लाइफ स्टाइल

धक्कादायक! विद्यापीठात मृत्यू तांडव; अंदाधुंद गोळीबारात 15 जणांनी गमावला जीव

Prague Mass Shooting: चेक रिपब्लिकच्या चार्ल्स विद्यापीठात गुरुवारी रात्री गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अंदाधुंद गोळीबारात तब्बल 15 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय 20 हून अधिक लोकं या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. यापैकी 13 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचाही मृत्यू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमध्ये गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. प्रागमधील …

Read More »

VIDEO: आकाशात भगव्या रंगाची उधळण; इतिहासाची साक्ष देणाऱ्या प्रतापगडावर सुर्योदय होताना…

Pratapgad Sunrise Video: राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा..  महाराष्ट्राचे अगदी तंतोतत वर्णन केलेली गोविंदाग्रजांची ही कविता प्रत्यक्षातही खरी उतरत असते. महाराष्ट्रावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे. राज्यातील तलाव, समुद्र, जंगल समृद्ध आहेत. पण महाराष्ट्राची आणखी एक ओळख तो म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणारा सह्याद्री. कणखरपणे उभा असलेला सह्याद्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराजाची साक्ष देत असतो. महाराष्ट्रात …

Read More »

दिलखेच अदा, कमनीय बांधा… देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी ही गायिका कोण?

Economy : देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो. विविध स्तरांवर, विविध प्रमाणात देशातील प्रत्येक लहानमोठा घटक या गोष्टींवर सातत्यानं परिणाम करत असतो. पण, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्यांमध्ये एका गायिकेला बरंच श्रेय दिलं जात आहे. ही गायिका कोण आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करण्यासारखं तिनं नेमकं काय केलंय माहितीये?  ही गायिका आहे अमेरिकन पॉप सिंगर टेलर स्विफ्ट (Taylor Swift). …

Read More »

ब्लास्ट प्रूफ दारं, बंकर, किल्ल्यासारखी सुरक्षा अन्.. 1400 एकरांच्या ‘या’ स्वर्गात Zuckerberg बांधतोय सिक्रेट घर

FB Founder Mark Zuckerberg Kauai Home: ब्लास्ट प्रूफ दरवाजे, जमीनीखाली असलेले मोठे बंकर्स अन् एखाद्या किल्ल्याला असावी अशी सुरक्षा… या साऱ्या गोष्टी वाचून तुम्हाला एखाद्या जेम्स बॉण्ड चित्रपटातील घराची आठवण झाली असेल. मात्र हे असलं घर जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक असलेला फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग बांधतोय असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल ना? पण हे खरं आहे. 39 वर्षीय झुकरबर्ग …

Read More »

सहज खरेदी केलेल्या भूखंडावर ‘या’ माणसानं स्वत:च बनवला विचित्र नावाचा एक नवा देश; जाणून घ्या त्यामागचं सत्य

Republic of Slowjamastan: जगाच्या पाठीवर अशा कैक व्यक्ती आहेत ज्यांनी या न त्या कारणानं अनेकांच्या नजरा वळवल्या आहेत, बऱ्याचजणांना आश्चर्याचा धक्काही दिला आहे. असाच एक माणूस सध्या भल्याभल्यांसाठी एक कमाल व्यक्ती ठरत आहे. कारण, या माणसानं स्वत:चाच एक देश तयार केला आहे….. झालात ना तुम्हीही थक्क? बसला ना धक्का?  सॅन डिएगोमधील एक डीजे आणि ब्रॉडकास्टर रँडी ‘आर डब’ विलियम्स यानं …

Read More »

मोठी बातमी! अखेर पेन्शनधारकांना दिलासा; आता केंद्र सरकारप्रमाणं मिळणार मोबदला

Pension Scheme News : पेन्शनच्या मुद्द्यावरून अनेक मतमतांतरं गेल्या काही दिवसांमध्ये समोर आली. जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत कर्मचाऱ्यांनी संपाची हाकही दिली. ज्यानंतर आता राज्य शासनानंही यासंदर्भातील हालचाली सुरु केल्याचं चित्र आहे. परिणामी लाखो पेन्शनधारकांमधून बऱ्याचजणांना सरकारच्या निर्णयामुळं फायदा होणार आहे. आयाता यामध्ये नेमका कोणाचा समावेश आहे, हेसुद्धा पाहून घ्या.  येत्या काळात महाराष्ट्र राज्य सरकार 80 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या …

Read More »

कफनचोर आणि खिचडीचोर, कोरोना काळात भ्रष्टाचार… मुख्यमंत्र्यांचा ठाकरे पिता-पुत्रांवर आरोप

Maharashtra Politics : नागपूर अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी (CM Eknath Shinde) पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) लक्ष्य केलं. कोरोना काळात मुंबईत मोठा भ्रष्टाचारा केल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच टेंडर घोटाळ्यांना (Tender Scam) पेंग्विनपासून सुरूवात झाल्याचा दावा त्यांनी विधानसभेत केला.  भीतीच्या वातावरणात लोक जगच असताना पैसे लुटण्याचा प्रकार सुरु होता. कफनचोर, खिचडी …

Read More »

कुत्र्याने कोंबड्या खाल्ल्याचा राग शेजाऱ्यांवर काढला; तिघांची गाडीने चिरडून हत्या

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावतीमध्ये मंगळवारी एका भरधाव कारने तिघांची चिरडून हत्या केल्याची घटना समोर आली होती. एकाच कुटुंबातील तिघांची शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने गाडीने चिरडून हत्या केल्याचे म्हटलं जात होतं. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक देखील केली होती. मात्र आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. पूर्ववैमन्यसातून एका वृद्ध जोडप्याची आणि त्यांच्या सुनेची आरोपीने मिनीव्हॅनद्वारे हत्या केल्याची माहिती …

Read More »

फेसबुकवर मैत्री करुन पोलीस कर्मचाऱ्याचा विवाहितेवर अत्याचार; बलात्काराचा गुन्हा दाखल होताच आरोपी फरार

जयेश जागड, झी मीडिया, अकोला : अकोल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करम्यात आला आहे. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपी पोलीस कर्मचारी सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे. फेसबुकवर मैत्री करून एका विवाहित महिलेवर अतिप्रसंग केल्याची घटना अकोला जिल्ह्यातील अकोट येथे घडली आहे. फेसबुकवर मैत्री …

Read More »

संघाच्या अनिवार्य असलेल्या कार्यक्रमाकडे अजित पवारांची पाठ; मुख्यमंत्र्यांनी जाऊन घेतलं स्मृतीस्थळाचे दर्शन

Maharashtra Politics : भाजपाने सोमवारी आपले सहकारी पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि त्यांच्या आमदारांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक एम.एस. गोळवलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नागपूरच्या रेशमबागेत निमंत्रित केले होते. यासाठी आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटातील आमदारांना पत्राद्वारे आमंत्रित केले होते. सर्व मंत्री, आमदार आणि आमदारांची …

Read More »

पत्नीच्या चारित्र्यावर संशय; जावयानं पत्नी, सासरा अन् दोन मेहुण्यांना संपवलं

श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : यवतमाळमध्ये (Yavatmal Crime) एकाच कुटुंबातील चौघांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. यवतमाळमध्ये एका जावायाने कुटुंबातील चौघांची हत्या केली आहे. सासरा, दोन मेव्हणे आणि पत्नीची जावयाने निर्घृणपणे हत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी जावयाला अटक केली आहे. पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरुन हा हत्याकांडाचा थरार घडल्याचे म्हटलं जात आहे. पोलीस (Yavatmal Police) …

Read More »

‘महाराष्ट्रात शब्दांची अदला बदल झाली अन्…’; मराठा, धनगर आरक्षणप्रश्नी उदयनराजेंनी घेतली पंतप्रधानांची भेट

Maratha Reservation : राज्यातला मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. एकीकडे, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात केली आहे. अशातच भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आरक्षणावर लवकर तोडगा काढला जावा अशी …

Read More »

थकित कर्जवसुलीसाठी म्हाडाची शक्कल; मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गालगत बांधणार म्हाडाची घरं

Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg : एमएसआरडीसीकडील थकित कर्जवसुलीसाठी म्हाडाने शक्कल लढवली आहे. एमएसआरडीसीच्या अंतर्गत येणाऱ्या  मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गालगतच्याजमीनीवर म्हाडा घर बांधणार आहे. यामुळे येत्या काही वर्षात  मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गालगत म्हाडाच्या वसाहती दिसू शकतात. यामुळे महाराष्ट्रात नविन घरांची निर्मीती होणार आहे.  मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गालगत म्हाडाची घरं निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हाडाने एमएसआरडीसीकडून एक हजार कोटी …

Read More »

शनिशिंगणापूर देवस्थानातील घोटाळ्याची चौकशी होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Shani Shingnapur : शनिशिंगणापूर देवस्थानातील घोटाळ्याची चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केलीय. तसंच शिर्डी आणि पंढरपूरप्रमाणे कायदा लागू करण्याचीही ग्वाही त्यांनी दिली. शनिशिंगणापूर तिर्थ क्षेत्रात विश्वस्तांमार्फत मोठा भ्रष्ट्राचार झाला असून कर्मचारी भरतीतही गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला.   शनिशिंगणापूर देवस्थानातील घोटाळ्यावरून परिषदेत गोंधळ झाला.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.  श्री …

