… तर वाचले असते शेकडो लोकांचे प्राण, रेल्वे दुर्घटनेनंतर ‘कवच’बाबत समोर आली मोठी अपडेट

Odisha Train Accident: ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. (Bahanaga train accident) रेल्वे अपघातात (Train Accident) आत्तापर्यंत शेकडो नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. तर, ९००हून अधिक प्रवासी जखमी आहेत. रेल्वे अपघातानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. ज्या ठिकाणी रेल्वे अपघात घडला तेथील रुळांवर रेल्वेची ‘कवच’ यंत्रणा बसवलेली नव्हती. जर ही यंत्रणा असती तर ही दुर्घटना टळली असती. अशातच रेल्वेची ‘कवच’ यंत्रणा यावेळी उपस्थित का नव्हती?, असा सवाल करण्यात येत आहे. रेल्वेची ‘कवच यंत्रणा’ म्हणजे काय? याची चर्चा होत आहे. (Odisha Train Accident News)

अपघात कसा घडला?

ओडिशातील बहानागा स्टेशनजवळ हा अपघात झाला आहे. दोन एक्स्प्रेस गाड्या आणि एक मालगाडी एकमेकांना धडकल्याने हा भीषण अपघात घडला आहे. कोलकात्याहून चेन्नईकडे जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस, यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडी अशा तिन गाड्यां एकमेकांना धडकल्या. दरम्यान, या अपघातानंतर भारतीय रेल्वेचे प्रवक्ता अमिताभ शर्मा यांनी अपघातग्रस्त झालेल्या मार्गावर कवच यंत्रणा (Kavach System) उपलब्ध नव्हती, अशी धक्कादायक माहिती दिली आहे. 

हेही वाचा :  Train Accident मध्ये 40 जणांचा मृत्यूनंतर रेल्वे मंत्र्यांना सुनावलेली मृत्यूदंडाची शिक्षा

कवच यंत्रणा म्हणजे काय?

चालक किंवा इतर कोणत्याही कारणांमुळं होणारे रेल्वे अपघात रोखण्यासाठी भारतीय रेल्वेकडून मागील वर्षी एक डेमो दाखवण्यात आला होता. शून्य अपघाताचे लक्ष्य गाठण्यासाठी रेल्वेने ही यंत्रणा आणली आहे. कवच यंत्रणा म्हणजेच ऑटोमॅटक ट्रेम पोटेक्शन (ATP) हे तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. बालासोरमध्ये अपघात झालेल्या ट्रॅकवर हे सुरक्षा कवच उभारण्यात आलेले नव्हत, अशी माहिती समोर येत आहे. 

२०१२मध्ये रेल्वेने या प्रणालीवर काम करण्यास सुरुवात केली होती. आरडीएसओ (रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन)द्वारे विकसीत केलेली स्वयंचिलीत ट्रेन संरक्षण प्रणाली आहे. याची पहिली चाचणी २०१६मध्ये करण्यात आली होती. तर, लाइव्ह डेमोही रेल्वे मंत्र्यांनी मागील वर्षी दाखवला होता. 

कवच यंत्रणा कशी काम करते?

लोको पायलटने सिग्नल पार करताच कवच यंत्रणा सक्रीय होते. त्यानंतर यानंतर सिस्टम लोको पायलटला अलर्ट करते आणि नंतर ट्रेनच्या ब्रेकचा ताबा घेते. एकाच रुळावर दोन गाड्या येताच यंत्रणा दोन्ही गाड्या थांबवते. या दाव्यांनुसार जर एखाद्या ट्रेनने सिग्नल पार केला, तर पाच किमीच्या अंतरावर असलेल्या सर्व गाड्यांची वाहतूक थांबेल. सर्व मार्गांवर अद्याप ही ‘कवच’ यंत्रणा बसविण्यात आलेली नसून वेगवेगळ्या झोनमध्ये हळूहळू यावर काम करण्यात येत आहे. 

हेही वाचा :  रविवार विशेष : गुणवत्ता प्रश्नांकितच | Sunday Special Quality question test cricket players Proper treatment rules ysh 95



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ATM मधून फाटलेल्या नोटा निघाल्यात? घाबरू नका, ‘या’ पद्धतीने मिळवा कोऱ्या करकरीत नोटा

Damaged Note Exchange RBI Rule: एटीएममध्ये पैसे काढायला गेल्यानंतर अनेकदा त्यातून फाटलेले नोटा येतात. एटीएममधून …

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …