ताज्या

सगेसोयऱ्यांचा कायदा पारित झाला नाही तर… जरांगेचा सरकारला अखेरचा इशारा

Maratha Reservation: उद्या 20 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलंय. दरम्यान उद्या प्रश्न निकाली नाही निघाला तर 21 फेब्रुवारी रोजी आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले. मनोज जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 10वा दिवस आहे. जरांगे-पाटलांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झालीय. त्यांना दररोज सलाईन लावण्यात येतंय. राज्य सरकारला विशेष …

Read More »

शिवजयंतीसाठी रायगडावर आलेले दोन तरुण हिरकणी कड्यावर अडकले; डोंगरउतार पाहून काळजात धस्स होईल!

Raigad News: स्वराज्य संस्थापक आणि महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवभक्त राज्यातील विविध गडांना भेट देतात. शिवजयंतीनिमित्त आज अनेक शिवप्रेमी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर पोहोचले आहेत. मात्र, रायगडावर एक दुर्घटना घडली आहे. रायगडाच्या हिरकणी कड्यावर दोन तरुण अडकले आहेत.  शिवजयंती निमित्त आज लाखो शिवभक्त किल्ले रायगडावर आले आहे. रायगडावर छत्रपती …

Read More »

108 फूट उंच शिखर, 10 गर्भगृहे अन्… पंतप्रधानांनी केली भगवान विष्णुच्या 1Oव्या अवताराच्या मंदिराची पायाभरणी

Kalki Dham : उत्तर प्रदेशातील संबल जिल्ह्यात भगवान विष्णूचा 10वा अवतार असलेल्या कल्कीचे मंदिर बांधले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या मंदिराची पायाभरणी करणार आहेत. या मंदिराचे पीठाधीश्वर आचार्य प्रमोद कृष्णम आहेत, ज्यांची नुकतीच पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. हे मंदिर श्री कल्की धाम निर्माण ट्रस्टद्वारे बांधले जात आहे. अध्यक्ष आचार्य प्रमोद कृष्णम यांनी 1 फेब्रुवारी …

Read More »

विकृतीचा कळस! स्तन आणि डोळे… अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन निर्घृण हत्या

West Bengal Rape Case: पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद परिसरातून एक संतापजनक घटना समोर येत आहे. 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत नराधमानी विकृतीचा कळस गाठला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. इतकंच नव्हे तर तिचे स्तन कापले, डोळे काढून फेकून दिले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे.  13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. …

Read More »

Loksabha Election: ठाकरे गट लोकसभेच्या 18 जागा लढवणार? ‘मुंबईत 6 पैकी ‘या’ 4 जागा…’

Loksabha Election: लोकसभा निवडणूक जवळ येत चालली आहे. राज्यातील प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. शिवसेना, राष्ट्रवादीत फूट झाल्यानंतर ही पहिली मोठी निवडणूक असेल. यातून मतदारांचा कल कळणार असल्याने या निवडणुकीकडे साऱ्या देशाचे लक्ष आहे. महाराष्ट्रात ठाकरे गटाकडून 18 लोकसभा जागा लढण्याचे जवळपास निश्चित असल्याचे म्हटले जात आहे. लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) …

Read More »

‘पोलीस माझे व्हिडिओ स्वतःच्या बायकोला दाखवतील’; नितेश राणेंच्या वक्तव्याने भडकली काँग्रेस

BJP MLA Nitesh Rane : काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाही. आपला बॉस सागर बंगल्यावर  बसला आहे, असे चिथावणीखोर विधान केलं होतं. त्यानंतर आता नितेश राणेंनी पुन्हा एकदा पोलिसांसंदर्भात वादग्रस्त विधान केलंय. हे पोलीस माझं काही बिघडवू शकत नाही, असं नितेश राणेंनी म्हटलंय. माझे कितीही व्हिडिओ काढले तरी पोलीस ते व्हिडीओ फक्त …

Read More »

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Price on 19 February 2024 : जागतिक बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून कच्चा तेलाच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. त्यात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे आज (19 फेब्रुवारी 2024) ही आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे इंधनाचा दर वाढला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत पुन्हा एकदा $83 च्या आसपास पोहोचली आहे. दररोज सकाळी सरकारी …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार दिलीप भुजबळ यांना प्रदान

Chhatrapati Shivaji Maharaj Award: किल्ले शिवनेरीवर आज शासकीय शिवजयंती साजरी होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यासाठी किल्ले शिवनेरीवर दाखल झाले आहेत. पाळना गीत गात शिवजन्मोत्सव सोहळा सुरू झाला. राज्याचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सहकार मंत्र्याच्या उपस्थित सोहळा संपन्नझाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला. पोलिस महासंचालक डॉ. दिलीप भुजबळ यांना छत्रपती शिवाजी …

Read More »

‘आम्ही टॉपर घडवतो..’ खासगी क्लासच्या खोट्या जाहिरातीतून तुमचीही झालीय फसवणूक? ‘येथे’ नोंदवा तक्रार

Private Classes Falsely Advertise: आम्ही टॉपर घडवतो, देशातील टॉपर हा आमचाच विद्यार्थी, आमच्याकडील विद्यार्थ्यांना मिळतात पैकीच्या पैकी गुण, अशा जाहिरातींचे फलक तुम्ही पाहिले असतील. अशा जाहिरातींना भुलून विद्यार्थी खासगी शिकवणीला प्रवेश घेतात. यानंतर प्रत्यक्षात तशा प्रकारचे शिक्षणच दिले जात नसल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात येते. पण तोपर्यंत क्लासेलवाल्यांनी वर्षाची फीस घेतलेली असते. आपली फसवणूक झाल्याचे कळायला विद्यार्थी आणि पालकांना उशीर झालेला असतो. …

Read More »

Shivaji Maharaj JayantiCh : शिवजयंतीची तारीख आणि तिथी.. नेमका वाद काय? दोनवेळा का साजरी होते?

हिंदवी स्वराज्याचे सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसार 19 फेब्रुवारी 2024 रोजी 394 वी जयंती आहे. देशभरात रयतेच्या राजाचा जन्मदिवस अतिशय मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. शिवप्रेमी आपल्या राजाच्या जयंतीची आतुरतेने वाट पाहत असतात.महाराजाचं या दिवशी गुणगाण गायलं जातं. महाराजांनी शिकवलेली शिकवण लक्षात ठेवली जाते. असं असताना महाराजांची शिवजंयती वर्षातून दोनदा का साजरी केली जाते? दोन वेळा कधी? छत्रपती शिवाजी …

Read More »

‘हत्या कर नाहीतर मी…’ बायकोच्या धमकीनंतर पतीने अंडा रोलमध्ये विष टाकून प्रेयसीला संपवलं

ExtraMarital Affair Murdered: अनैतिक संबंधाचा शेवट वाईट झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जेथे पत्नीने पतीला धमकी देत त्याच्या प्रेयसीचे आयुष्य संपवायला सांगितले. यावर मागचा-पुढचा विचार न करता पतीने आपल्या प्रेयसीला विष देऊन मारल्याचा प्रकार समोर आलाय. या विचित्र प्रकारामुळे परिसराक खळबळ माजली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. समस्तीपूर जिल्ह्यात 3 फेब्रुवारीला एका …

Read More »

Weather Updates : उन्हाच्या झळा वाढणार, अवकाळी तरीही पाठ नाही सोडणार; कसं असेल आजचं हवामान?

Maharashtra Weather Updates : राज्यात सध्या कोरडं हवामान पाहायला मिळत आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये आकाश निरभ्र असल्यामुळं राज्यातील कमाल तापमानातही वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढच्या 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये वातावरण कोरडं असेल. तर, काही भागांमध्ये आकाश निरभ्र राहील. कमाल तापमान सर्वसामान्याहून जास्तच असेल.  थोडक्यात महाराष्ट्रात उन्हाळा सुरु झाला असून, दर दिवसागणिक तापमानात सातत्यानं वाढ होताना दिसत …

Read More »

Sallekhana Vidhi : सल्लेखानाची प्रथा असते तरी काय? जैन समाजात का आहे महत्त्व?

Vidyasagar Maharaj passed away : जैन धर्मातील दिगंबर पंथियांचे संत आचार्य विद्यासागर महाराज (Acharya Vidyasagar Maharaj) यांचं निर्वाण झालं आहे. छत्तीसगड येथील डोंगरगड या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी रात्री 2 वाजून 35 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या समाधीमरणाने संपूर्ण जैन समाजासह त्यांचा भक्तगण शोकसागरात बुडाल्याचं पहायला मिळतंय. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील आचार्य विद्यासागर …

Read More »

महाराष्ट्रातील 500 वर्ष जुना समुद्री किल्ला; अभेद्य आणि अंजिक्य, महाराजांनाही जिंकता आला नाही

Murud Janjira Fort  : अथांग समुद्र आणि समुद्राच्या मध्यभागी भक्कमपणे दिमाखता उभा असलेला अभेद्य किल्ला पाहताक्षणीच अंगावर रोमांच उभा राहतो. रायगड जिल्ह्यातील मुरूड जंजीरा किल्ला हा महाराष्ट्रातील 500 वर्ष जुना समुद्री किल्ला आहे.  छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी हा किल्ला जिंकण्यासाठी अथक प्रयत्न करूनही आजवर कुणालाही हा किल्ला जिंकने त्यांना शक्य झाले नाही.  मुरूड जंजीरा किल्ला हा …

Read More »

सत्ता उपभोगण्यासाठी तिसऱ्यांदा जिंकायचे नाही, अजून खूप निर्णय बाकी – पंतप्रधान मोदी

PM Narendra Modi : रविवारी भारत मंडपम येथे झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाला पंतप्रधान मोदींनी संबोधित केले. जैन ऋषी विद्यासागर यांना श्रद्धांजली अर्पण करून पंतप्रधान मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली. भाजपाला तिसऱ्यांदा सत्तेत यायचं आहे, असे यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले. भाजप कार्यकर्त्यांच्या निष्ठा आणि समर्पणामुळे आम्हाला जनतेचे पूर्ण आशीर्वाद मिळत आहेत, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. ‘भाजपचे कार्यकर्ते वर्षातील प्रत्येक …

Read More »

अंत्यविधीआधी शंका आली अन् पोलिसांनी घरी नेला मृतदेह; शवविच्छेदनातून समोर आलं सत्य

Yavatmal Crime : यवतमाळमध्ये अंत्ययात्रा थांबवून पोलिसांनी मृत महिलेचे शवविच्छेदन केल्याची घटना समोर आली आहे. यवतमाळच्या जामनकरनगरमध्ये विवाहितेचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यामुळे अंत्यविधीसाठी तिची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. मात्र पोलिसांना विवाहितेच्या मृत्यूची तक्रार मिळताच चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. पतीनेच कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या केल्याचे तपासातून समोर आलं आहे. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर यवतमाळमध्ये खळबळ उडाली आहे. …

Read More »

‘सारखी रिल्स बघू नको’ पती ओरडल्याचा आला राग…दरवाजा बंद करुन बायकोने उचलंल टोकाचं पाऊल

Wife Sucide: नवरा बायकोमधील नेहमीच भांडण ही तशी साधारण गोष्ट वाटते. पण या भांडणाला दोघातला कोणी कसं, कधी गांभीर्याने घेईल? हे सांगता येत नाही. हल्ली मोबाईल, सोशल मीडियामुळे जग जवळ आलंय. पण हेच एका महिलेच्या आत्महत्येचं निमित्त ठरलंय. काय घडलाय हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.  छत्तीसगडमधील भिलाई येथे एका महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. रचना साहू असे आत्महत्या केलेल्या पत्नीचे …

Read More »

कामासाठी मुलांना आजीकडे सोडलं अन्…; बहिण भावाचा आगीत होरपळून मृत्यू

प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : धुळ्यातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. झोपडीला लागलेल्या आगीत होरपळून दोन भावंडांचा जागीच मृत्यू झाला आहे. धुळ्यातील लोणखेडी येथे झोपडीला आग लागून आजोळी आलेल्या नाशिक येथील दोघा बालकांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनं धुळ्यात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत दोन्ही भावंडांचा …

Read More »

‘साहेबांची उणीव नेहमीच…’ विलासरावांबद्दल बोलताना रितेश देशमुखला अश्रू अनावर

Ritesh Deshmukh Emotional: विलासराव आणि दिलीपरावांनी एकमेकांना जपलं. आपल्या भावाला आपण काय देऊ शकतो, ही भावना एकमेकांनी कायम ठेवली. साहेबांना जाऊन जवळपास 12 वर्षे झाली, असे रितेश सांगत असतानाच भावूक झाला. त्यांची उणीव नेहमीच भासते हे सांगताना त्याला हुंदका आला. पण त्याने स्वत:ला सावरुन भाषण सुरु ठेवले.  साखर कारखान्यात विलासरावांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. दिग्गज कॉंग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत अनावरणाचा सोहळा …

Read More »

अमित ठाकरेंवर मारहाणीचा आरोप करणाऱ्या महेश जाधवांनी घेतला मोठा निर्णय

Mahesh Jadhav: गेल्या महिन्यात मनसे नेते पदावरुन हटवण्यात आलेले माथाडी कामगार नेते महेश जाधव यांनी वेगळी वाट धरली आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्याशी फोनवरून वाजल्यानंतर त्यांनी आपला मनसेतील पदाचा राजीनामा दिला होता. महेश जाधव आणि अमित ठाकरे यांच्या संभाषणाची ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यानंतर कामगाराची बाजू लावून धरल्याने मला मारहाण केल्याचा आरोप जाधव यांनी मनसे नेत्यांवर केला …

Read More »