Read More »

मासिक पाळीच्या वेदना रोखण्यासाठी तरुणीने केलेली एक चूक जीवावर बेतली; तुम्ही ही चूक करु नका

युकेमधील एका 16 वर्षीय मुलीच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. गर्भनिरोधक गोळ्या खाल्ल्यानंतर तीन आठवड्यांनी रक्ताच्या गुठळ्या आणि पोटात जंतू निर्माण झाल्याने तिला आपला जीव गमवावा लागल्याचं वृत्त ‘द टेलिग्राफ’ने दिलं आहे. लायला खान असं या 16 वर्षीय मुलीचं नाव होतं.  लायला खानला मासिक पाळीदरम्यान प्रचंड वेदना होत होत्या. यादरम्यान तिला तिच्या मैत्रिणींनी लक्षणं कमी करण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या खाण्याचा सल्ला दिला. …

Read More »

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारचा मास्टर प्लान! जरांगे यांचा विरोध

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने मास्टर प्लान तयार केला आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मुंबईत हे विशेष अधिवेशन घेण्यासंदर्भात सरकारच्या हालचाली सुरु असल्याचं कळतंय. मात्र, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांंचा याला विरोध आहे.  विशेष अधिवेशन घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही आपली भूमिका मांडणार असल्याची माहिती आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल …

Read More »

‘तुमच्याविरोधात ठोस पुरावे…’, हनुमान चालिसा पठण प्रकरणी राणा दांपत्याला मोठा धक्का! कोर्टाने याचिका फेटाळली

हनुमान चालिसा पठण प्रकरणी रवी राणा आणि नवनीत राणा यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे. कोर्टाने दोघांविरोधात पुरावे तसंच साक्षीदार असल्याचं सांगत याचिका फेटाळून लावली आहे. राणा दांपत्याने याप्रकरणी दोषमुक्त करण्याची मागणी केली होती. आज यावर न्यायालय निर्णय देणार होतं. पण आज कोर्टाने दोघांविरोधात ठोस पुरावे आहेत सांगत याचिका फेटाळून लावली. आता 5 जानेवारीला …

Read More »

मुंबई- ठाणे जोडणाऱ्या मेट्रो मार्गावरील 2 स्थानके वगळली; आता असा असेल मार्ग

Mumbai Metro 4 station: वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या मेट्रोमुळं ठाण्यातील प्रवाशांना थेट मुंबईत येणार आहे. तसंच, हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही दक्षिण मुंबईत येण्याचा पर्याय उपलब्ध होईल. मात्र, या प्रकल्पात थोडे बदल करण्यात आले आहेत. जागेचा अडसर आणि प्रकल्पाचा वाढता खर्च यामुळं मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने दोन स्थानके वगळण्याचा निर्णय घेतला आहे. मेट्रो 4 मार्गावरील सुमननगर …

Read More »

साऊथ कोरियाच्या तरुणीचा पुण्यात विनयभंग, व्हिडिओ करत असताना तो आला अन्…

South Korean Vlogger Harassed: साउथ कोरियाची युट्यूबर तरुणी पुण्याच्या रस्त्यावर व्हिडिओ बनवत असतानाच तिच्यासोबत एक घृणास्पद प्रकार घडला आहे. एका अज्ञात तरुणाने तिच्यासोबत गैरवर्तन केलं आहे. या घटनेनंतर तरुणीने तिथून पळ काढला. हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. मात्र, नेमकी ही घटना कुठे घडली आहे याबाबत काहीच माहिती समोर आलेली नाहीये.  कैली नावाच्या कोरियन तरुणीने तिच्या युट्यूब चॅनेलवर एक …

Read More »

‘स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी….’ 141 खासदारांच्या निलंबनावर शरद पवार संतापले, ‘असं असेल तर शिक्षेला तयार’

संसदेतील सुरक्षाभंग प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवेदनाशिवाय कामकाज चालू न देण्याचा इशारा ‘इंडिया आघाडी’ने दिला आहे. यावरुन दोन्ही सभागृहांमध्ये सुरु असलेल्या गदारोळामुळे खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. आज एकूण 49 खासदारांचं निलंबन करण्यात आलं असून यामध्ये सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे. यासह निलंबित खासदारांची संख्या 141 वर पोहोचली आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संतापले आहेत. ‘झी …

Read More »