सौरभ गुर्जर हा बॉलिवूडचा नवा खलनायक म्हणून समोर येत आहे. ब्रह्मास्त्रमध्येसुद्धा तो त्याच व्यक्तिरेखेत दिसून आला आहे.आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 14 वर्षांपूर्वी सौरभ मुंबईमध्ये आला होता. त्याच्या पिळदार शरीरामुळे सौरभला रिअॅलिटी शो आणि टीव्ही मालिकांमध्ये भूमिका मिळाल्या. यादरम्यान सौरभला 2017 मध्ये ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात भूमिकेची ऑफर मिळाली होती. या चित्रपटाला पूर्ण होण्यासाठी सुमारे पाच वर्षांचा कालावधी लागला आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सौरभ WWE चा रेसलर बनला आहे. तो सध्या USA मध्ये WWE मध्ये खेळत आहे.चित्रपट रिलीज झाल्यानंतर सौरभ प्रचंड चर्चेत आला आहे.
सौरभ गुर्जर हा ग्वाल्हेर जिल्ह्यातील डबरा येथील एक रेसलर आहे. सौरभ ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. 37 वर्षीय सौरभचं शालेय शिक्षण डबरा येथे झालं आहे. ग्वाल्हेरच्या जिवाजी विद्यापीठातून त्यानं महाविद्यालयीन शिक्षणघेतलं आहे. महाविद्यालयीनकाळात सौरभ किक बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय चॅम्पियन होता. तो लहानपणापासून WWE रेसलिंगचा चाहता होता. त्याला स्वतः रेसलर बनायचं होतं. म्हणून काहींच्या सल्ल्यावरुन सौरभ मुंबईत आला होता.मुंबईत आल्यानंतर त्याने WWE साठी आपली शरीरयष्टी बनवायला सुरुवात केली. सौरभची दमदार शरीरयष्टी पाहून रिअॅलिटी शोमध्ये त्याची निवड झाली होती.
(हे वाचा:Brahmastra Review: 9 वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर बनलाय ‘ब्रह्मास्त्र’; समोर आला सिनेमाचा फर्स्ट रिव्ह्यू )
सौरभच्या कामाबाबत सांगायचं तर, 2013-14 मध्ये सौरभने महाभारतात भीमची भूमिका साकारली होती. तर 2016-17 मध्ये सौरभने संकटमोचन महाबली हनुमानमध्ये रावणाची भूमिका साकारली आहे. WWE मध्ये निवड झाल्यानंतर, सौरभला सुपरहिरोवर आधारित भारतातील सर्वात मोठा चित्रपट ब्रह्मास्त्रमध्ये मुख्य खलनायकाची भूमिका मिळाली होती. सध्या हा अभिनेता अमेरिकेत बॉक्सिंग रिंगमध्ये आपला कमाल दाखवत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या