Read More »

हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना! काश्मिर खोऱ्यातील रोमांचक व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहावासा वाटेल

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांची आज 394 वी जयंती आहे.किल्ले शिवनेरीवर आज शासकीय शिवजयंती साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. काश्मिरमध्ये  छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना देण्यात आली. हिमवर्षाव होत असताना सैनिकांनी  छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला. काश्मिर खोऱ्यात साजऱ्या झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज …

Read More »

विशेष अधिवेशनात होणार मराठा आरक्षणाचा कायदा? सगेसोयरे शब्दासह मिळणार मराठा आरक्षण?

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी उद्याचा दिवस सर्वात महत्त्वाचा आहे. कारण मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने उद्या विशेष अधिवेशन बोलावलंय. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे.  काय म्हणाले मुख्यमंत्री? मराठा आरक्षणासाठी उद्या राज्याचं एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आलंय. या अधिवेशनात …

Read More »

वसई-भाईंदर प्रवास सागरी मार्गाने, 15 मिनिटांत पोहोचणार; वाचा तिकिट दर

Bhayandar-Vasai Ro Ro Service: वसई ते भाईंदर दरम्यान प्रवासी फेरीबोट सेवा मंगळवारी 20 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत वसई खाडीत प्रायोगिक तत्वावर रो-रो प्रवासी फेरीबोट सुरू करण्यात येत आहे. या प्रवासी फेरी बोटीचे तिकिट दर किती असतील? जाणून घेऊया सर्व काही  केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअतंर्गंत भाईंदर पश्चिम ते वसई किल्ला रोरो सेवा सुरू करण्याचा निर्णय 2016 …

Read More »