इम्रानच्या ‘ग्राउंड झीरो’त मराठी स्टार अभिनेत्रीची एण्ट्री
अनेकांना हा व्हिडिओ आवडला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत आहे. आलियाने स्वतः सांगितले की, तिला व्हिडिओ पाहून वाईट वाटलं नाही. उलट बघायला मजा आली. आता दिग्दर्शक अयान मुखर्जीने वारंवार शिवाचं नाव घेण्यामागचं कारण सांगितलं. सिनेमात ईशाला असं का दाखवण्यात आलं याचा खुलासा केला.
‘ब्रह्मास्त्र’ दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि शिवाची भूमिका साकारणाऱ्या रणबीर कपूरने ईशा झालेली आलिया सिनेमात त्याचं नाव वारंवार का घेते ते सांगितलं. खरं तर, अभिनेत्यानेच उघड केलं की सिनेमाच्या टीमचं ‘ब्रह्मास्त्र’ फीडबॅक चॅट ग्रुप आहे. तिथे प्रत्येकजण प्रतिक्रिया, मीम्स आणि टीका शेअर करत असतात. प्रत्येकजण त्याचा आनंद घेतो. अभिनेत्याच्या मते, तोदेखील त्या ग्रुपमध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा मनमोकळेपणाने आनंद घेतो.
तीन लग्नानंतरही एकटेच लकी अली, आयुष्यात सतत येत राहिलं वादळ
म्हणूनच ईशा शिवाला पुन्हा पुन्हा हाक मारते
‘एनडीटीव्ही’शी संवाद साधताना आलिया भट्टने त्या मिमिक्री व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली. तिची कॉपी करणारी मुलगी अगदी अचूक कॉपी करत आहे. आलिया म्हणते की चांदनी व्हिडिओ पाहून तिला खूप आनंद झाला कारण तिने हुबेहूब अभिनेत्रीचा आवाज काढला आहे. अयाननेही या संवादामागचं कारण सांगितले. लोक त्याची खिल्ली उडवत आहेत, असे तो म्हणाला. यावर बोलताना अयान म्हणाला की, ‘मला असं वाटतं की मी जेव्हा लोकांशी बोलतो तेव्हा मी त्यांची नावं अनेकदा घेतो. ही माझी सवय आहे. म्हणूनच ही गोष्ट स्क्रिप्टमध्ये राहिली आणि ही गोष्ट सिनेमातही दिसून आली.’
‘ब्रह्मास्त्र’च्या डायलॉगवर रणबीर कपूरची प्रतिक्रिया
रणबीर कपूर म्हणाला की, आम्ही प्रेक्षकांना सांगू इच्छितो की, आलिया आणि मी अयानला अनेकवेळा विचारलं की माझे नाव शिव आहे आणि तिचं नाव ईशा आहे, मग आम्हाला हे वारंवार सांगत रहावं लागेल का? पण अयान त्याच्या म्हणण्यावर ठाम होता. तो म्हणाले की, जेव्हा कोणी प्रेमात असते तेव्हा त्याचे नाव पुन्हा पुन्हा सांगायला आवडतं आणि मला वाटतं की त्याचा हा मुद्दा योग्य होता.
लग्नाचे फुकट व्हिडिओ टाकण्यापेक्षा…ओटीटी वेडिंगवर पहिल्यांदाच बोलली सोनाली कुलकर्णी
‘ब्रह्मास्त्र’मध्ये पाहायला मिळणार आणखी काही पराक्रम
रणबीर आणि आलियाने सांगितले की, खऱ्या आयुष्यात असे अजिबात नाही की दोघेही एकमेकांचे नाव वारंवार घेतात. कारण जेव्हा असे घडते तेव्हा त्यांना वाटते की आपण चूक केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ‘ब्रह्मास्त्र पार्ट वन-शिवा’ ९ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये रणबीर आणि आलियाशिवाय नागार्जुन, अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि शाहरुख खान यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. आता आणखी दोन भाग येतील, ज्यात पुढची कथा पाहायला मिळेल.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या