मराठा आरक्षण निर्णयानंतर विधानसभेत गोंधळ…भुजबळांचा आक्रोश, ‘जे जरांगे मला धमक्या देतात…’

Chhagan Bhujbal On Manoj Jarange: विधानभवन मराठा आरक्षण विधायक मंजूर करण्यात आले. विधानभवनाबाहेर जल्लोष करण्यात येत आहे. फटाके आणि ढोल ताशे वाजविण्यात येत आहे. दरम्यान ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी विधेयक मांडले. त्यानंतर सभागृहात ते एकमताने संमत झाले. यावेळी छगन भुजबळ बोलण्याची मागणी करत होते. पण विधेयक आवाजी मतदाने मंजूर करण्यात आले. यावेळी विधानभवनात नेमके काय झाले? भुजबळ काय म्हणाले? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी बोलयला देण्याची मागणी केली. भुजबळांनी माईकचा बटण दाबून ठेवलं होतं. शेजारी बसलेल्या विखे पाटलांनी माईक बंद केला. पण भुजबळांनी परत माईक सुरू केला. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र ‘बोलू नका’असा इशारा भुजबळांना केला. 

पण भुजबळ अखेर माईक सुरु करुन बोललेच. ज्या जरांगे उल्लेख सीएम करतात ते धमक्या देतात. शिव्या देतात. मला धमक्या दिल्या, असे भुजबळ म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याखाली बसून ते मुख्यमंत्री आणि पोलिस अधिकाऱ्यांना शिव्या देतात. जरांगेंची दादागिरी सुरू असून ती थांबवणार की नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला. भीतीचे वातावरण मुद्दाम केले जात असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा :  ED ची सलग 12 तास चौकशी, बेशुद्ध होऊन कोसळली तेजस्वी यादव यांची गर्भवती पत्नी, जाणून घ्या काय झालं?

माझे आंदोलन संपणार नाही असे ते सांगतात. याचा अर्थ उपोषण थांबवणार नाही. दादागिरी थांबवणार नाही हे दिसून येते, असेही भुजबळ म्हणाले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भुजबळांना उत्तर दिले.  तुमच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल. यावर  शासनाने योग्य ती कार्यवाही करावी, असे म्हणत सभागृहाचे कामकाज संपले असे विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केले. 

असे असले तरी ओबीसी नेते छगन भुजबळ, विजय वड्डेटीवार यांचा विरोध कायम आहे. हे विधेयक निवडणुकीच्या तोंडावर आणून फसगत करण्याचा प्रयत्न असल्याचे वडेट्टीवार यावेळी म्हणाले.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी, डेस्टिनेशन वेडींगमध्ये ‘असं’ काही झालं की वऱ्हाडाचा उडाला गोंधळ

Destination Wedding: महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी…यांच्या लग्नात उडाला गोंधळ…असंकाही तरी हेडींग वाचून तुम्ही याचा …

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …