‘देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये आहेत तोपर्यंत मतदान करणार नाही; सोलापुरात मराठा समाजाने घेतली शपथ

अभिषेक आदेप्पा, झी मीडिया, सोलापूर : सोलापुरात मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. सोलापुरातल्या एका गावात मराठा समाजाने भाजपा आणि मित्र पक्षाला मतदान न करण्याची सामूहिक शपथ घेतली आहे. ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांना साक्ष ठेवत ही शपथ घेतली. सरकारने दिलेले आरक्षण हे कोर्टात टिकणारे नसून , मराठा समाजाची फसवणूक झाल्याचा आरोप मराठा समाजाने केला. त्यामुळे यापुढे भाजपच्या उमेदवाराला मतदान करणार नाही, अशी शपथ गावातल्या मराठा समाजाने घेतली आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी ग्रामस्थ भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाच्या वतीने भाजप आणि देवेंद्र फडणीवीसांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. यावेळी सामूहिक शपथ घेण्यात आली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने शपथ घेतली आहे. भाजप, देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या मित्रपक्षाला आम्ही सहकार्य करणार नाही अशी शपथ घेतली आहे. त्यामुळे भाजपच्या कोणत्याही उमेदवाराने कोंडी गावामध्ये पाऊल ठेवताना दहावेळा विचार केला पाहिजे, असा इशारा कोंडी ग्रामस्थांनी दिला आहे.

“10 टक्के आरक्षणाची मागणी मराठा समाजाची नव्हती. आम्हाला 50 टक्के ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवं आहे. पण शासनाने दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकणार नाही हे आम्हाला आणि सरकारलाही माहिती आहे. त्यामुळे याचे आम्हाला काही आश्चर्य नाही. त्यामुळे या निर्णयाचा आम्हाला कुठलाही आनंद झाला नाही. निवडणुकीच्या पूर्वी आमच्या तोंडासमोर हे गाजर धरलं. या भुलथापांना, खोट्या आश्वासनांना मराठा समाज बळी पडणार नाही. आमची एकच मागणी आहे की ओबीसी प्रवर्गातून आम्हाला आरक्षण हवं आहे,” असे मराठा समाजाने म्हटलं आहे.

हेही वाचा :  ...तर विमानतळावर 300 प्रवाशी जागीच झाले असते ठार; अनर्थ थोडक्यात टळला!

काय घेतली शपथ?

” जो पर्यंत मराठा समाजाला आतून विरोध करणारे, मराठा समाजाचा द्वेष करणारे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते जोपर्यंत भाजपमध्ये आहेत तो पर्यंत या पक्षाच्या उमेदवाराला अथवा यांच्या पक्षाशी युती करणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला आम्ही मतदान करणार नाही,” अशी शपथ मराठा समाजाच्या लोकांनी घेतली.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …