‘मिमी’च्या यशानंतर सई पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटाचं नाव ‘ग्राउंड झिरो’ असं आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला काश्मीरमध्ये सुरुवात झाली आहे. लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार असून आता सई ताम्हणकर त्याची साथ देणार आहे. या चित्रपटात इम्रान हाश्मी एका लष्कर अधिकारीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सई ताम्हणकर या चित्रपटात हाश्मी हाश्मीच्या पत्नीची भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे. हा चित्रपट म्हणजे एक मिलिटरी ड्रामा आहे.
इम्रान, सई आणि चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या काश्मीरमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस देवस्कर करत आहेत. सई आणि इम्रानच्या व्यतिरिक्त या चित्रपटात अभिनेत्री झोया हुसैनदेखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात सई आणि इम्रान रोमान्स करताना दिसणार आहेत. या फ्रेश जोडीबद्दल बोलताना, ई- टाइम्सच्या जवळच्या सूत्राने माहिती दिली की, “सई चित्रपटात इम्रानच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. दोन्ही स्टार्सची फ्रेश ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.” या चित्रपटाच्या टीमने नुकतेच श्रीनगरमधून त्यांचे चित्रीकरण संपवले असून आता पहलगाममध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.
हेही वाचा – The Kapil sharma show : ‘कपिल शर्मा शो’ मध्ये काम केल्यामुळे ‘या’ अभिनेत्याच्या मुलांना वाटायची लाज; अभिनेत्याचा मोठा खुलासा
सईच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं तर ती लवकरच मधुर भांडारकर यांच्या ‘इंडिया लॉकडाउन’ मध्ये दिसणार आहे. या व्यतिरिक्त सई मृणाल कुलकर्णींच्या ‘फक्त महिलांसाठी’ या चित्रपटात देखील झळकणार आहे.
इम्रानबद्दल सांगायचे तर, ‘ग्राउंड झिरो’ व्यतिरिक्त त्याच्याकडे सलमान खान आणि कतरिना कैफचा ‘टायगर ३’ देखील आहे. हा चित्रपट मनिष शर्मा दिग्दर्शित करत असून पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात दाखल होणार आहे. तसेच तो अक्षय कुमारसोबत ‘सेल्फी’ या चित्रपटात देखील झळकणार आहे. प्रेक्षक आता इम्रान आणि सईला एकत्र पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.
Published by:Nishigandha Kshirsagar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या