7 मार्च ठरणार महत्त्वाची! नार्वेकरांविरोधातील याचिका प्रकरणात सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाची ‘ती’ मागणी स्वीकारली

shivsena mla disqualification case: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये 7 मार्चची तारीख अत्यंत महत्त्वाची ठरण्याची शक्यात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणात दिलेल्या निकालाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या याचिकेवर 7 मार्च रोजी देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे.

नार्वेकरांनी काय निकाल दिला

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या काळात शिवसेनेमध्ये उभी फूट पडली त्यावेळी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेचा विषय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार या प्रकरणाचा न्यायनिवाडा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला. आपला निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील गटाला शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली. तसेच शिंदे गटात सहभागी झालेल्या आमदारांना पात्र ठरवण्यात आलं. पक्षांतरबंदी कायद्यानुसार हे आमदार अपात्र ठरवले जावेत अशी ठाकरे गटाची मागणी होती.

ती मागणी मान्य

विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर शुक्रवारी 1 मार्च रोजी ही याचिका सादर करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाच्या कामकाजात याचिकेचा समावेशच करण्यात आला नव्हता. ठाकरे गटाचे वकील तसेच ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी ही गोष्ट न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. या प्रकरणात लवकरात लवकर सुनावणी घेण्याची विनंती सिब्बल यांनी केली. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य केली असून आता या प्रकरणात नार्वेकरांनी दिलेल्या निकालासंदर्भातील याचिकेवर 7 मार्च रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे.

हेही वाचा :  मागून येऊन डोळ्यात मिर्ची पावडर टाकली..त्यानंतर चाकू काढून सपासप...धक्कादायक व्हिडीओ



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सॅम पित्रोदा यांचा अखेर राजीनामा, जयराम रमेश यांनी दिली माहिती, नेमकं प्रकरण काय?

Sam Pitroda Resigns : अखेर इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा …

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …