आत्महत्या करण्याआधी कसे वागतात लोक? वेळीच सावध होऊन वाचवू शकता एक जीव

World Suicide Prevention Day 2022 : आत्महत्या ही जगाला भेडसावणारी समस्या आहे. माणसाचे मन कधी इतके निराशेने भरलेले असते की तो आत्महत्या करायला भाग पाडतो हे सांगता येत नाही. परंतु, जर लक्ष दिले गेले तर तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला आत्महत्येसारखे गंभीर पाऊल उचलण्यापासून रोखू शकता.

10 सप्टेंबर रोजी ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन’ साजरा केला जातो. एखादी व्यक्ती टोकाचे पाऊल उचलू शकते याची चिन्हे जाणून घेऊया. आत्महत्येचा विचार करण्यापूर्वी ती व्यक्ती कशी वागते हे समजून घेणे देखील तितकंच महत्वाचं असतं. या लक्षणांची माहिती प्रत्येकाने करून घेणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही एखाद्याचा जीव वाचवू शकता. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​धोकादायक वागणे

ज्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येची भावना येते ते अतिशय धोकादायक असतं. स्वत:ला हानी पोहोचवणारा विचार किंवा तशी वर्तणूक करताना ती व्यक्ती दिसते. उदाहरणार्थ बेपर्वाईने वाहन चालवणे किंवा अल्कोहोल आणि ड्रग्सचे अति सेवन करणे. अशावेळी तुम्हाला एखादी व्यक्तीमध्ये अशी लक्षणे दिसली तर तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा.

(वाचा – Diabetes Myths: डायबिटीज कधीच बरा होत नाही असं तुम्हाला पण वाटतं? तर 5 मधुमेहासंबंधातील गैरसमज जाणून घ्या)

​मूड स्विंग्स

बऱ्याच काळापासून वारंवार मूड स्विंग होत असलेले लोक स्वतःचे नुकसान करण्याच्या मार्गावर असतात. विविध भावनांना तोंड देण्यास ते असमर्थ आहेत. भावनांना सामोरे जाण्याची ही असमर्थता नैराश्याला कारणीभूत ठरू शकते. ज्यामुळे टोकाचे पाऊल उचलले जाऊ शकते. मूड स्विंग्सकडे दुर्लक्ष अजिबात करू नका.

(वाचा – मोबाइल बाजूला घेऊन झोपताय; ‘सायलेंट किलर’ ठरतील या गोष्टी.. शरीरातील एक एक अवयव होईल निकामी)

​अत्यंत दुःखाची परिस्थिती अनुभवणे

अत्यंत निराशेच्या परिस्थितीचा सामना करणारे लोक आत्महत्येस प्रवृत्त होतात. यामध्ये घटस्फोट किंवा ब्रेकअप जवळच्या तसेच व्यक्तींचा मृत्यू यांचा समावेश होतो. अशा निर्णायक बिंदूंवर त्यांचे समर्थन करणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे या व्यक्तींशी संवाद साधणे गरजेचे आहे.

(वाचा – लोखंडी कढईत जेवण न बनवण्याचा का दिला जातो सल्ला? जाणून घ्या या मागचं वैज्ञानिक कारण)

​कोणताही सामाजिक संबंध नाही

व्यक्ती आपल्या मित्रांना किंवा सामाजिक वर्तुळाला बऱ्याच काळापासून टाळत आहे ती काही खरोखर कठीण प्रसंगांना सामोरे जात आहे. तो किंवा ती दाखवू शकणार नाही पण त्यांना मदतीची नितांत गरज असते. अशावेळी त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे असते. एकेकाळी त्यांना आनंद देणार्‍या व्यक्तींमधून किंवा गोष्टींमधून किंवा छंदांमध्येही ते रस गमावू लागतात.

(वाचा – रात्री दोनपेक्षा अधिक वेळा लघवीला जावं लागतं? असू शकतात हे 7 गंभीर आजार, याप्रकारे करा स्वतःचा बचाव)

​अचानक शांत वर्तन

नैराश्याच्या कालावधीनंतर, लोक अचानक अतिशय शांत वर्तन दर्शवतात. ते त्यांच्यासोबत सर्व काही ठीक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यांना त्यांच्या परिस्थितीबद्दल बोलणे हतबल वाटते. त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्याची त्यांना आतुरतेने इच्छा आहे.

(वाचा – Queen Elizabeth II यांच इतकी वर्ष जगण्याचं रहस्य आलं समोर, ‘या’ सवयी ठरल्या सुदृढ आरोग्यासाठी फायदेशीर))

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Next T20 World Cup आधी दिग्गज क्रिकेटपटूनं तडकाफडकी घेतला संन्यास

Check Also

आरोग्य विभागाची चिंता वाढली; 1.45 कोटी बालकांचा Corona ची लागण

वॉशिंग्टन : अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (AAP) आणि चिल्ड्रन्स हॉस्पिटल असोसिएशनच्या ताज्या अहवालानुसार, जगातील सर्वात …

Immortal Gene Research: आता मृत्यूला हरवणं शक्य ! ‘अमर’ होणार माणूस, शास्त्रज्ञांनी केला मोठा दावा

Immortal Jellyfish: आता मृत्यूवर मात शक्य आहे. तसा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. (  Immortal Gene …